My title My title
Something Different

The Canopy Severance System (CSS)

The Canopy Severance System (CSS)

विमान छत विच्छेदन प्रणाली



© काशिनाथ देवधर, DRDO



स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख तिसरा:

भारतीय बनावटीचे ‘तेजस’ हे हलक्या वजनाचे लढाऊ विमान (Light combat aircraft (LCA)) Indian Air force च्या एका महत्त्वाच्या तुकडीचे मुख्य घटक झाले आहे.

Hindustan Aeronautics Limited (HAL) या सार्वजनिक संरक्षण उद्योगाला ८३ तेजस विमाने बनवून देण्याचा कार्य-आदेश मागच्या वर्षी मिळाला आहे.

‘Atmanirbhar Bharat अभियान अंतर्गत ही संरक्षण मंत्रालयाची मोठी भरारी आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation (DRDO)) आणि वैमानिकी विकास संस्था (Aeronautical Development Agency (ADA)) यांच्याद्वारा या लढाऊ विमानाचे अभिकल्यन व विकास (Design and Development ) कार्य करून, त्याच्या सर्व प्रकारच्या उड्डाण प्रमाणापत्रासाठीच्या चाचण्या यशस्वी केल्या गेल्या.

४ जानेवारी २००१ मध्ये मा. पंतप्रधान अटलजींच्या हस्ते राष्ट्रार्पण करून, या विमानाचे ‘तेजस’ (Tejas) असे नामकरण करण्यात आले.

त्यानंतर उर्वरित आवश्यक त्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, ‘तेजस’ विमानांचे नियमित उत्पादन ‘Hindustan Aeronautics Limited (HAL)’च्या बेंगलुरू येथील कारखान्यात सुरू झाले असून, सध्या वर्षाला बारा विमाने या वेगाने उत्पादन सुरु आहे.

येत्या काही वर्षांमध्ये वर्षाला 50 चे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

त्यासाठी आवश्यक साधनसामग्री व पायाभूत सुविधा निर्माण करणे सुरू आहे.

यासाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे.

स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानांची निर्मिती अव्याहतपणे करून, भारतीय हवाई दलाच्या गरजा निश्चितच पूर्ण होतील हे नक्की!

‘तेजस’ या Light combat aircraft (LCA) विमानासाठी अत्यंत महत्त्वाची व अत्यावश्यक असणारी जीवरक्षक यंत्रणा म्हणजे खुर्चीसह वैमानिक निर्गमन प्रणाली (Seat Ejection System).

विमान जमिनीवर उभे असताना, जमिनीवर अथवा हवेमध्ये मार्गक्रमण करताना, निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीमध्ये वैमानिकांचा प्राण वाचवणारी ही यंत्रणा आहे.

याचीच पहिली क्रिया म्हणजे, वैमानिकाचे शिरस्त्राण विमानाच्या पारदर्शक काचेसम असणाऱ्या छताला धडकायच्या आतच हे छत मोकळे करून, किंवा छत तोडून टाकून, वैमानिकास बाहेर फेकणारा मार्ग सुरिक्षत करणे.



This article is written by © काशिनाथ देवधर, DRDO



असा सुरक्षित मार्ग निश्चित करण्यासाठी ‘The Canopy Severance System (CSS)’ (The Canopy Severance System (CSS)). ही अत्यंत आवश्यक व अनिवार्य असणारी यंत्रणा शतप्रतिशत भारतीय तंत्रज्ञानाने बनविण्याचे;

अभूतपूर्व काम युद्धसामग्री संशोधन आणि विकास संस्था (Armament Research and Development Establishment) आणि उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा (High Energy Materials Research Laboratory). या दोन्ही पुणेस्थित संस्थांनी मिळून केले आहे.

सुरुवातीस मर्यादित संख्येचीच निकड असल्याने या संस्थांनीच अंतर्गत उत्पादन करून पुरवठा केला.

त्याचबरोबर, हैदराबादस्थित खाजगी उद्योगास हे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुपुर्द करून, त्यांना उत्पादनक्षम बनविले.

आता नियमित उत्पादनक्षम व उडाणयोग्य गुणवत्ता असणाऱ्या विमानछत विच्छेदन यंत्रणेची खाजगी उद्योगाकडून निर्मिती करून पुरवठा केला जाईल.

हेच अद्ययावत व अत्याधुनिक तंत्रज्ञान एचजेटी-३६ आणि एचटीटी-४० या दोन्ही भारतीय प्रशिक्षण विमानांसाठीही वापरले जाणार आहे.

