My title My title
BlogBrain StormingMental Health

Are children controlled by fear of punishment?

शिक्षेच्या धाकानं मुलं नियंत्रित होतात का

Are children controlled by fear of punishment?

Are children controlled by fear of punishment?

शिक्षेच्या धाकानं मुलं नियंत्रित होतात का

पालकत्वाची बाराखडी..

शिक्षेच्या धाकानं मुलं नियंत्रित होतात का ?

जर तुम्हाला मुलांसाठी एकच गोष्ट करायची असेल तर त्यांना मारणे सोडून द्या, दोन करायच्या असतील तर त्यांना रागावू नका आणि त्यांचा अपमान करु नका… असं भारतातील महान बालशिक्षणतज्ञ गिजूभाई बधेका यांनी म्हटलं आहे.

सजग पालकत्वाच्या प्रवासात आपण प्रभावी पालक झालं पाहीजे, असा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणजे, मुलांचं संगोपन आपल्याला प्रेम आणि शिस्त यांचा ताळमेळ घालून करावं लागतं. तसा आपण कसोशीने प्रयत्न देखील करत असतो पण कधी तरी असं होतं की, आपला संताप अनावर होतो सहनशक्ती संपते मुलांना कठोर शब्द वापरले जातात आणि कडेलोट झाल्यावरती मुलांवरती आपला हात शेवटी पडतो. आपण असे वागल्याबद्दल आपल्याला खुपवेळ अस्वस्थ वाटतं, मग काही क्षणांनी त्याला आपण प्रेमाने जवळ घेतो त्याच्या आवडीनिवडीचे पदार्थ खायला देतो. आपल्यातली गील्ट भरून काढण्याचा आपला प्रयत्न असतो. ही अधीरता, अगतिकता आणि आक्रमकपणा आपल्यात येतो त्याबद्द्ल आपण गांभीर्याने विचार करायला हवा.

