महाराष्ट्रराज्यकौशल्यविकास सोसायटीकडून राज्यातील युवक- युवतींसाठी दिनांक 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधी दरम्यान कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण (Skill Needs Assesment Survey) मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कौशल्य, रोजगार उदयोजकता व नाविन्यताजिल्हा कार्यकारी समितीमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्यातील युवक- युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणा दरम्यान स्वारस्यामध्ये वृध्दी होउन अनुउपस्थितीचे प्रमाण कमी होईल आणि प्रशिक्षण यशस्वी उमेदवारांना रोजगार स्वंयरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होतील.
राज्यातील युवक-युवतींना मागणीवर आधारित (Demand Driven) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” मोहिमेचे दिनांक 01 जुलै ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजन करण्यात येत आहे. सदर मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी
,त्याअनुषंगाने सर्व शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयातील विविध शाखेतील विदयार्थी शालेय / महाविदयालयीन शिक्षणातून गळती झालेले / शिक्षण सोडलेले / नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार तथापि, समाजातील वंचित घटकातील उमेदवारांचा यात प्राधान्याने समावेश होण्यासाठी या उपक्रमांतर्गत “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” गुगल फॉर्म भरण्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे.