My title My title
Brain StormingSomething Different

Bad Patch

Bad Patch- एक संघर्ष…©Sachin Rayalwarप्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘Bad Patch’ येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते…

नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा Bad Patch आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो…

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा Bad Patch येतो…. …

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो… अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो…

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या Bad Patchचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे Bad Patch असतानाच कळतं…

आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त Bad Patch असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो, काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो हे आपलं आपल्याला समजू शकतं…

आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. हा वाईट काळ प्रत्येकाला काही शिकवून जातो.

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते…!

अर्थात, Bad Patch येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही… पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं…

आपला Bad Patch आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!AD’s

💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.

💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!

आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.

10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही.

सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/

 असो… आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी Bad Patch येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो…!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच……

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!

तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो, तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः “कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.

मी गरीब आहे.

पैसा नाही,हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.

स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही.

ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते…..

चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान, सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.

संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका….

स्वताच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा…..©Sachin RayalwarVarunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button