                बालभवनातील अनेक पालकांशी चर्चा करतांना असं दिसतं की, १०० टक्के पालकांना आपल्या मुलांना कधीच मारायचं नसतं… पण आम्ही विचारतो, ‘आपल्यापैकी किती पालक असे आहेत, ज्यांनी कधीच आपल्या मुलांना मारलं, नाही.?’ मग बहूतांश पालक निशब्द होतात. मुलांना मार देणे ही जणू काही आपल्याला काय म्हणायचं आहे ते मुलांपर्यंत पोहोचवण्याची योग्य पध्दत आहे असे, त्यांना वाटत असते. तो सोपा मार्ग त्यांनी निवडलेला असतो. खरं तर आपण रागावलो आहोत आणि आत्ता त्याच्या पुढची कृती म्हणजे मुलांना मार देणं ही आहे. ही गोष्ट आपल्याला आतल्या आत जाणवत असते. खुपदा आपण स्वतःच्या रागाला नियंत्रित करतांना यशस्वी होतो पण अनेकदा यात म्हणावे तसे यश येत नाही. आपल्या धारणा पक्क्या ठरलेल्या असतात की, ‘मुलांना शिस्त लावण्यासाठी मार हा द्यावाच लागतो, नाही तर मुलं हाताबाहेर जातात’. आपल्याला नाही का? आपल्या  पालकांनी मारत- धोपटतंच मोठं केलं!..त्यांच्या शिक्षेची भिती होती म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो. अशी पुष्टीही जोडली जाते. वेळेत टी.व्ही. बंद केला नाही, सांगुनही वस्तूंची मोडतोड केली, नीट जेवण केलं नाही, लहान भावंडांना सारखा मार देतो, वेळेत झोपत नाही, वेळेवरती अभ्यास केला नाही अशा असंख्य गोष्टीसाठी, जेंव्हा केंव्हा मुलांना मारलं जातं तेंव्हा मुलं त्यांना जे वाटतं ते काहीतरी करत असतात आणि पालकांना त्याक्षणी जे वाटतं ते करतात. या संघर्षातूनच मुलांना वारंवार मार दिला जातो. विलक्षण बाब म्हणजे कोणत्याही पालकांना मुलांना मार द्यायचा नसतो त्यांच वारंवारं म्हणणं हेच असतं की, मी शांतपणे ३ वेळा सांगुनही मलांनी ऐकलं नाही ना! ना की, माझं डोकं हालतं.’ हे आपलं वागणं खरचं समतेचं असतं का ? की आपण सोयीचं वागतो? ते म्हणजे एकच चूक मुलांनी केली तर त्यांना मार मिळतो आणि बाबा, आजोबा, आजी, अशा इतरांनी कोणीही केली तर त्यांना समजून घेतले जाते. हे वर्तन पहिल्यांदा आपण तपासून पाहीलं पाहीजे. समजा रियांश कडून दुधाचा ग्लास सांडला तर त्याला त्याची आई जोरात धपाटा लगावते आणि तोच ग्लास जर आजोबांकडून सांडला तर म्हणते, ‘राहु द्या, स्वच्छ करते मी.’ असं काहीसं मोठ्यांचं वागणं असतं. मुलांना जेंव्हा शिक्षा केली जाते तेंव्हा त्यांच्यावरती खूप सखोल परिणाम होतो. मुलं स्वतःला एकटी समजु लागतात. एका दिवशी बालभवनात चंदन आला खूप रडून आलायं असं दिसत होतं. त्याला विचारलं तेंव्हा म्हणाला, ‘मला की, नाई पळून जावं वाटतं घर सोडून माझी आई वाईट आहे फार, मला ती खूप मारते. माझं असं घरात कोणीच नाही. कुणाचंचं माझ्य़ावर प्रेम नाही’, मुलांच्या भावविश्वाला अशा प्रकारे तडा जात असतो. त्यांना असुरक्षित वाटत असतं. आपण नेमकं कसं वागावं हे त्यांना समजत नाही स्वतःबद्दल न्युनगंड तयार होतो आणि एकसारखं त्याला असंच वातावरण मिळत राहीलं तर आपलं काही स्वत्व असतं, अहं असतो हे त्याला विसरायला होतं. अभ्यास केला नाही शिक्षा, शुध्दलेखन करता येत नाही म्हणून बोलणी खावी लागतात, गणितात नापास झालं तरी ओरडा खावा लागतो. अशा एक ना अनेक प्रसंगांनी बालमन कोमेजून जातं, किंवा याउलट आपली कुणालाच काळजी नाही म्हणून मूल निगरगट्ट होतं. या समजुती घट्ट झाल्या की, त्या कायम राहण्याचा संभव जास्त असतो. अशा वेळी मुलं एकतर दबून जातात किंवा बंडखोर होण्याची शक्यता अधिक असते. वर्षानुवर्ष दबलेल्या त्यांच्या ‘स्व’ चा अचानक उद्रेक होतो. त्यामुळे मानसिक विकासावरती याचा अत्यंत गंभीर परिणाम होत असल्याचं संशोधनातून पुढे आलं आहे. आपल्या पालकांना राग आला की, ती समोरच्याला बदडून काढतात, ही शैली ते मोठे झाल्यावरती अवगत करु शकतात. काही होत नाही मार खाल्ल्यावरती, थोडावेळ परिणाम होतो. नंतर -नंतर मार खाण्याचं मुलांना काहीच वाटेनासं होतं.  मुलं भावनाशून्य होतात तो काळ हाच अशा वेळी लहानग्यांच्या मेंदूसाठी विधायक प्रोग्राम द्यायला हवा, परिस्थीतीनुरुप तो काय असु शकतो? याचा पालक म्हणून वेळीच विचार केला पाहीजे. कारण प्रत्येक मुलाच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याची जडणघडण, त्याच्या सवयी, त्याचे पालन पोषण, कौटुंबिक पार्श्वभूमी याचा मुलांच्या विकासात मोठा वाटा असतो.

मुंबईमध्ये 2015 साली केलेल्या 1700 मुलांच्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलं की, 2-ते 8 वर्ष वयाच्या आतील मुलांना 62 टक्के पालक मारतात. त्यामध्येही आईने मार दिलेली आकडे वारी जास्त आहे. असं का होतं तर त्याची असंख्य कारणं आहेत. त्यापैकी, महिलांना त्या स्त्री आहेत म्हणून आलेल्या मर्यादा, त्यांच्यामधील कर्तृत्वाच्या  अभिव्यक्तीसाठी न मिळालेली संधी आणि चाकोरीबद्द जीवन यामुळे संतापाचा उद्रेक, आपल्या पेक्षा कमी बलशाली असलेल्या व्यक्तीवरती होत असतो हे सुध्दा एक कारण आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पालक म्हणून असलेला प्रभाव कमी होतो.  मग मुलं इतरत्र प्रेम शोधू लागतात. ते मिळालं नाही तर मुलं कदाचित हाच बोध घेतात की, जो जास्त बलशाली असतो त्याच्याकडूनच कोणतेही प्रश्न सुटू शकतात. दादागिरी, गुंडगिरी, अरेरावी असं वर्तन मुलं आजुबाजुच्या वातावरणातुन अवगत करत असतात. आपल्याकडे एक म्हण आहे मुलगा बापाच्या खांद्याला लागल्यानंतर तरी त्याला किमान मारु नये म्हणजे काय? तर मुलाच्या अस्तित्वाची दखल घ्यावी त्याचा सन्मान करावा.

