My title My title
Post's

The Effect of the Internet on your Behavior in Marathi

The Effect of the Internet on your Behavior

तुमच्या वागणुकीवर होणारा इंटरनेटचा प्रभाव



Why The Internet is Changing Your Behavior?

Think before Click…

इंटरनेट आपल्या Life मध्ये आल्यापासून आपल्याला एक नवीनच सवय लागली आहे, आणि त्या सवयीचं नाव आहे Forward..! ह्याला सवय कसली व्यसनच म्हणा की….

Whatsapp वर कुठलाही नवीन ग्रुप बनला की लगेच त्या ग्रुपवर सगळ्यात पहिले सुप्रभात (Good Morning) कोण टाकतंय याची जणू काही चढाओढच सुरू होते.

एखाद्या ग्रुपवर सुप्रभात, विनोद, सुविचार किंवा तत्सम मेसेजेस पाठवून नयेत अशा सूचना दिलेल्या असतील तरीसुद्धा असेल मॅसेज टाकण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.

बोटांना रोखता येत नाही आणि मनाला आवर सुद्धा घालता येत नाही. त्यावरून गृपमध्ये भांडणं झाली तरीसुद्धा चालतात पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणं अनेकांना कठीण होऊन बसते.

इतकं नाही तर फॉरवर्ड करण्याच्या नादात आपण खोटी आणि चुकीची Information फॉरवर्ड करतोय हेही लक्षात येत नाही..

हे एक प्रकारचं व्यसनच आहे.

यात बाह्य बदल काही होत नसले तरी सुध्दा वागण्यातले बदल मात्र झपाट्याने होतात.

फॉरवर्ड केलेले जोक्स आणि मिम्स आपण खूप बघतो, वाचतो, हसतो आणि फॉरवर्डसुद्धा करतो.

पण या फॉरवर्डच्या सवयीमुळे आपल्या वागणुकीत कोणते बदल होतात हेही समजून घेऊया.

आपल्या वर्तणुकीत कोण-कोणते बदल होतायेत?

  1. सतत Whatsapp चेक करण्याची सवय अनेकांना लागते.

  2. आलेला प्रत्येक व्हिडीओ, फोटो डाऊनलोड करून बघणं गरजेचं बनते.

  3. सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिले Mobile चेक करताना काल पोस्ट केलेल्या स्टेटसला किती view आणि कोणत्या प्रतिक्रिया आल्या आहेत, लाईक्सची संख्या वाढली आहे का, याकडेच लक्ष लागून असते.

  4. जगभर करत असलेले अभ्यासक सांगतात, Virtual जागामुळे माणसांमधला संयम कमी होतोय. सकारात्मक मॅसेज जारी पाठवले तरी नकारात्मक भावनेत वाढ होयेत.

  5. खोट्या Information वर पटकन विश्वास ठेवला जातोय म्हणजेच माणसांचे मत आता Virtual जग ठरवतंय.

  6. माणसे खूप बोलतात पण त्यावर विचार करतातच असे नाही, आणि विचार करून बोलतात असेही नाही.

  7. आता तर आई-वडील, आजी-आजोबा सगळेच ऑनलाईन असतात, त्याचा परिणाम आणि मुलांच्या Mobile वापरावर होतोय.

  8. खोटं बोलण्याचं प्रमाणात वाढ झालीय. आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आहोत, हटके गोष्टी करतो आहोत, आपण जे नाही ते दाखवण्याकरीता जगाला सतत ओरडून ओरडून सांगण्याच्या नादात सर्रास खोटे बोलत आहेत.

  9. Breaking News ची सवय आता टीव्ही चॅनल्स वरून माणसांपर्यंत येऊन पोहचली आहे.

  10. फॉरवर्डच्या सवयीमुळे मलाच सर्वात पहिल्यांदा बातमी समजली हे सांगण्याच्या नादात अनेकदा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी सुध्दा झपाट्याने व्हायरल होते आणि त्यावर श्रद्धांजली वाहून माणसं मोकळी होतात.

  11. फॉरवर्ड मुळे तुमच्या फोनमधल्या Virtual कचऱ्यात प्रचंड प्रमाणात वाढ होतेय हे लक्षात ठेवा. आपल्याला नको असलेले व्हिडीओ, फोटो, फाईल्स उगाच आपल्या फोनमध्ये पडून असतात आणि Mobileची मेमरी खातात.

  12. फॉरवर्डच्या नादामध्ये अफवा पसरवण्याचं प्रमाण वाढत. आणि एकदा त्याची सवय लागली की खरं काय आणि खोटं काय हे समजून घेण्याची इच्छाच हळूहळू संपून जाते. हे अतिशय धोकादायक आहे.

जर तुमच्यात असे काही बदल जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा. Virtual जग इतकं सुध्दा महत्वाचं नाहीये की त्यामुळे तुमच्या रोजच्या जगण्यात, तुमच्या स्वभावात, तुमच्या वागण्यात बदल व्हावेत.

Think before Click…

Why The Internet is Changing Your Behavior?



Source: https://abdnews.in/



What did the Internet give us – इंटरनेटने आम्हाला काय दिलं?(Opens in a new browser tab)

Things to Remember While Using Social Media – In Marathi(Opens in a new browser tab)

‘Overthinking’ is the root of many problems!(Opens in a new browser tab)

Online Strategy and Category of Digital Marketing in Marathi(Opens in a new browser tab)



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



The Effect of the Internet on your Behavior

तुमच्या वागणुकीवर होणारा इंटरनेटचा प्रभाव

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button