My title My title
Something Different

The Rise & Leap of India’s weaponry till the date

The Rise & Leap of India’s Weaponry Till The Date…!

भारताच्या शस्त्र सिद्धतेचा उदय आणि आज पर्यंतची उत्तुंग झेप…!



@Kashinath Deodhar,

Senior Scientist, Group Director Armament Research and Development Establishment



सर्व प्रथम टीम itworkss कडून Kashinath Deodhar सरांचे मनपुर्वक आभार, कारण त्यांनी  त्यांचे लेख

itworkss ला ब्लॉग वर पोस्ट करण्याची संधी दिली.



स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख पहिला:

१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत स्वातंत्र होऊन ७५ वर्षे पुर्ण होतील आणि या निमित्ताने आजच्या स्थिती पर्यंत भारतीय शस्त्रास्त्रे कशी कशी विकसित होत गेली याचा थोडक्यात घेतलेला आढावा.



आज भारत हा जगाच्या पाठीवर एक महासत्ता होऊ घातलेला देश आहे. विज्ञानतंत्रज्ञान याच्या जोरावर सर्व क्षेत्रात भारताने उत्तुंग झेप घेतली आहे. कृषी, पशुपालन, दूध उत्पादन, अनधान्य अशा प्राथमिक गरजांसाठी हरितक्रांती, धवलक्रांती द्वारे स्वयंपूर्णव स्वावलंबी झालो यासाठी प्राधान्यक्रम होता. अवकाश क्षेत्रातही आपण वर्चस्व स्थापित केले आहे.

उपग्रह (कृत्रिम) प्रणाली, प्रक्षेपक प्रणालीसह चांद्रयान, मंगळयान अशा मोहिमा यशस्वी करून तसेच एकाच प्रक्षेपकाद्वारे 104 उपग्रह त्यातही भारताचा एक मुख्य व एक लघु उपग्रह (nano) आणि अमेरिकेचे 96 व 6 अन्य देशांचे प्रत्येकी एक उपग्रह वेगवेगळ्या ठरवलेल्या निश्चित कक्षेत यशस्वी स्थापित करण्याचा पराक्रम 15 फेब्रुवारी 2017 रोजी केला.

सध्या गगनयान व अवकाशस्थानक मोहिमांची तयारी जोरात दिसते आहे. परमाणू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर कार्य करुन सर्व प्रकारच्या अण्वस्त्रांबरोबरच अणुउर्जा क्षेत्रातही स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहोत. “केसरीक्रांती”च्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होईल असे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

औषध निर्माण, स्वास्थ्य व चिकित्सा, रस्ते, पूल, धरणे, बोगदे निर्माण याचेही तंत्रज्ञान विकसित करून पायाभूत सुविधा निर्माण कार्य करुन उद्योगव्यापारासाठी सरलतेने वाढ तसेच पर्यटन विकास याला चालना दिलेली आहे.

वाहतूक सुलभतेसाठी जलमार्ग, वायुमार्ग, बंदरे, विमानतळ विकसित करणे बऱ्याच अंशी प्रगतीपथावर आहे. संगणकीय प्रणालीचा विकास व पायाभूत सुविधांमुळे आंतरजाल (इंटरनेट) द्वारा बरीचशी कामे सहज व

सुलभ होऊ लागली आहेत. एकंदरीत सर्वच क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञान आधारे भारत अग्रेसर होत आहे व नवनवीन उपाय शोधूनसमस्यांवर मात करत आहे. अशा खंडप्राय भारताची अखंडता, एकात्मता व सार्वभौमत्व टिकविण्यासाठी सशस्त्र सेनाबलांच्याद्वारा भारत सरकार करत असते.

