Something Different
कर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन ! वाचा कोणते..?

कर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन ! वाचा कोणते..?
©Vishal Shirsat
जबरदस्त, वास्तविक, अक्षरशः चित्रपट बघताना तीन तास अंगावर शहारे असणार !
मारी सेल्वाराज यांना मुरब्बी दिग्दर्शक म्हणावं लागेल कारणही तसेच आहे.
चित्रपटातील प्रत्येक सीन एवढ्या काळजीपूर्वक, क्रिएटिव्हपणे मांडलाय की अंगावर शहारे आणून सोडतोच व समाजातील नीच व्यवस्थेचं रूप दाखवतो आणि त्याविरुद्ध असणारा प्रतिकार.
कर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन !
१. बसस्टॉपसाठी लाख विनवण्या करून देखील बस थांबत नसते, एक गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये जायचे असते व अचानक रस्त्यात त्रास होतो तरीही कुणीही बस थांबवत नाही.
फँड्रीमध्ये जब्याने व्यवस्थेवर फिरकवलेला दगड व या चित्रपटातील त्या महिलेच्या मुलाने बसच्या दिशेने फिरकवलेला दगड इथे जास्त भावतो व व्यवस्थेबद्दलची असणारी चीड दाखवतो.
आणि एवढंच नाही तर त्यानंतर कर्णन जो तांडव करतो त्याला तर तोडच नाही तो दाखवून देतो.
की हक्क व मूलभूत अधिकार जर याचनेने मिळत नसतील तर ते व्यवस्थेच्या कानशिलात लगावून मिळवायचे असतात.
२. आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करून निर्दोष वृद्धांना तिथला पोलीस अधिकारी तुच्छ भावनेतून जबर मारहाण करतो.
व त्यांच्यावर दुसऱ्या शहरातील दंग्यांच्या खोट्या केसेस दाखल करून अमानवीयपणे पोलीस स्टेशनच्या वर उन्हात फेकून देतो.
हा सर्व प्रकार कळल्यानंतर व्यवस्थेच्या विरोधात कर्णनने केलेला तांडव व चीड काळजाच्या आरपार गेली.
३. कर्णनची मिलिटरीमध्ये निवड होते, अशा परिस्थितीत देखील त्याला गावामधील नागरिक जाण्यास सांगता कारण तो पहिला व्यक्ती असतो जो सरकारी सेवेत रुजू होणार असतो.
गावातील लोकांची भावना असते की आम्ही आज आहोत उद्या नाही पण आपली येणारी पिढी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे तू पुढे गेलास तर येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल पण व्यवस्थेला काही औरच मंजूर असते.
पोलीस स्टेशनवर झालेली तोडफोड, सरकारी मालमत्तेचं नुकसान ही कलेक्टरला दिसते पण गुन्हा नसताना केवळ जातीय मानसिकतेतून आपल्या पदाचा गैरवाफर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चुकी दिसत नसते ना नाव विचारनारी मानसिकता ना त्यातील द्वेष.
कारण तेही व्यवस्थेचे समर्थक, गुलाम.
याच गोष्टीला पुढे करून ते आपल्या पदाचा गैरवापर करीत गावात जो आमनवीय नंगानाच करतात.
तो व्यवस्थेबद्दल अत्यंत चीड व संताप आणणारा आहे. भयाण.
गावात झालेला आमनवीय प्रकार, जेव्हा कर्णन ला कळतो तेव्हा मात्र सैनिकी नौकरीसाठी त्याला घेऊन जाणारे त्याचे वडील देखील त्याचा हात सोडत त्याच्या हातात तलवार देतात व व्यवस्थेबद्दल असणारा संताप व्यक्त करतात.
इथे मात्र अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो.
४. पोलीस अधिकाऱ्याला आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करून देखील ना त्याची जाणीव असते ना शर्म ना हया !
एवढं आमनवीय कृत्य केलेले असताना देखील तो कर्णनला त्याच्या पाया पडायला सांगतो माफी मागायला लावतो.
आपले नाक पायासमोर घसयाला लावतो आणि उद्गारतो तू माझे काही करू शकत नाही.
एवढे करून देखील तुझ्या समोर गावाला उध्वस्त करून टाकेल.
पोलीस अधिकाऱ्याला ठार करून व्यवस्थेबद्दलची चीड व्यक्त करतो.
चित्रपटात असे अनेक सीन आहेत जे डोक्याला पार मुंग्या आणून सोडतात जसे…..
१.मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणारी व्यवस्था व मानसिकता.
२.गाढवाच्या पायाला बांधलेल्या दोऱ्या व त्या दोऱ्या तोडून त्याला गुलामीतून मुक्त करणारा कर्णन.
३. एकीकडे शाळेत शिकायला चाललेली मुले दुसरीकडे व्यवस्थेमुळे पायात बांधलेली दोरी घेऊन लंगडत चाललेला गाढव.
४. कब्बडीच्या मॅचमध्ये जिंकलेले असताना देखील पराभव आणि याबद्दल व्यवस्थेला प्रतिप्रश्न केला की भांडणं.
५. तुम्हाला कुणी भीक नाही देत आहे पाया पडण्याची प्रथा आता सोडा हे वारंवार गावातील लोकांना सांगणारा कर्णन याव्यतिरिक्त अजूनही बरेच.
आजपर्यंतचा इतिहास आहे हक्क व मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी लोकांनी जेव्हा जेव्हा व्यवस्थेच्या विरोधात चीड दाखवली की,
सरकारी मालमत्तेचं नुकसान असतंय, वेगवेगळी कलमे लावली जातात, गुन्हे दाखल होतात ज्याची वाट इथली सरंजामी व्यवस्था बघून असते.
सर्वाना कायदा हातात घेतलेला दिसतो पण त्यांनी असे का केले असेल याचा विचार कुठेच होत नाही.
चित्रपटात देखील अत्यंत प्रभावीपणे हेच मांडलंय आहे, विशेष म्हणजे हा चित्रपट १९९७ मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.
संघर्षातून, त्यागातून, बलिदानातून शेवटी गावात सर्व मूलभूत सुविधा, बसस्टॉप, सरकारी दवाखाने व शाळा बनतात.
चित्रपटातील शेवट काळजात घर करून जातो, गावात दहा वर्षांपासून कुठलाच उत्सव, सण साजरा झालेला नसतो.
जेव्हा कर्णन दहावर्षानंतर गावात परततो आपली माणसं गमावल्याचं डोंगराएवढं दुःख असताना देखील गावाच्या आनंदात अगदी मनमोकळ्यापणाने सहभागी होतो.
एकदा बघाच हा चित्रपट.