Varunraj kalse
Maharashtra Student Innovation Challenge 2023
- ,
- , Blog, Career Opportunities, Post's
Maharashtra Student Innovation Challenge
राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी शासनातर्फे ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’चे आयोजन करण्यात येत आहे. यात जिल्हास्तरीय निवड झालेल्या नवउद्योजकांना प्रत्येकी एक लाख, तर राजस्तरीय निवड झालेल्यांना प्रत्येकी पाच लाखांचे बीजभांडवल देण्यात येईल.
या उपक्रमाचे अनावरण १५ जुलैस कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथे झाले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थी, नवउद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
३१ऑगस्टपर्यंत मुदत
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त तीन विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल.
अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी व समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. या उपक्रमाच्या नोंदणीसाठी शैक्षणिक संस्था १५ ऑगस्टपर्यंत आणि उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतील.
तीन टप्प्यांत उपक्रम
हा उपक्रम तीन टप्प्यांत होणार असून, प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्था स्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्प्यात करण्यात येईल.
Maharashtra Student Innovation Challenge
१०० संकल्पनांची निवड
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या १०० नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येईल.
जिल्ह्यातील निवड झालेल्यांना एक लाख
प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट १० विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट १० विजेत्यांमध्ये ३० टक्के महिला, ५० टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व One District One Product (ODOP) संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी एक लाख बीजभांडवल देण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय निवड झालेल्यांना पाच लाख
या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील १०, अशा एकूण ३६० नवउद्योजकांना १२ महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून, इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या ३६० नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून सर्वोत्कृष्ट १० नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाखांचे बीजभांडवल देण्यात येईल.
या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या www.schemes.msins.in या पोर्टलला भेट द्यावी.
Maharashtra Student Innovation Challenge
Table of Contents
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🆁🅴 करा
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.