The Canopy Severance System (CSS)चे अत्याधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञान ARDE आणि HEMRL या दोन DRDO च्या संस्थांनी एकत्र संशोधन करून, संपूर्णपणे भारतात विकसित केले आहे.

या The Canopy Severance System (CSS) अंतर्गत दोन स्वतंत्र प्रणाली विकसित केल्या आहेत;

मात्र त्यासाठीचे तंत्रज्ञान एकच आहे.


१) उड्डाणांतर्गत निर्गमन प्रणाली ( In-flight Egress system – IES):-

ही विमान उड्डाण करीत असताना किंवा हवेतून मार्गक्रमण करीत असताना, निर्माण झालेल्या आणिबाणीच्या परिस्थितीत वैमानिक जेव्हा बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन, ‘खुर्चीसह निर्गमन प्रणाली’ ची कळ (Button) दाबून आदेश देतो.

तेव्हा त्यापुढील सर्व क्रिया क्रमाक्रमाने स्वयंचलित पद्धतीने होतात. खुर्ची बाहेर फेकण्यासाठी लागणारी ऊर्जा ‘शक्ती काडतूस’ (Power cartridge) मालिकेद्वारा मिळते.

काडतूस कार्यान्वित (फायर) होऊन स्फोटकांमध्ये साठविलेली रासायनिक ऊर्जा उत्सर्जित होते; आणि एकदम उच्च दाब व तापमान असणारे वायू तयार होतात.

या वायूंचा उपयोग पुढील सर्व यांत्रिक घटना व हालचालींसाठी केला जातो. पहिले मुख्य काडतूस फायर झाल्यावर त्यातील वायूंचा काही अंश घेऊन, आयईएस प्रणालीतील प्रस्फोटकाचा प्रस्फोट होऊन, ही प्रणाली कार्यान्वित होते.


२) भूतल निर्गमन प्रणाली (Ground Egress system – GES):-

ही प्रणाली कार्यान्वयित करण्यासाठी, त्यामध्ये आतून प्रस्फोट करणारी यंत्रणा व बाहेरून दोन्ही बाजूस प्रस्फोट करणारी यंत्रणा, अशा तीन यंत्रणांची रचना केलेली असते.

या तिन्हींपैकी कोणत्याही एका यंत्रणेद्वारा प्रस्फोटकाचा स्फोट करून, जीईएस कार्यान्वयित केली जाते.

GES ही यंत्रणा विमान जमिनीवरच असताना उड्डाणापूर्वी, अथवा विमान उड्डाण करून परत आल्यानंतर जमिनीवर उतरवल्यावर.

Runway अथवा सहमार्गिकेवर निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत म्हणजे कोसळण्याच्या परिस्थितीत (Crash Landing) उपयोगी पडते.

वैमानिक स्वतःआतून अथवा विमानतळावरील बचाव गट बाहेरून, प्रस्फोटक प्रस्फोटित करून जीईएस यंत्रणा कार्यान्वयित करू शकतात, व वैमानिकास सुरक्षित बाहेर काढू शकतात.

CSS तंत्रज्ञान विकसित करताना, अतिस्फोटकाचा उपयोग करून विस्फोटक तथा यांत्रिक ऊर्जेद्वारे, काचसदृश Acrelic पासून बनविलेल्या विमानछताचे विच्छेदन अत्यंत कमी वेळात केले जाते.

जगभरातील सर्व प्रगत विमानांमध्ये अशा प्रणालीसाठी विमानछत विच्छेदन करायला १४०० मिलिसेकंद वेळ लागतो.

तर ‘तेजस’ Light combat aircraft (LCA) साठी तयार केलेल्या The Canopy Severance System (CSS)ला कार्य करायला केवळ १५ मिलिसेकंद लागतात.

नियंत्रित प्रस्फोट तरंग प्रसारणाचा (Controlled Propagation of Detonation Wave) उपयोग करून विमानछत विच्छेदन करून, वैमानिकास निर्गमनासाठी सुरक्षित मार्ग मोकळा करून दिला जातो.

जर The Canopy Severance System (CSS) नसेल आणि वैमानिक बाहेर फेकला गेला; तर त्याची मान, कंबर, पाठीचा कणा, गुढघे, पाय व घोटे इथे मोठ्या प्रमाणावर आघात होऊन, वैमानिकास इजा होऊ शकते.

तिथेच तो अर्धमेला होऊन अकार्यक्षम होऊ शकतो. म्हणून The Canopy Severance System (CSS) या वैमानिकाच्या जीवरक्षक यंत्रणेचा वापर अनिवार्य आहे.

