Brain StormingEducation
How to read Books & Why? In Marathi
How to read Books & Why? In Marathi
© प्रो. धनश्री कुलकर्णी
तुम्हाला वाचनाची आवड असेल तर, हे तुम्हाला मिळालेले एक वरदान आहे असे समजा. कुठलेही Book वाचण्यास घेताना त्याला Book न समजता एक संवाद समजा.
हा संवाद तुम्ही आणि लेखक यांच्या मधला आहे असे समजा.
१) सुरुवातीला वाचन केवळ आनंद मिळवण्यासाठी करा.
२) येथे कोणाशीही तुलना करत बसू नका. बढाई मारु नका मी एवढी Books वाचली. माझ्याकडे एवढी Books आहेत.
३) केवळ हजारो पुस्तके वाचणे हा आपला उद्देश नसावा.
४) प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी ज्ञान, माहिती, उपदेश, आनंद, आणि मार्गदर्शन देणारी निवडक Books परिपूर्ण पद्धतीने वाचून स्वतःचे जीवन घडवा.
५) केवळ एका-मागोमाग Books आणून आपला ग्रंथसंग्रह वाढवू नका.
६) तुम्ही रोज थोडा वेळ तरी वाचनाची सवय लावून घ्या. महिन्यातून २ Books वाचा.
७) पुस्तकाचा सर्वांगाने अनुभव घ्या.
८) ज्या विषयात तुम्हाला गोडी आहे, तुम्ही वाचताना देहभान हरपून जाता, तीच Books तुम्ही वाचत राहा.
९) Book वाचून झाल्यावर त्यातील तुम्हाला आवडलेले मुद्दे नोट करून ठेवा.
१०) तुम्हाला सर्वांत आवडणारा वाचनप्रकार तुम्ही शोधून काढा.
११) वाचन ही विकासाची केवळ पहिली पायरी आहे.
१२) मनन, चिंतन, विश्लेषण या मोठ्या व कठीण पायऱ्या त्या नंतर येतात.
१३) बहुतांशी लोक वाचनाच्या पहिल्याच पायरीवर अडकून बसतात व आयुष्यभर ग्रंथसंग्रह व शब्दसंग्रह करत राहतात. त्यातून अहंकार वाढत जातो.
१४) केवळ वाचन करत राहू नका. त्याचा वापर जीवन समृध्द करण्यासाठी करा.
How to read Books & Why? In Marathi
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
© प्रो. धनश्री कुलकर्णी
टीम इट-वर्क्स,