सीमासुरक्षा व अंतर्गत सुरक्षा गृहमंत्रालय पाहते तर बाह्य आक्रमणांपासून सुरक्षा, युद्ध यासाठी रक्षा मंत्रालय कार्यरत असते. जमिनीवरील युद्धासाठी भूसेना, समुद्रावरील युद्धासाठी नौसेना’ तसेच हवेतून होणाऱ्या युध्दांसाठी, हल्ले प्रतिहल्ले यासाठी ‘वायुसेना’ आणि सर्वांच्या समन्वयासाठी व निर्णयासाठी ‘एकात्मिक सेना’ (Integrated Staff) 24×7 कार्यरत असतात. अतिदूर समुद्र, अवकाश, सायबर (संगणकीय) युद्धासाठी विशेष दलांकडे कार्य सोपवले जाते.


स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख पहिला:


आज भारताकडे सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे त्यासाठीचे स्वदेशी तंत्रज्ञान आत्मसात केलेले व विकसित केलेले आहे. सर्व प्रकारचे अणुबॉम्ब, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, लढाऊ विमान, तोफा, रणगाडा, अग्निबाण, लघुशस्त्रे, गटशस्त्रे याबरोबरच युद्धसामुग्री, दारुगोळा, विविध साधने, रडार यंत्रणा, संयंत्रे आदी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन आपल्या सशस्त्र सेनांना मजबूत बनवले आहे.

पुनश्च हरी ओम!

स्वातंत्र्यपूर्वकाळात महायुद्धाचा विचार करुन इंग्रजांनी भारतामध्ये दारुगोळा कारखाने सुरु केले व शस्त्रास्त्रे, दारुगोळा येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाऊ लागले. परंतु अशा सर्वांचे आरेखन व अभिकल्पन इंग्लंडमध्ये होत असे. भारतामध्ये कारखान्यातीलसर्व अधिकारी, निरीक्षक हे इंग्रज होते व केवळ कामगार व मदतनीस मात्र भारतीय बहुधा अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असत.

15 ऑगस्ट 1947 नंतर हळूहळू सर्व अधिकारी परत इंग्लंडला परतले आणि भारतीय कामगार अथवा कमी दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांवर, सेनाधिकाऱ्यांवर ही कारखाने चालू ठेवण्याची जबाबदारी आली आणि भारतीय शस्त्रास्त्र विकास सुरु झाला.

पहिली बारा-तेरा वर्षे म्हणजे 1960 पर्यंत ज्या शस्त्रास्त्र प्रणाली दारुगोळा जेथे बनवला जात होता त्याचेच उत्पादन सुरु ठेवणे व त्याचा अभ्यास करुन प्रत्येकाची रचना, कार्य समजावून घेण्यात गेली.

असणारी शस्त्रे व दारुगोळा गुणवत्तापूर्वक होण्यासाठी निरीक्षणालये होती त्यांनाच जुजबी दुरुस्ती, दोष तपासणी व निवारण करुन उत्पादनातील समस्या कमी करुन सशस्त्र दलांना शस्त्रास्त्र व दारुगोळा पुरवठा करावा लागे.

गोलाबारुद कारखाना खडकी (Ammunition Factory Khadki), तोफ कारखाना जबलपूर (Gun Carrige Factory), गन अँड रोल फॅक्टरी काशीपूर (GSF) व रायफल फॅक्टरी इशापुर (RFI) या कलकत्ता येथे कारखान्यांमधील निवडक अनुभवी निरीक्षक यांच्याकडे नवीन जबाबदारी देऊन Technology Department Board (TDB) केले गेले व 1958 पर्यंत विकास कार्य त्याद्वारे साधले.

1 जानेवारी 1958ला रक्षा अनुसंधान तथा विकास संगठन” अर्थात Defense Res & Dev Estt (ARDE) ची स्थापना केली. ARDE मध्ये सर्व प्रकारची पारंपारिक शस्त्रास्त्रे संशोधन व विकास करण्याची जबाबदारी देण्यात आली.

