My title My title
Education

Udyamita Yatra 2022

उद्यमिता यात्रा 2022.



महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नामधून राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा लघु उद्योजकतला प्रोत्साहन देणारा उपक्रम.

‘Udyamita Yatra 2022.

जगावर ओढवलेला कोरोना महामारीचा फटका भारताला पण बसला. या एकंदरीत परिस्थितीचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला. अनेकांच्या रोजगारावर त्यामुळे गदा आली आहे. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. आता कोरोना ओसरला असताना ह्या सर्व गोष्टींसाठी काम करणे गरजेचे बनले आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ने राज्यातल्या लघु व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणानार्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतलेले आहे.

या अनुषंगाने युथ एड फाउंडेशन महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून राज्यभर उद्यमिता यात्रा २०२२ चे आयोजन करीत आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ची ही उद्यमिता यात्रा राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये मध्ये जाऊन, महिला आणि युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहे. दि. १० मे रोजी मुंबईतून या यात्रेची सुरूवात होईल आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी एका जिल्ह्याला भेट देत राज्यभर प्रवास करेल.

४० दिवस, ३६ जिल्हे, ४० प्रशिक्षक, ४००० व्यावसायिक आणि ४००० किमीचा प्रवास असा उद्यमिता यात्रेचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यात युथ एड फाउंडेशन तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेणार आहे.

यामधे तज्ञ प्रशिक्षक सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन करतील. त्यात व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची ओळख करून त्याच्याशी जोडून देणे, त्यासाठी लागणाऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, आर्थिक तसेच डिजिटल साक्षर करणे, त्या त्या भागाच्या अनुषंगाने व्यवसायांचे पर्याय सुचवणे, व्यवसायासाठी बाजारात संधी कशाप्रकारे शोधल्या पाहिजेत या बद्दल माहिती देणे, जिल्हा उद्यमिता विभागाला त्यांना जोडून देणे अशा अनेक महत्वाच्या विषयासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नव्या व्यावसायिकांना बीज भांडवलासाठी देखील मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार असून, या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२२ पर्यंत राज्यात नवे ४००० छोटे व्यावसायिक निर्माण करणे हा यात्रेचा मुख्य हेतू आणि उद्देश आहे.रोजगाराच्या शोधात, ग्रामीण भागातून मोठया शहरामध्ये मोठया प्रमाणात स्थलांतर होत असते. अशावेळी, स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळाल्यास स्थलांतराचा वेग कमी करता येईल.सोबतच स्थानिकरोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालनाही देता येईल.

स्थानिक रोजगार निर्मितीसाठी, स्थानिक व्यवसायाची निर्मिती होणे ही काळाची निकड झालेली आहे. व्यवसाय मार्गदर्शन आणि निर्मितीचा उपक्रम हाती घेतलेली ही उद्यमिता यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तळागळातील लोकांना उद्योजक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. स्थानिक रोजगार, उद्योग आणि स्थानिक बाजार निर्मितीला चालना देण्यासाठीची ही एक ऐतिहासिक चळवळ ठरेल असा विश्वास आहे.



महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नामधून राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा लघु उद्योजकतला प्रोत्साहन देणारा उपक्रम.

Ministry of Skill Development and Entrepreneurship (Maharashtra)

‘udyamita yatra 2022.

खाली दिल्या प्रमाणे उद्यमिता यात्रेचा मार्ग आहे. तसेच उस्मानाबाद  जिल्ह्यातील होणार्या या उद्योजकता विकास या विषयावरील कार्यशाळेचा तपशील  आहे.

जेणेकरून जास्तीत जास्त युवक आणि युवतींना तसेच उद्योजक होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या नागरिकांना याचा लाभ घेता येईल.

Route of udyamita yatra 2022
Route of udyamita yatra 2022


उद्यमिता यात्रा workshop details
उद्यमिता यात्रा workshop details


 

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button