Weapons Mean Power
Weapons Mean Power…!
शस्त्र म्हणजे सामर्थ्य…!
© काशिनाथ देवधर, DRDO
स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख चौथा:
युद्धामध्ये सैनिक जी आधुनिक शस्त्रे वापरतात, त्याची माहिती करून घ्यायची असेल तर,
सर्वप्रथम शस्त्र म्हणजे काय?
शस्त्र कशाला म्हणतात?
शस्त्रांचे प्रकार कोणते आहेत?
या शस्त्रांचा उपयोग कोठे केला जातो?
हे सर्व जाणून घेतले पाहिजे…!
शस्त्राची व्याख्या करायची झाल्यास असे म्हणावे लागेल, की शस्त्र म्हणजे असे साधन.
ज्याद्वारे शत्रू अथवा लक्ष्य (Target) यास संपूर्णपणे किंवा अर्धवट नष्ट करणे किंवा निरुपयोगी करणे, इजा करणे सहज शक्य व साध्य होते.
ज्याच्याकडे आधुनिक शस्त्र आहे व ते चालवण्याचे कौशल्य असेल, तोच युद्धामध्ये विजयी होऊ शकतो.
शस्त्राचा उपयोग पाषाणयुगापासून शिकारीसाठी, तसेच स्वसंरक्षणासाठी केला गेला आहे.
दगडगोटे फेकून मारणे यामध्ये दगड हेच शस्त्र होते. हळूहळू स्पर्धा, टोळ्या, रक्षण अशा अनेक कारणांमुळे सरस शस्त्रे असण्याची गरज भासू लागली.
गरज हीच शोधामागची प्रेरणा असल्याने टप्याटप्याने नवीन शोध लावले गेले. शस्त्राची मारकता, भेदकता वाढवण्यासाठी लोखंड, पोलाद यांचा उपयोग करून छुरी, बरची, तलवार, दांडपट्टा, गदा अशा प्रकारची शस्त्रे विकसित झाली.
भाला, धनुष्यबाण इत्यादी प्रकारची शस्त्रे १६ व्या शतकापर्यंत बलस्थान म्हणून ओळखली जात.
मग ती “छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार” किंवा “बाजीप्रभू देशपांडे” यांनी घोडखिंडीत शत्रूची पलटण अडविण्यासाठी दोन्ही हातांत घेतलेल्या समशेरी.
या सर्व प्रकारच्या शस्त्रामागे मानवी ‘बाहुबल’ म्हणजेच स्नायूंमधील ऊर्जा वापरली जात असे. म्हणूनच ज्याची शरीरसंपदा बलदंड, त्याचा विजय असायचा.
शस्त्रांच्या विकास व संशोधनामध्ये १६ व्या शतकातील एका घटनेने एक वेगळीच दिशा घेतली ती घटना म्हणजे सुरुंगाची बारुद, गन पावडर (Gun Powder) किंवा ब्लॅक पावडर (Black Powder) म्हणून लागलेला शोध.
चारकोल (कोळसापूड), सल्फर (गंधक) व सॉल्ट पीटर (पोटॅशियम क्लोरेट) यांचे विशिष्ट प्रमाणात केलेले मिश्रण म्हणजे “गन पावडर”.
या शोधापासून मानवी शक्तीऐवजी ‘Gun Powder’ मध्ये साठविलेली रासायनिक स्वरुपातील स्थितीज ऊर्जा उपयोगात आणून विविध शस्त्रे बनविली गेली, जसे बंदूक.
गेली दोन-तीन शतके साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आणि जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असणारी धडपड यांमुळे अभिकल्पन केलेली शस्त्रे.
म्हणजे रणगाडे, तोफा, क्षेपणास्त्रे वगैरे. या सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये नवीन पदार्थ (Materials), धातू (Metal & Alloys), संमिश्र धातू स्फोटके (Explosives), नोदके (Propellants) आणि Electronics, Instruments, Radar यंत्रे या नव्या शोधांचा एकत्रित प्रयोग केलेला असतो.
पाण्यामधील लढाईसाठी लागणारी नौदलीय शस्त्रे (Naval Armaments), अवकाशातून वापरायची वायुदलीय शस्त्रे (Air Armaments), जमिनीवरील लढाईत वापरण्याची भूदलीय शस्त्रे’.
तसेच देशाच्या संरक्षणासाठी बनवलेली क्षेपणास्त्रप्रणाली अशा विभागात ही शस्त्रे संमीलित केलेली असतात.
स्वातंत्राचा अमृत महोत्सव, निमित्त लेख चौथा:
Weapons Mean Power
शस्त्र म्हणजे सामर्थ्य
Keywords:
Weapons Mean Power
शस्त्र म्हणजे सामर्थ्य
छत्रपती शिवाजी महाराज;
भवानी तलवार;
बाजीप्रभू देशपांडे;
काशिनाथ देवधर;
स्वातंत्राचा अमृत महोत्सव;
Gun Powder;
Black Powder;
Explosives;
Propellants;
Electronics;
Instruments;
Radar;
Naval Armaments;
Air Armaments;
This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through the writer © काशिनाथ देवधर, DRDO. This article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, and entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.