TDB बरोबरच पुणे, जबलपूर व कलकत्ता येथील कारखान्यांमधील R&D विभागातील तज्ञ ARDE मध्ये सन्मानित करण्यात आले. पहिले तप(1958 ते1970) हाकालखंड ARDE साठी शिकण्याचा जास्त व प्राथमिक स्वरुपात शस्त्रास्त्रांच्या रचना करण्याचा होता.

परंतु 1962 मधील चीनकडून झालेल्या पराभवानंतर शोध कार्याने गती घेतली व इंग्रजांपासून आलेली 25 पाउंडर तोफेचा अभ्यास करुन प्रथमच 74/24 PackHow ही डोंगरी तोफ बनवली.

1965 च्या युद्धात हीच पहिली भारतीय तोफ सेवेत होती. सर्व प्रकारे आवश्यकतांची पूर्तता करुन सैन्यदलाच्या विविध कठीण चाचण्या पार करत नंतर सैन्यदलाच्या तोफखान्यात सेवेत रुजू झाली. पहिल्याच तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ रचना अशी केली होती की डोंगरी भागात खेचराद्वारा वाहतुकीस योग्य अशा पद्धतीचे विभागून ती तोफ 6 तुकड्यात सहज व जलद मोकळी करता येईल.

या खेचरांद्वारे तुकड्यांचे वजन व गुरुत्व मध्य यांच्या मर्यादा जागा लक्षात घेऊन 6 खेचरांवर लादण्यात येते. खेचरांद्वारा डोंगरीवाटांमधून ती डोंगरमाथ्यावर अथवा योग्य जागी उंचीवर नेल्यावर ती सोडवून ते सर्व भागांचे त्वरित काही मिनिटात एकत्रीकरण करून डोंगरावर तोफ सिद्ध केली जाते व शत्रूवर डागण्यासाठी सज्ज ठेवली जाते.

या तोफेस Mule Pack सुविधा केल्यामुळे 1971च्या युद्धात भीमपराक्रम केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज हवाई वाहतूक शक्य झाल्याने व जुने तंत्रज्ञान झाल्याने 75/24 PackHow” ही डोंगरी तोफ सेवानिवृत्त झाली. तोफेची निर्मिती ARDE ने तर उत्पादन OFBने केले.

तोफ विकसनास गती

पहिल्याच तोफेने यश दिल्याने DRDO चे काही शास्त्रज्ञ, OFB/ GCF फॅक्टरीतील काही उत्पादन तज्ञ आणि गुणवत्ता आश्वासन व निरीक्षणालयातील अनुभवी निरीक्षक यांचे मिळून एक विशेष ‘तोफ विकसन गट’ (Gun Development Team) यांचे गठन GCF जबलपूर येथे करण्यात आले. पहिल्या तोफेचा यशस्वी अनुभव होताच.

या तोफगटा (GDT)कडे “भारतीय मैदानी तोफ (Indian Field Gun) निर्माण करण्याचा आदेश दिला. पहिली तोफ 75/24 PackHow याचे कॅलिबर 75mm होते तर आता IFGचे कॅलिबर 105mm म्हणजेच तोफगोळ्यांच्या व्यास 105mm आणि 105mm IFG तोफ व तोफगोळे यांची निर्मिती GDT ने यशस्वी करुन भारतीय सेनेच्या तोफखान्यात सेवारत होती व आजही आहे.

तसेच 105mm – LFG (Light Field Gun) याचीसुद्धा निर्मिती यशस्वीपणे केली. जबलपूरच्या तोफगाडी कारखाना (GCF) द्वारे गरजेप्रमाणे उत्पादन करुन सैन्यास पुरवठा केला. साधारणपणे 1970 ते 1980 च्या दशकात ही जशी तोफ केली तसेच विजयंत रणगाडाचे उत्पादन होते. – रशियन T-55 रणगाड्यावर विजयंतची 105mm व्यासाची तोफ बसवून T-55 UG (Upgunned) Tank #RIGIH उपलब्ध करून दिला. 1980 नंतर विविधनवनवीन शस्त्र प्रणाली विकसित करायला घेतली.