हे चित्र बदलण्यासाठी  काय केलं पाहीजे.

■ आपल्याला हे स्पष्ट असावं की, पालकत्वाची सत्ता ही अविचारानं वापरण्यासाठी मुळीच नाही तर ती लोकशाही मार्गाने पालकत्वाला अधिक फुलवण्यासाठी आहे.

■ शिस्त जरुर अंगीकारावी परंतु अंहिसेतून शिस्तीला जास्त उजागर करावं,  कितीही मोठी गोष्ट घडली असेल तर स्वतःला आधी वेळ द्या, काही क्षण शांत राहून मग मुलांशी संवाद साधावा.

■ आपल्या मुलांना शांतपणे सांगितलेलं लवकर समजतं, आपल्याला जसं चुक झाल्यानंतर रागावू नये समजून घ्यावं किंवा इतरांनी ओरडू नये अशी आपली इच्छा असते तसंच मुलांनाही वाटत असतं.  उदा. ‘माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे पण तु जे आत्ता क्लासला न जाता मैत्रीणीकडे गेलीस, हे तु आम्हाला न सांगता गेलीस ना! त्यामुळे आम्ही काळजीत पडलो फार.. तुझ्या अशा वागण्याने मला फार वाईट वाटलं. या पुढे तु मला सांगुन जाशील’. अशा विनय़शीलतेने आपल्या आई वडिलांना आपली काळजी आहे आणि आपण सारखे त्यांच्या सुचनेविरुध्द वागू लागलो तर त्यांना यातना होतील हे मुलांना पटकन समजतं.

■ त्यांना गोडीने मिठीत घ्या, जरी चुकलं असलं तरी मी तुला समजु शकतो, हे तुमच्या कडून दिसू द्या ते आश्वासक असु द्या, मुलं त्यावरती लवकर विश्वास ठेवतात. उदा. ‘तु दादाचं खेळणं तोडंलंस काय वाटतं तुला हे योग्य होतं का?’ असं म्हटल्यावरती मुलांच्या वर्तनात सौम्य का असेनात बदल नक्की होतील.

 ■ मुलांना समोर घेऊन अगदी ३ मिनिटापर्यंत काहीच बोलु नये फक्त त्याला समोर बसवावं त्याच्याकडे पहावं आणि किमान तीन मिनिटानंतर संवादाला सुरूवात करावी.

■ वेळ निघून जाऊद्या मुल ‘चुकीचं’ किंवा ‘वेड’ का? वागलं हे स्वतः होऊन सांगेल. अमेय बालभवनातल्या सर्व लहान मुलांना जोरजोरात विनाकारण मारतो, हे लक्षात आल्यावरती आम्ही सर्वांनी त्याला एके दिवशी जवळ बसवून घेऊन विचारलं तर लक्षात आलं की, वारंवार त्याला वाईट मुलगा हा शिक्का लागला आहे आणि आतापर्यंत त्याच्या अनेक शाळा बदलून झाल्या आहेत पण खरं तर तसं नव्हतं, त्याचं कौतुक सर्वच परिस्थितीमध्ये कमी झालेलं जाणवलं त्याच्या बदल्यात लक्षवेधी वर्तन करण्याचा अमेयचा फंडा आहे. मुळात तो वाईट मुलगा नाही. या उलट त्याची ज्या मुलांशी मैत्री होते तो त्यांचा लाडका असे. 

■ मुलांकडून अपेक्षित बदल हवा असेल तर पालकांनी एकट्याने शिस्तीचे नियम आखू नयेत. ते मुलं कधीच मान्य करणार नाहीत, उदा. ‘रेवा तु उद्यापासून फक्त १ तास टि.व्ही पहायचा, त्यानंतर तो मी बंद करणार’. असं म्हणण्याऐवेजी,  ‘रेवा आपण एक नियम बनवूयात का? आपण घरातील सर्वचजण उद्यापासून १ तास टी.व्ही. पाहणार आहोत त्यानंतर ज्याला जे आवडेल ते काम करु शकतो. काय वाटतं तुला हे असं करुयात का?’ त्यामुळे मुलाला वाटेल की, या घरामध्ये माझा विचार घेतला जातो. मी महत्वाचा आहे मला सुध्दा इतरांसारखंच वागायचं आहे. नाही तर अनेकदा होतं असं की, मुलांना २ तास टि.व्ही पाहू दिला जातो आणि नंतरच संपूर्ण वेळ मोठ्यांच्या हातात रिमोट असतो. मुलांनी त्या काळात अभ्यास करण्याचा नियम केलेला असतो.  यातुन होतं असं की, मुलं अभ्यास तर करतच नाहीत उलट, बंडखोर होतात. मला म्हणजे कमी वेळ आणि आपण स्वतः टि.व्ही. समोर तासनतास बसतात ही भावना मुलांच्या मनात बळावू शकते थोडक्यात काय तर पालकांनाही या वेळेला कृतीद्वारे शिस्तीमधील सक्रीय सहभाग  घ्यावा लागेल.

