My title My title
Something Different

Why The Gurukul was closed in Marathi

Why The Gurukul was closed in Marathi

गुरूकुल (Gurukul) का संपुष्टात आले?



सनातन हिंदु संस्कृतिमधील गुरूकुल (Gurukul) परंपरा अखंड विश्वामध्ये प्रसिद्ध होती. गुरूकुल (Gurukul)मध्ये अनेक महत्वपूर्ण विषय शिकविले जात होते.

अखंड भारतातील गुरूकुल (Gurukul) नंतर ऋषीकुल मध्ये कोणते विषय शिकवले जात होते हेसुद्धा माहीती असणे गरजेचे आहे.

प्राचीन सनातन गुरूकुल (Gurukul)संबंधी असलेले समज- गैरसमज दूर करून लोकांनी स्वत:च्या विचारांमध्ये परिवर्तन करून अफवांवर विश्वास ठेवू नये.

१) अग्नि विद्या (Metallurgy)
२) वायु विद्या (Flight)
३) जल विद्या (Navigation)
४) अंतराळ विद्या (Space Science)
५) पृथ्वी विद्या (Environment)
६) सुर्य विद्या (Solar Study)
७) चंद्र व परलोक विद्या (Lunar Study)
८) मेघ विद्या (Weather Forecast)
९) पदार्थ विद्युत विद्या (Battery)
१०) सौर ऊर्जा विद्या (Solar Energy)
११) सृष्टी विद्या (Space Research)
१२) खगोल विद्या (Astronomy)
१३) भूगोल विद्या (Geography)
१४) काल विद्या (Time Machine)
१५) भूगर्भ विद्या (Geology Mining)
१६) रत्न व धातू विद्या (Gems & Metals)
१७) आकर्षण विद्या ( Gravity)
१८) प्रकाश विद्या (Solar Energy)
१९) तार विद्या (Communication)
२०) विमान विद्या (Plane)
२१) जलयान विद्या (Water Vessels)
२२) अग्नि अस्त्र विद्या (Arms & Ammunition)
२३) जीव जंतू विज्ञान विद्या (Zoology & Botany)
२४) यज्ञ विद्या (Material Sic)

प्राचीन गुरूकुल (Gurukul)मध्ये वरीलप्रमाणे वैज्ञानिक विद्या शिकवल्या जात होत्या त्याशिवाय व्यवसायिक आणि तांत्रिक विद्येविषयी जाणून घेवूया….

२५) वाणिज्य (Commerce)
२६) कृषि (Agriculture)
२७) पशुपालन (Animal Husbandry)
२८) पक्षिपालन (Bird Keeping)
२९) यंत्रकार (Machanics)
३०) रथकार (Vehical Designing)
३१) सुवर्णकार (Jewellery Designing)
३२) वस्त्रकार (Textile)
३३) कुंभार काम (Pottery)
३४) लोहार काम (Metallury)
३४) रज्जुकार (Logistics)
३५) वास्तुकार (Artitect)
३६) पाक कला (Cooking)
३७) सारथ्य कला (Driving)
३८) नदी प्रबंधक (Water Management)
३९) सुचिकार (Data Entry)
४०) गोशाला प्रबंधक (Animal Husbandry)
४१) उद्यान रक्षा (Horticulture)

वरील सर्व विद्या गुरूकूलमध्ये शिकवल्या जात होत्या परंतु वेळेनुसार गुरूकुल (Gurukul) शिक्षण पद्धती लुप्त होत गेली. अखंड भारतात गुरूकुल (Gurukul) आणि ऋषीकुल परंपरा सुरू होती.

आजच्या युवापिढीमध्ये प्राचीन गुरूकुल (Gurukul) परंपरेविषयी खूप गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे तरच भावी युवापिढी सक्षम आणि संस्कारशील होवू शकेल.

अखंड भारतामध्ये गुरूकुल (Gurukul) का नष्ट झाले??

ह्याला कारण आहे काॅन्वेंट स्कूल. १८५८ साली Indian Education Act हा कायदा बनवला गेला. ह्या कायद्याची तरतुद “लाॅर्ड मेकॅले” ह्या ब्रिटीश अधिकारार्‍याने केली होती.

परंतु त्याआधी त्या ब्रिटीश अधिकार्‍याने अन्य ब्रिटीश अधिकार्‍यांना सोबत घेवून भारतील शिक्षण पद्धतीचे सर्व्हेक्षण केले होते. G. W. Luther आणि Thomas Munro ह्या दोन ब्रिटीश अधिकार्‍यांनी अनेक ठिकाणांचे सर्व्हेक्षण करून भारतील शिक्षण पद्धतीचा रिपोर्ट तयार केला होता.

त्या रिपोर्टमध्ये लिहले होते की, त्यामधील Luther ह्या अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये ९७% साक्षरता आहे आणि Munro नावाच्या अधिकार्‍याने दक्षिण भारताबद्दल जो रिपोर्ट दिला होता त्यात असे लिहले होते की, दक्षिण भारतात १००% साक्षरता आहे.