भारतीय लघुशस्त्र प्रणाली INSAS यांचे आरेखन व विकास 1990 पर्यंत पूर्ण केला. रायफल व LMG (Light Machine Gun) याच्या सर्व उपभोक्ता चाचण्या तसेच सर्व टूप ट्रायल्स (Troop Trials) यशस्वी करुन सैन्याच्या पायदळाच्या सेवेत दाखल झाले.

गटशस्त्रांमध्ये 51mm कॅलिबरची एका जवानाला सहज वाहून नेता येणारी व आपल्या जवानांच्या तुकडीमागे राहून पुढील शत्रूवर हल्ला करु शकणारी तोफगोळ्यांचा भडीमार करणारी उखळी तोफ आणि तोफगोळे यांची निर्मिती ARDEने यशस्वी करुन ऑर्डनन्स फॅक्टरीने उत्पादन करुन सैन्यास पुरवठा केला.

1980-90 च्या दशकात अनेक प्रणाली विकसित करायची सुरुवात झाली. त्यामध्ये INSAS रायफल, LMG व अॅम्युनेशन याचबरोबर उखळी तोफा व तोफगोळे उदा 51mm, 81mm, 120mm MORTARS & Bombs, अर्जुन रणगाडा व तोफगोळे विकास, पिनाक 55-45 MBRL बहुनलिकीय अग्निबाण प्रणाली, नौदलीय शस्त्रे, समुद्री सुरुंग, तोफ, रॉकेट वगैरे वायुदलीय शस्त्रे ड्रॉप बॉम्ब, क्षेपणास्त्र विकास बॉम्ब (Warheadsयुध्दशीष) अशा सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्र प्रणाली विकास करण्याची सुरुवात या दशकातच झाली.

1980 पर्यंत अशा प्रकल्पांना व कार्यक्रमांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये त्याचबरोबर मनुष्यबळ विकास अनुभव प्रशिक्षण सुरु होते. या सर्व शस्त्रास्त्र विकासामध्ये अभियांत्रिकी बरोबरच स्फोटके, नोंदके, पायरोटेक्रिक, प्रस्फोटके, उच्चउर्जा पदार्थ यांचा उपयोग आणि सुरक्षा व विश्वसनीयता अशा सर्वच तज्ञांची गरज होती ती ही विकसित केली.

क्षेपणास्त्र निर्मिती

1983 मध्ये हैदराबाद स्थित DRDL प्रयोगशाळेत IGMDP (Integrated Guided Missile Development Progam) एकीकृत निर्देशीत क्षेपणास्त्रे विकास कार्यक्रम डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली DRDO मध्ये सुरु केला.

यासाठी डॉ. एमजीके मेनन व डॉ. राजा रामण्णा यांनी ISRO मधून इकडे डॉ. कलाम यांना DRDO कडे आणले. एकाच वेळी पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नागअग्नी या पाच जागतिक दर्जाच्या क्षेपणास्त्रांचा विकास एकाच वेळी समांतररित्या केला व पाचही क्षेपणास्त्रे यशस्वी केली.

“पृथ्वी” हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे शंभर किलोमीटर पल्ला असणारे तर “अग्नी” हे एक हजार किलोमीटर पल्ला असणारे बॅलिटिक क्षेपणास्त्र, “आकाशहे जमिनीवरून हवेतील लक्षवेध करणारे 24-30 किमी पल्ला असलेले तर “त्रिशूल’ जलद प्रतिक्रिया देणारे कमी पल्ला म्हणजे सहा ते नऊ किमी जमिनीवरून डागले जाणारे व हवेतील शत्रूलक्ष्य उदा.