जर ही यंत्रणा नसेल तर लढाऊ अथवा शिकाऊ विमानाला उड्डाणास परवानगी नसते. इतके The Canopy Severance System (CSS) महत्त्वाचे आहे.

The Canopy Severance System (CSS) यंत्रणेमध्ये तीन महत्त्वाचे विभाग आहेत :

१) प्रत्यक्ष विमानछत विच्छेदन करणारा विभाग.

२) प्रारंभिक प्रस्फोटक विभाग, ज्यामुळे The Canopy Severance System (CSS) कार्यान्वित होते.

३) कार्यान्वित झाल्यावर प्रस्फोट तरंग लहरी अतिशय नियंत्रित पद्धतीने व सुरक्षितपणे वहन करून, वरील दोन्ही विभागांना जोडणारी यंत्रणा.

The Canopy Severance System (CSS) तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाचे, अत्यंत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान म्हणजे;

उच्च दर्जाच्या अतिस्फोटकांचा खूप नियंत्रित उपयोग करून, शिसासारख्या मऊ धातूच्या आवरणात बनवलेली लघुरूप विस्फोटक रज्जू (Miniature detonating cord – MDC).

ही रज्जू म्हणजे दोरीच्या आकारातील एक लवचीक अतिस्फोटक असते.

“MDC’चा अतिशय कमी व्यासाचा अतिस्फोटकांचा स्तंभरूप गाभा प्रस्फोट तरंगाद्वारा विमानछत तोडून टाकतो.

MDC बनवण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असते व खूप वेळ खाणारी असते.

तसेच, नियंत्रित ऊर्जा वापर करायचा असल्याने ‘MDC’ ची गुणवत्ता व विश्वसनीयता मिळवण्यासाठीची प्रक्रिया खूप नियंत्रित असून, खूप प्रकारच्या चाचण्या वेळोवेळी घ्याव्या लागतात.

शिवाय, अतिविस्फोटक असल्याने खूप काळजीपूर्वक हाताळावे लागते.

स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख तिसरा:


प्रारंभिक प्रस्फोटकाद्वारा निर्माण झालेल्या प्रस्फोट तरंगाची गती प्रचंड असते. पाच ते आठ किलोमीटर प्रतिसेकंद गतीने हा प्रस्फोट तरंग MDCला कार्यान्वित करून, विमानछत तोडण्याचे कार्य करतो.

यासाठी प्रारंभिक प्रस्फोटक व MDC यांना जोडणारी आणि पूर्ण क्षमतेचे प्रस्फोट तरंग त्याच गतीने वाहून नेणारी यंत्रणा असते.

या यंत्रणेत विस्फोटक वहन-सूत्र (Explosive Transfer Lines (ETL)) आणि जोडाची पेटी (Junction box) यांचा उपयोग करतात.

ETL ही ‘MDC’ प्रमाणेच असते; मात्र याला वेगवेगळ्या पदार्थांच्या धाग्यांनी विणून थरावर थर वेष्टित करतात.

हे थर इतके मजबूत करतात की, ज्यायोगे आतून जेव्हा प्रस्फोट तरंग जातात, तेव्हा त्यांचा आतल्या आतच स्फोट होतो.

व त्याचा बाहेर काहीच परिणाम होत नाही. याची अशी रचना करण्याचे कारण म्हणजे, या तरंगांमुळे विमानातील अन्य प्रणाली.

विभाग व वैमानिक यांचे रक्षण होते; परंतु, विशिष्ट आकार दिलेली MDC मात्र कार्यान्वित होऊन विमानछत विच्छेदन होते..



Keywords

  1. The Canopy Severance System (CSS)

  2. Hindustan Aeronautics Limited (HAL)
  3. Defence Research and Development Organisation (DRDO)
  4. Aeronautical Development Agency (ADA)
  5. Atmanirbhar Bharat
  6. Design and DevelopmentSeat Ejection System
  7. In-flight Egress system – IES

  8. Power cartridge
  9. Ground Egress system – GES
  10. Controlled Propagation of Detonation Wave
  11. Miniature detonating cord – MDC
  12. Explosive Transfer Lines (ETL)
  13. Light combat aircraft (LCA)


स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख तिसरा:



Disclaimer:

This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through the writer © काशिनाथ देवधर, DRDO. This article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.



हे ही वाचा:

Agni 5 cha Dhamaka(Opens in a new browser tab)

 

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button