Brain StormingSomething Different
Mystery Behind the Power of Rudraksha- Part 2
Mystery Behind the Power of Rudraksha Part -2
गुढ रहस्यमयी नऊमुखी, दशमुखी, अकरामुखी, बारामुखी, तेरामुखी, चौदामुखी आणि पंचदशमुखी रूद्राक्ष
©Anna®2021
ऐश्वर्यसंपन्नतेसाठी – नऊमुखी रूद्राक्ष
नऊमुखी रूद्राक्ष दुर्मिळ आहे. देवीचा वारसा असलेले हे रूद्राक्ष दुर्मिळ आणि कडक आहे. पारंपारिक शास्त्रानुसार याचे नाव ‘भैरव’ असे आहे.
नऊमुखी रूद्राक्ष हे ऋषीमुनींचे प्रतीक समजले जाते. ते डाव्या हातात धारण करणे श्रेयस्कर समजले जात असले तरी रूद्राक्ष हे गळ्यात धारण करणेच सोयीचे ठरते.
नवदुर्गा, नवप्रकारांनी हा सहाय्य करणारा रुद्राक्ष नवदुर्गा देवीचे प्रतीक आहे. विद्या, धन, सुख, ऐश्वर्य, मोक्ष, यश, कीर्ती, प्रतिष्ठा महत्वाचे म्हणजे परमेश्वराची प्राप्ती या रुद्राक्षधारणेने होते.
हा रूद्राक्ष नवशक्ती किंवा भैरवाचे प्रतीक मानला जातो. दुर्गेचा याला पूर्ण आशिर्वाद आहे.
हे रुद्राक्ष दुर्मिळ असल्यामुळे साधारणतः दीड हजार रूपयांपासून पुढेच याची किंमत असते.
मृत्युदेवता यम आणि कपिल मुनी दोघांचीही या नऊमुखी रूद्राक्षावर सत्ता आहे. इंद्र आणि गणेश या दोघांचे शुभाशीर्वादही हे धारण करणार्याला प्राप्त होतात.
हे यमाशी संबंधित असल्यामुळे ते डाव्या हातामध्ये धारण करावे. मृत्युच्या भीतीपासून मुक्त करून अध्यात्मातील मुक्ती घडवून आणणारे असे हे रूद्राक्ष आहे.
बुध्दीमत्ता असूनही ज्यांना आपले विचार प्रभावीपणे दाखवता येत नाहीत त्यांच्यावर हे रुद्राक्ष प्रभावीपणे कार्य करते.
धारणकर्त्याचे दुःख, दैन्य व दारिद्रहरण होते. काळ्या रेशमी धाग्यात गुंफून हा रूद्राक्ष उजव्या किंवा डाव्या दंडात बांधावा. अनिष्ट ग्रहपिडेपासूनही संरक्षण मिळते.
हे रूद्राक्ष जरी भगवान शंकराशी निगडीत असले तरी देवी उपासनेशी निगडीत आहे.
शत्रूभय, अग्निभय, पशुभय, प्रेतबाधा, दारिद्र्याची चिंता, मानसिक आजार या सर्वांवर नऊमुखी रूद्राक्षधारणेचा इलाज केला जातो.
मंत्रः- ‘ओम ह्री हुं नमः।’ हा मूलमंत्र म्हणून हे रुद्राक्ष शक्यतो नवरात्रामध्ये धारण करावे.
नऊमुखी रूद्राक्ष हे प्रामुख्याने केतूप्रधान नक्षत्राशी संबंधित आहे. त्यामुळे या रूद्राक्षाचा संबंध अश्विनी, मघा आणि मूळ नक्षत्राशी आणि मेष, सिंह आणि धनु या राशींशी या रूद्राक्षाचा संबंध आहे.
मात्र हे रूद्राक्ष निवडताना पिवळ्या रंगाचेच निवडावे. लालसर, काळसर रुद्राक्ष शक्यतो धारण करु नये.
देवीशी संबंधित असल्यामुळे नऊमुखी रूद्राक्षउपासनेमुळे संपत्तीवृध्दी आणि ऐश्वर्यसंपन्नता प्राप्त होते. ऋणमुक्तता होते.
विचारशक्ति वाढते, इच्छा, आकांक्षापूर्ती होते. आपल्याला क्रियाशील आणि कार्यकुशल बनवते. त्यामुळे आपोआपच लक्ष्मीची कृपा आपणावर होते.
शीघ्रकोपी, संतापी स्वभावावर हे रुद्राक्ष रामबाण उपाय आहे. साक्षात आदिशक्ती आदिमाया याची स्वामिनी असल्यामुळे केतूचे दुष्परिणाम संपुष्टात आणण्यासाठी याचा प्रभावी उपाय होतो.