शत्रूचे लढाऊ विमान अथवा कमी उंचीवरून उडणारे क्षेपणास्त्र अचूकतेने टिपून पाडण्यासाठी तयार केले. “नाग” हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश मिळवलेच परंतु भारतीय शास्त्रज्ञांमध्येही इतका आत्मविश्वास आला की आज आपण जगातील कसलेही, कोणतेही क्षेपणास्त्र भारतीय तंत्रज्ञान विकसित करु शकतो.

हे “अग्नी-5” ICBM (Intercontinental Ballistic Missile) म्हणजेच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व “ब्राह्मोज सारखे स्वप्नातीत (Supersonic) क्षेपणास्त्र आणि “A-SAT” हे उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र विकसित करुन जगाला सामर्थ्याचा परिचय दिला आहे. संपूर्ण जगाचा विरोध झुगारून भारताने 1998 च्या 11 मे ला 3 व 13 मेला दोन.

प्रत्यक्ष अणूचाचण्या करुन अण्वस्त्र संपन्न देश असल्याचे जगाला दाखवून भारत हा शक्तीचाच उपासक असल्याचे मा. अटलजी, तत्कालिन पंतप्रधान यांनी जगासमोर 11 मे 1998 रोजी घोषित केले.

सर्व क्षेपणास्त्रांचे मुख्य जोडणी काम तसेच निर्देशक व नियंत्रण प्रणाली विकास प्रामुख्याने हैदराबाद स्थित संस्थांनी केला. तरी क्षेपणास्त्रांचे युद्धशीर्ष बॉम्ब हे ARDE पुणे, सर्व नोदके, (Propellant) उच्च व अतिस्फोटके, विस्फोटके, प्रस्फोटके अशी सर्व प्रकारचे पदार्थ HEMRL पुणे आणि सर्व क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपक (लाँचर) RDE (Engrs) got a DRDOZZIT प्रयोग शाळांमधून केले जाते.

अन्य साहित्य निर्मिती:

भारताला युद्धामध्ये उपयोगी सर्व महत्त्वाच्या शस्त्रास्त्र प्रणालींबरोबरच अन्यान्य वस्तू, यंत्रे, सयंत्रे, रडार, उबदार कपडे, लढण्या योग्य कमी वजनाचे परंतु दणकट कपडे, NBC सुरक्षा सूट, इलेक्ट्रॉनिक्स व संगणकीय प्रणाली, जीवन विज्ञान, औषधे,साधने, अत्र, पाणी आदी राहण्याच्या जागा, तात्पुरती घरे, सुरक्षित बंकर वगैरे बरोबरच जनरेटर, संवाद यंत्रणा, Wired or Wireless Communication System BRIT अनेक विविध गरजा भागवण्यासाठी 50 पेक्षा जास्त संस्था/प्रयोगशाळा कार्यरत असून देशभर विखुरलेल्या आहेत.

त्याचे तंत्रज्ञान साधयामुळे सात तंत्रज्ञान समूह (Technology Cluster) मध्ये विभागणी केली आहे व अपेक्षांनुसार

आपूर्ति केली

जाते. याचे उत्तम उदाहरण ‘म्हणजे कोविड महामारीमध्ये जीवन विज्ञान गटाने समाजाला दिलेली औषधे, समुपदेशन व तंत्रज्ञान, समाज जीवन सुकर केले.

युद्धासाठी आवश्यक असलेल्या मोठ्या शस्त्रास्त्रांबरोबरच ग्रेड लॉन्चर, धक्कारहित तोफ RCL, फ्लेम थ्रोअर (सध्या बंदी आहे). भूसुरुंग, समुद्री सुरुंग, नौदलीय शस्त्रास्त्रे, टाडो, वायुदलीय शस्त्रे, बॉम्ब हे आवश्यकतेनुसार बनवले आहेत व सध्या सेवेत आहेत. भारताने आता सर्व स्तरांची शस्त्रास्त्र तंत्रज्ञान विकसित केले आहे.