■ प्रत्येकाकडून चूक होऊ शकते आणि त्याची माफी मागायची असते मग समोरचा लहान असो वा मोठा  हे उदाहरण पालकांनी आपल्या सरावातून पुढे घेऊन गेले पाहीजे मुलं चाणाक्ष असतात, ते तुमचे निरीक्षण करीत असतात किंबहुना ते तुमचे अनुकरण करत असतात. निखील चे बाबा त्यांच्याकडून जर लहानशी सुध्दा चूक झाली तर हात जोडून माफी मागतात, हे निखील रोज पाहतो, एकदा वर्गात निखील कडून संजनाची पाण्याची बाटली पडली निखील ने संजनाची लगेच हात जोडून माफी मागितली.  म्हणजे काय विधायक कृतींचा सराव करतांना मोठ्यांना मुलांनी पाहीलं की, ते सुध्दा तसेच वागत असतात. उदा. परी ४ वर्षांची आहे तिची मम्मा रोज दुधवाल्याला ‘धन्यवाद दादा असे म्हणते’  तेंव्हा परी सुध्दा तेच म्हणत असते. विधायक अर्थाने सांगायचं झालं तर हा सकारात्मक विकासाचा सराव आहे संवेदनशीलता आणि कृतज्ञतेचा सराव आहे आणि तो प्रत्येक मुलांत यावा अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते.

■मुलांना शिक्षा करण्याचीच वेळ आली तर ती अशी द्या की, ती ते स्वतः त्यातून सावरतील, उदा. अर्हंतच्या बाबाने मागच्या आठवड्यात आणलेला कपांचा सेट पाहुण्यांचा, चहा झाल्यानंतर उचलून ठेवतांना त्याच्याकडून तो फुटला तर त्याच्या बाबाने हे म्हणू नये की, ‘केवढा घोडा झालास, तरी तुला साधी कपं सांभाळता येत नाहीत!’. त्यापेक्षा त्याच्याकडे क्षणभर पहा. तो काय रिएक्शन देतोयं त्याला म्हणा, ‘अऱे फुटलं का माझ्याकडूनही हे फुटू शकलं असतं असं करुया आपण दोघं ते तुकडे गोळा करुयात’.

■मुलांना नेहमी पर्याय द्या आपण पालक म्हणून रागाने लालबुंद होण्यापेक्षा आपला कम्फर्ट झोन तयार करा मुल अभ्यासाला नाही म्हणत असेल तर त्याला हे विचारा की, ‘आधी कुठला अभ्यास करायचा आपण मराठी, हिंदी, की गणित?

■मुलांनी एखादी चुक केली असेल तर त्याला लगेच रागावण्याआधी, उदाहरण घालुन द्या की, ती नेमकी कशी करायची असते. उदा. ‘पेन असा उघडा ठेवायचा नसतो नील तर तो अस्सा घट्टा झाकण लावून ठेवायचा असतो म्हणजे कीनाही पुढच्या वेळी आपल्याला छान लिहिता येतं. तुला लिहायचं आहे ना खुप सारं…’

■मुलांनी अगदी लहान गोष्ट केलेली असली तरी त्याचे तोंडभरुन कौतुक करावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं अरे व्वा, शाब्बास, तु आहेसच फार हुशार, मला की नाही तु फार आवडतेस/आवडतोस. उदा. अगदी छान तु स्वच्छ हात धुतलेस बरं.. यामुळे काय होतं कसं छान वर्तन केलं म्हणजे कौतुक होतं, याचा विधायक प्रोग्राम मुलांना मिळतो आणि आनंदही होतो. अशा असंख्य गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात फक्त थोडेसा धीर धरायला हवा.

प्रा. पंचशील डावकर (समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच, लातूर)

Mob- 9960001617

 Source

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button