साहित्यिकांना, भाषा विषयाशी संबंध येणार्यांना हे रुद्राक्ष परिणामकारक ठरते या क्षेत्राबाबतची त्यांची विचारशक्ती आधिकच प्रगल्भ होते. भाषेवर जास्तच प्रभुत्व येते.
जन्मतारीख ९, १८ वा २७ यांपैकी कोणतीही असेल किंवा सप्टेंबर माहिन्यात ज्यांचा जन्म असेल त्यांनी हे नऊमुखी रूद्राक्ष धारण केले असता ते हितकारक ठरते.
लहान मुलांना संरक्षणकवच म्हणून हे रुद्राक्ष जास्तच परिणामकारक ठरते. लहान मुलांवर येणार्या संकटांपासून मुक्ति मिळते.
परदेशी किंवा लांब गावी जर मुलं नोकरीनिमित्ताने असतील तर त्यांना संरक्षण म्हणून नऊमुखी रुद्राक्षधारणा करावी.
वैद्यकिय दृष्ट्याः- ज्यांना अति उच्च रक्त दाबाचा विकार आहे त्यांनी, त्याचप्रमाणे ज्यांची रक्त गोठण्याची प्रक्रिया अतिशय मंद असल्यामुळे जास्त रक्तस्त्राव होतो त्यांनाही हे नऊमुखी रूद्राक्ष विशेष लाभदायक आहे.
छातीतील धडधड थांबवणे, रक्ताभिसरण नियमित करणे, फुफ्फुसांचा दाह थांबवणे या व्याधीवर हे रूद्राक्ष औषधी आहे. नऊमुखी रूद्राक्ष हे अंगावर येणार्या कोडावरही औषधी आहे.
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त 7 नोव्हेंबर पर्यत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
नवग्रह पिडाहरण करणारा दशमुखी रूद्राक्ष
दहा दिशांना पुरुन उरणारा नवग्रहांची पिडा दुर करणारा हा रुद्राक्ष सर्व प्रकारच्या पीडा, त्रास नष्ट करणारा अकाली मृत्यूलाही दूर लोटतो व आयुष्य वाढवतो.
देवादिकांमध्ये विष्णूचे माहात्म्य हे अपरंपार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या चक्रामध्ये जगाची स्थिती टिकवून धरण्यासाठी विष्णूंनी दशावतार घेतले.
या विष्णूंच्या दशावताराशी संबंधित असलेले रूद्राक्ष म्हणजे दशमुखी रूद्राक्ष.
त्याच्यावर कुठल्याही ग्रहाची सत्ता नसते तर हेच रुद्राक्ष सर्व ग्रहांवर अधिसत्ता गाजवते. दहा अवयवांची पापे नष्ट करण्याचे सामर्थ्यही या एकाच रूद्राक्षामध्ये आहे.
हे रुद्राक्ष विष्णूंच्या दशावताराशी संबंधित असल्यामुळे ते धारण करताना विष्णूसहस्त्रनामाचे उच्चारण आणि धारण केल्यानंतर सातत्याने विष्णूसहस्त्रनामाचा जप करीत राहणे लाभदायी आणि फलप्राप्ती देणारे ठरते.
यामध्ये विष्णूंच्या दशावतारामुळे शिव आणि विष्णू या दोन्ही दैवतांचा एकात्मिक आविष्कार पहावयास मिळतो.
मंत्रः- ह्या रुद्राक्षाचा मूल जपमंत्र ‘ओम हीं नमः’ आहे.
हे दशमुखी रूद्राक्ष ज्योतिषशास्त्रीय व वास्तुशास्त्रीदृष्ट्या महत्वाचे आहे. आपली कीर्ती होण्यासाठी दशदिशांचा आशीर्वाद लागतो.
यासाठी दशादिशांमधील सर्व ग्रह शांत असावे लागतात. हेच नेमके कार्य दशमुखी रुद्राक्ष करते.
तसेच कुठल्याही तर्हेची बाधा, कुठल्याही तर्हेची नैसर्गिक वा अनैसर्गिक आपत्ती— यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी दशमुखी रुद्राक्षाचा उपयोग होतो.
इच्छापुर्ती व सर्व दिशांवर वर्चस्व मिळवण्याची ताकद या रुद्राक्षामध्ये असल्यामुळे ह्या रुद्राक्षास ‘दिक्बली’ असेही म्हणतात.
स्थितीस्थापकत्व हा महत्त्वाचा गुणधर्म यात असल्यामुळे परिस्थितीत बदल शक्य नसला तरी ती हाताबाहेर जाऊ न देण्याची ताकद दशमुखी रुद्राक्षात असते.
मानसिक तणावांपासून मुक्ति देण्याची अपार शक्ती दशमुखी रुद्राक्षामध्ये आहे.