भूसुरुंगामध्ये विभव, विशाल, उल्का, पार्थ, अदृश्य, प्रचंड अशी मालिकाच दिमतीला असून ते सेनादलांच्या सेवेत आहेत. 84mm हलक्या वजनाची तोफ 84mm MLS (Multiple Launcher System) चा पुरवठा करुन सेनादलांच्या गरजा भागवल्या जात आहेत तशा वाढीव गरजा समोर येत आहेत.

युद्धास वेगळे आयाम देणारे LCATejas तेजस हे भारतीय लढाऊ विमान, विमानछत विच्छेदन प्रणाली (CSS), शक्ती काडतूस संच (Power Cartridges)

अशा सामरिक महत्त्वाच्या (Missian Criticle) की जे असल्याशिवाय वैमानिक जीवरक्षक यंत्रणा अपूर्ण राहते व CSS/Power “Cartridges या खूप खूप मोक्याच्या व अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित करुन देश स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

PZT या Pizo ceramic क्षेत्रातही खूप महत्त्वाचे संशोधन केले आहे. याचा उपयोग Sonar साठी Sensors म्हणून करुन पाण्यातील संवाद शक्य झाला आहे.

आज भारताने भारतीयतोफखान्यासाठी ‘पिनाक हे बहुनलीकीय अग्निबाण प्रक्षेपण प्रणाली विकसित करुन त्याच्या सात रेजिमेंट कार्यरत आहेत व पुढील पाच वर्षात अजून 6 रेजिमेंट पिनाकच्या करण्याचा आदेश रक्षा मंत्रालयाने दिला आहे.

‘पिनाक नावाप्रमाणेच शिवधनुष्य असून एक बॅटरी केवळ 44 सेकंदात 72 रॉकेटचा मारा करुन शत्रूचा एक स्क्वेअर किमी तळ बेचिराख करु शकतो. त्याचा पल्ला 38 किमी होता तो वाढवून 50 किमी केला आहे.

याचे उत्पादन दोन भागात आहे. ट्रकसह प्रक्षेपक खासगी उद्योगाने (टाटा व एल अँड टी) व अग्निबाण (Rockets) हे औषध निर्माणीच्या कारखान्यात केले जाते.

‘पिनाक-2’ 80 किमी रेंज साठी विकसित केले जात आहे तर निर्देशन व नियंत्रण प्रणालींची जोड देऊन 120 किमी पल्ला तरीही जास्तीची अचूकता देणारे “पिनाक निदर्शित” (गायडेड) विकास कार्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे व यशस्विततेनंतर सशस्त्र सेनांच्या सेवेत दाखल होतील. ‘पिनाक’ ही अतिशय क्लिष्ट यंत्रणा विकसित करुन भारताची ताकद वाढवणारी आहे.

पिनाकची एक बॅटरी सहा लॉन्चर वाहने, 6LCR (Loadercum-Replenishment) वाहने, तीन RV वाहने (Replerishment Ven.) दोन CPV (Command Post Veh.) वाहने, दोन रिपेअर वाहने, एक रडार, एक मेटरडार वाहन असा ताफा सोयीच्या व रसद पुरवठा दृष्टिकोनातून सर्व वाहने Tata 8×8 किंवा Tartra 8×8 अशी आहेत.

युद्धकाळात शत्रूवर अक्षरश: अग्नीवर्षाव करणारे ‘पिनाक प्रणाली आत्मनिर्भर भारतातील महत्त्वाचा वाटा उचलणारे शस्त्र स्वदेशी तंत्रज्ञान आधारित आहे.

आधुनिक रणगाडे:

असेच महत्त्वाचे शस्त्र म्हणजे रणगाडा, MBT अर्जुन, युद्धांमध्ये रणगाड्यांचे वेगळेच महत्त्व असते. जबरदस्त ताकदीची 120 मिमि व्यासाची तोफ, अभेद्य कवच आणि चपळता या तिन्हींचा सुवर्णमध्य साधून बनवलेला स्वदेशी रणगाडा.

