Jhooth Bole LiarLiar AI Kaate


Harshada Ghate
Jhooth Bole LiarLiar AI Kaate
- ,
- , Blog, Post's, Something Different
Jhooth Bole LiarLiar AI Kaate
©सलिल सुधाकर चौधरी
माणसांनी मशिन्स बनवल्या त्या आपले प्रश्न सोडविण्यासाठी. पण आपले प्रश्न काही संपत नाही आणि माणूस देखील मशिन्स बनवणे सोडत नाही. असाच एक आतापर्यंत न सोडवता आलेला प्रश्न सोडविण्यासाठी AI मदत करत आहे. तो प्रश्न आहे “समोरील व्यक्ती खरं बोलतोय की खोटं हे शोधण्याचा !” आणि ते देखील समोरच…लगेचच…व्यक्ती बोलत असतानाच !! आहे की नाही भारी ! चला तर मग बघूया कसं ते.
आज जे टूल आपण पाहणार आहोत ते टूल ऑनलाईन वापरता येतं आणि सध्या झूम मिटिंग , गुगल मीट आणि काही ऑनलाईन विडिओ कॉलिंग अँप्स मध्ये समोरील व्यक्ती खरं बोलत आहे की खोटं याचा अंदाज बांधते. आणि लगेचच स्क्रीनवर दाखवते.
LiarLiar AI नावाचं हे टूल (Link ➡️ https://liarliar.ai/) कसं काम करतं ते आधी बघूया.
हे टूल लाईव्ह मिटिंग मध्ये समोरील व्यक्तीच्या अतिसूक्ष्म हालचाली, देहबोली, आवाजातील उतार चढाव, हृदयाच्या ठोक्यांमधील बदलता वेग यांचा अभ्यास करून अंदाज बांधते.
Remote Photoplethysmography ही टेक्नॉलॉजी वापरून हृदयाच्या ठोक्यांमधील बदलता वेग (heart rate fluctuations) आणि त्यामुळे होणारे चेहर्यावरील अतिसूक्ष्म हावभाव टिपते. आणि त्यावेळी असलेली माणसाची नेमकी मानसिक स्थिती कशी आहे याचा अंदाज बांधते.
त्याचसोबत Body Language (देहबोली) चा अभ्यास करून अप्रामाणिक व्यक्तीची खोटं बोलताना कशी देहबोली असेल यासोबत संबंध जोडला जातो आणि किती टक्के जुळत आहे हे स्क्रीनवर दाखविले जाते.
हे टूल एकदम वाचून माहिती देते असे नाही मात्र ते अप्रामाणिकपणा किती % आहे हे सांगते. आणि स्वयंशिक्षणात माहीर असणारा LiarLiar AI जेवढ्या केसेस बघेल तेवढा अधिक शिकत जाईल आणि अचूक होत जाईल.
ऑफिस मधील कामचुकार मंडळींसोबत मिटिंग करताना, अनोळखी ग्राहक-कंपनी सोबत व्यवहार करताना, नोकरीसाठी मुलाखती घेताना , ऑनलाईन मिटिंग मधून लग्न जुळवताना अशा अनेक ठिकाणी LiarLiar AI या जबरदस्त टूलचा उपयोग होऊ शकेल. सध्या विंडोज आणि मॅक संगणकावर हे टूल इंस्टाल करता येईल. LiarLiar AI चा केवळ ३२०० रुपयांमध्ये life time ऍक्सेस उपलब्ध आहे. त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकता.
Jhooth Bole LiarLiar AI Kaate
LiarLiar AI Link: https://liarliar.ai/
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🆁🅴 करा
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