ग्रहपीडा निवारणासाठी- दशमुखी रुद्राक्ष
हे सर्व ग्रहांना अंकित ठेवते तसेच नवग्रहांवरही स्वामित्व गाजवते. ग्रहपीडेपासून मुक्ति देते.
पत्रिका जर गुंतागुतीची असेल वा पत्रिकेत दोष असतील तर दशमुखी रुद्राक्ष अतिशय उपयुक्त ठरते.
आयुर्वेदिय दृष्ट्याः- सर्व तर्हेच्या कफ विकारांवर या रूद्राक्षाचा चांगला परिणाम दिसून येतो. दुधात खलून, मधाबरोबर हे रूद्राक्ष दिले तर जास्त परिणाम लवकर होतो.
हे रूद्राक्ष पाण्यात रात्रभर ठेवून जर त्या पाण्याने गुळण्या केल्या तर घशाचे व श्वासनलिकेचे विकार दूर होतात. सर्व तर्हेचे मानसिक त्रास दूर होण्यास हे रुद्राक्ष उपयोगी पडते.
वैभवप्राप्तीसाठी अकरामुखी रूद्राक्ष-
हे रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ असून अकरा रुद्रांचे प्रतिक आहे. याच्या धारकाला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. धारण करणारा अजिंक्य बनतो. कधीही पराजित होत नाही.
याला अकरा रूद्रांचे म्हणजेच त्र्यंबक, भव, शर्व, रूद्र, पशुपती, ज्येष्ठा, कनिष्ठा, श्रेष्ठ, जघन्य, सोम, शिव यांचे प्रतीक समजले जाते.
काही ठिकाणी या रूद्राक्षाला इंद्राचे प्रतीकही समजतात.
सर्व तर्हेचे वैभव, सुखोपभोग आणि आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य यासाठी एकच गुरूकिल्ली म्हणजे हे अकरामुखी रूद्राक्ष आहे.
मात्र अकरामुखी रूद्राक्ष हे फारच काळजीपूर्वक वापरावे लागते. रूद्राक्ष वापरतानाचे नियम हे धारण करणार्याने कटाक्षाने पाळायला पाहिजेत.
धारणकर्त्याचा अल्पावधीतच भाग्योदय होतो. चंचल लक्ष्मी स्थिर होते.
दहामुखी रूद्राक्षाप्रमाणे अकरामुखी रूद्राक्ष हे देखील कुठल्याही ग्रहाच्या प्रभावाखाली येत नाही. अकरामुखी रूद्राक्षाचे स्वामित्व हे इंद्राकडे असल्याचे मानले जाते.
मंत्रः- या अकरामुखी रूद्राक्षाचा मूल जपमंत्र आहे.— ‘ओम हीं हुम नमः।’
साक्षात रूद्राचा अवतार असलेले हे रूद्राक्ष जर मस्तकावर धारण केले तर त्याचे सर्वोच्च फल मिळते.
एक लाख गाईंच्या दानाचे किंवा एक हजार अश्व दानाचे पुण्य मिळवून देण्याची ताकद एका अकारामुखी रूद्राक्षात आहे.
शिवाच्या भिन्न भिन्न शक्तींचे एकत्रित केंद्र हे या एकादशमुखी रूद्राक्षामध्ये आहे. अकरा रूद्रांचे तेज या रूद्राक्षांमध्ये समाविष्ट आहे.
सर्वांवर विजय मिळवून देणारे, सर्वांना आकर्षित करून वश करू शकणारे असे हे रूद्राक्ष मात्र सहजासहजी मिळत नाही.
विविध दोषमुक्तिसाठी रूद्राक्ष साधना-
पत्रिकेतील दोषः-
पत्रिकेतील दोष हे अनेक प्रकारचे असतात. एखादा ग्रह शुभ असतो तर एखादा अशुभ असतो किंवा दुर्बल असतो.एखाद्या ग्रहाचा शुभप्रभाव वाढला तर कोणत्याही क्षेत्रात यश भराभराट मिळते. याउलट एखाद्या ग्रहाचे प्रतिकुल परिणाम होऊन आर्थिक आणि प्रगतीतही अडथळे येतात.
अशा वेळी पत्रिकेतील ग्रहांचे दोष काढण्यासाठी आणि गुणांची वृध्दी करण्यासाठी रूद्राक्षसाधना उपयुक्त ठरते.
शापदोषः-
काही वेळेस एखाद्याच्या घराण्यालाच पितरांचे किंवा ज्यांचे तळतळाट घेतलेले असतील अशांचे किंवा गोहत्येचे मनुष्यवधाचे शाप असतात अशा शापमुक्तीसाठीही रुद्राक्षधारणा उपयुक्त ठरते.वास्तुदोषः-
जर कोणत्याही स्वरूपाचे वास्तुदोष असतील तर घराच्या स्वरूपात बदल करणे बरेच वेळा खर्चिक असते किंवा अशक्यच असते. अशा वेळी तज्ञांच्या मार्गदर्शनाने घरात विशिष्ट ठिकाणी रुद्राक्ष ठेवून वास्तुदोष निवारण करता येते.