128 रणगाडे नुकतेच मा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सेनेकडे सुपूर्त केले व अजूनही 118 रणगाडे बनवण्याचा कार्यादेश दिला व येत्या पाच वर्षात हे रणगाडेही रेजिमेंटकडे सुपूर्त होतील. हा सुद्धाआत्मनिर्भरतेकडे अजून एक पाऊल टाकायचा वज्रसंकल्पच होय.

तोफ विभागात ATAGS ही अद्ययावत व अत्याधुनिक तोफ या प्रकारात सर्वात लांब पल्ला (Range) देणारी ही तोफ सेवेत संमिलित व्हायच्या शेवटच्या चाचण्यांमध्ये असून लवकरच भारतीय तोफदलात संम्मिलित होईल यात शंका नाही.

155 मिमी x 52 कॅलिबरची ही तोफ भारत फोर्ज, टाटा, महेंद्र डिफेन्सया खाजगी उद्योगांद्वारे उत्पादन करण्यात येत आहे व सुरक्षा मंत्रालयाने तशी मोठी तजवीज करुन आदेश देण्यात आला आहे. सर्व चाचण्या पूर्ती नंतर त्या सेवेत दाखल होतील.

भारतीय बनावटीची पाणबुडी अरिहंत प्रकारच्या सहा पाणबुड्यांचे उत्पादन ‘नुकतेच DRDO द्वारा HSTDV (Hyper Sonic Technology Demonstrator Vehical), पृथ्वी एअर डिफेन्स (PAD) अॅडव्हान्स एअर डिफेन्स याप्रमाणे विकसित केलेली द्विस्तरीय 15-30km Endro Atmosphere आणि 60-90km Exo- Atmosphere) बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स प्रणाली, रुद्रम Anti-radiation प्रणाली, हवेतून जास्तीत जास्त मार्गक्रमण आवाजापेक्षा जास्ती वेगाने टापेंडो नेऊन शत्रूलक्ष्य, पाणबुडीच्या जवळ तो पाण्यात अलगद सोडून हल्ला चढवण्याची यंत्रणा आपल्या भारताच्या संरक्षण सिद्धतेस बळ देणाऱ्याच आहेत.

हवाई दलामध्ये भारतीय बनावटीची “LCA-तेजस’ विमानांची पलटण (Squadron) संम्मिलित करुन मोठे पाऊल आत्मनिर्भरतेकडे टाकले. DRDO निर्मित HAL उत्पादित विमाने हवाई दलाच्या युद्धात प्रमुख भूमिका निभावू शकतात. I0CR FOC अशा सर्व प्रकारच्या कठीणात कठीण चाचण्या ‘तेजसने लीलया पार केल्या व याच वर्षी 83 तेजस लढाऊ व शिकाऊ विमानांसाठीचा कार्यादेश HALला मिळाला.

अशा रीतीने रिव्हर्स इंजीनियरिंग पासून सुरुवात केलेला शस्त्र विकास हा जागतिक स्तराच्या सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्र प्रणालींचे अद्ययावत व अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून भारत सशक्त व सुसज्ज झाला आहे.

येत्या दशकात भारत हा सर्व जगाला शस्त्रास्त्र पुरवठा करायला सुरु करेल. सर्वच क्षेत्रात भारताने भरारी घेतली आहे आणि शस्त्रास्त्र संरक्षण अंतरिक्ष व अणुऊर्जा क्षेत्रातील ही उत्तुंग झेप भारतमातेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करुन देईल व भारत विश्वगुरु बनेल.

एकशेतीस कोटी भारतीयांनी हाच संकल्प करायची व कार्य करण्याची गरज आहे.





स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख पहिला:

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

One Comment

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button