लाॅर्ड मेकॅलेचा स्पष्ट उद्देश होता की, भारतातील जनतेला गुलाम करायचे असेल भारतातील “प्राचीन व सांस्कृतिक शिक्षणपद्धती” उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे आणि “इंग्रजी शिक्षण पद्धती” भारतात आणायला हवी.

पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळे शरिराने भारतीय परंतु बुद्धीने पाश्चात्य करण्याचा उद्देश साध्य होईल.

ह्यासाठी लाॅर्ड मेकॅले ह्याने प्राचीन गुरूकुल (Gurukul) शिक्षणपद्धतीला नियमबाह्य केले. ह्यामुळे ब्रिटीशांनी अखंड भारतातील गुरूकुल (Gurukul) पद्धती नष्ट केली.

अनेक गुरूकुल (Gurukul)मध्ये आग लावली, त्यामध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार केले, गुरूकुल (Gurukul)तील शिक्षकांना तुरूंगामध्ये टाकले.

१८५० सालापर्यत भारतामध्ये “७ लाख ३२ हजार” गुरूकुल (Gurukul) संख्या होती. त्याकाळी भारतात गावांची संख्या ७ लाख ३२ हजार होती म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक गुरूकुल (Gurukul) त्याकाळी होते.

हे सर्व गुरूकुल (Gurukul) आजच्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर “Higher Learning Institute” होते. ह्या गुरूकुल (Gurukul)मधून एकूण १८ महत्वाचे विषय शिकविले जात होते.

ह्या गुरूकुल (Gurukul)चा खर्च त्या काळातील राजे महाराजे करत होते.

गुरूकुल (Gurukul)मध्ये निशु:ल्क शिक्षा दिली जात होती. अशा वैभवशाली गुरूकुल (Gurukul) पद्धतीला नष्ट करून इंग्रजी शिक्षण पद्धती कायदा घोषित करण्यात आला आणि कलकत्ता येथे पहीले काॅन्वेंन्ट स्कूल स्थापन करण्यात आले.

त्याकाळी ह्याला “फ्री स्कुल” संबोधले जात होते. ह्याच कायद्याअंतर्गत भारतात कलकत्ता University, Mumbai University, मद्रास University ह्या मुख्य तीन Universityची स्थापना करण्यात आली.

आजही ह्या तीन University अस्तित्वात आहेत.

लोकांचा हा गैरसमज आहे की, इंग्रजी भाषा हि आंतराष्ट्रीय भाषा आहे परंतु जगामध्ये एकूण २०४ देश आहेत आणि इंग्रजी भाषा फक्त ११ देशांमध्येच शिकवली आणि बोलली जाते.

मग इंग्रजी आंतराष्ट्रीय भाषा कशी काय आहे? व्याकरणानुसार इंग्रजी भाषा समृद्ध नाही उलट गौण भाषा मानली जाते. ईशा मसिह ह्यांची भाषा आणि बायबलची भाषा अरमेक पद्धतीची होती.

अरमेक भाषेची लिपी आपल्या बंगाली भाषेशी मिळती जुळती आहे. काळानुरूप ही भाषा लुप्त झाली.

जो समाज आपल्या मातृभाषा आणि संस्कृतीपासून दूर होतो त्या संस्कृतीचा र्‍हास लौकर होतो आणि हिच खेळी लाॅर्ड मेकॅले ह्यांनी खेळली होती.

इंग्रजी भाषा व्यवहारीक भाषा आहे भाषेची गरज असेल तरच इंग्रजीचा वापर करावा.

परंतु आपल्या मातृभाषेबद्दल ज्ञान आणि संस्कृतीचे ज्ञान नसलेले लोक कर्मदरीद्री म्हणावे लागतील.

भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगा आणि येणार्‍या नव्या पिढीलासुद्धा आपली समृद्धशील संस्कृतीचे ज्ञानदान करा.

आजची युवापिढी भारतीय संस्कृती, इतिहास ह्यांपासून खूप दूर झाले आहेत.

जेवढे ज्ञान त्यांना युरोप संस्कृतीचे आहे तेवढे ज्ञान भारतील संस्कृतिचे नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

प्राचीन सनातन हिंदु धर्म, संस्कृतीचा काडीचाही अभ्यास नसलेला आजची युवापिढी लहानपणापासून काॅन्वेन्ट स्कूलचे शिक्षण घेतल्यामुळे मुळ भारतीय संस्कृतीवर टिका करतात, निंदा करतात.

परंतु आजची युवापिढी हे जाणत नाहीत की, पाश्चात्य देशाने जे काही आजचे वैज्ञानिक शोध लावले आहेत ते सर्व शोध हजारो वर्षापूर्वी आपल्या सनातन हिंदु धर्मातील ऋषिमुनींनी कधीच लावले होते.



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



Why The Gurukul was closed in Marathi

गुरूकुल (Gurukul) का संपुष्टात आले?

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button