भानामती—करणीः-
भानामती, करणी याविषयी समाजात अजूनही अंधश्रध्देचे प्रमाण खूप आहे.अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी, अशा गोष्टींनी मनात भिती असेल तर मनाची ताकद वाढवण्यासाठी रुद्राक्ष साधना उपयुक्त ठरते.
रूद्राक्षाचा उपयोग आणि उपचार हा जादूचा भाग नसून ते निसर्गाचे एक वरदान आहे; या दृष्टिकोनातून त्याकडे पाहणे आवश्यक ठरते.
रूद्राक्षावरची श्रद्धा ही धर्मावरची श्रध्दा नसून ती निसर्गातल्या चमत्कृतीपूर्ण परंतु सामर्थ्यशाली गोष्टीवरची श्रद्धा आहे हे विसरता कामा नये.
हे रुद्राक्ष सदैव सुखी ठेवते व अपमृत्यू टाळते. योगशास्त्राचा अभ्यास करताना योगसाधनेत येणारे अडथळे हे रुद्राक्ष टाळू शकते.
सदाचार, चातुर्य आणि हजरबाबीपणामध्ये कौशल्य आणण्यासाठी अकरामुखी रूद्राक्षाचा विलक्षण फायदा होतो.
चांगला नवरा मिळणे, त्याला दीर्घायुष्य लाभणे, संतानप्राप्ती होणे या सार्यांसाठी हे अकरामुखी रूद्राक्ष महत्त्वाचे ठरते.
सुरक्षेचे एक कवच म्हणून हे रूद्राक्ष मानवी जीवनासाठी एक वरदानच आहे. हव्या त्या माणसाचे प्रेम प्राप्त करण्यासाठी या रूद्राक्षाचा उपयोग होतो.
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त 7 नोव्हेंबर पर्यत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/
बारा संकटांवर मात करणारे बारामुखी रूद्राक्ष-
हे रुद्राक्ष म्हणजे दारिद्र्य, रोग, नैराश्य, भय, धनहानी, अनारोग्य, दुर्देव, दुःख, हानी, निः संतानता, संकटे आणि बाधा अशा बारा प्रकारांवर मात करुन देणारे विष्णूचे प्रतीक मानले जाते.
हा धारण केला असता तेजः पुंज व्यक्तिमत्व प्राप्त होते. शत्रू हतबल होतात. शस्त्राघात व आपघातापासून संरक्षण होते.
महाविष्णू तसेच बारा आदित्यांचे प्रतीक म्हणजे हे रूद्राक्ष. बारा ज्योतिर्लिंगाचा याला आशिर्वाद असतो.
सूर्यनमस्कारामधील सूर्याच्या बारा नावांचा एकात्मिक आविष्कार बारामुखी रुद्राक्षामध्ये आहे. तेज, शक्ती, सामर्थ्य, बल या सर्वांचा केंद्रबिंदू या बारामुखी रूद्राक्षामध्ये आहे.
हे रुद्राक्ष सहजासहजी उपलब्ध होत नाही.
कुठल्याही स्वरूपाची चिंता, भय, शोक या सर्वांपासून आणि शारीरिक व्याधींपासुन सोडवणूक करण्याचे सामर्थ्य ह्या रूद्राक्षात आहे.
राशीचक्राचा विचार केला तर बारामुखी रूद्राक्ष हे सिंह राशीला प्रभावी व परिणामकारक फळ देते कारण सिंह रास ही सूर्याच्या प्रभावाखाली येते.
तसेच मेष आणि धनु या आग्निराशींनाही हे रूद्राक्ष अधिक परिणामकारक ठरते.
त्याचबरोबर कृत्तिका, उत्तरा आणि उत्तराषाढा या तिन्ही नक्षत्रांना हे रूद्राक्ष प्रभावशाली आहे.
त्यामुळेच ज्यांची रास मेष, सिंह व धनु नाही आणि नक्षत्र मात्र कृत्तिका, उत्तरा व उत्ताराषाढा आहे त्यांनादेखील या बारामुखी रूद्राक्षाची चांगली फळे मिळतात.
मंत्रः- ‘ओम क्षीं रौं नमः।’ हा मंत्र म्हणून हे रुद्राक्ष धारण करावे.
बारामुखी रूद्राक्ष हातामध्ये धारण केल्यास बाराही आदित्य प्रसन्न होतात.
गोमेध वा अश्वमेध यज्ञामुळे जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य आपल्याला या बारामुखी रूद्राक्षाने मिळते.
जंगली श्वापदांपासून तसेच साप, विंचू यांच्या विषापासून, नकळत केलेल्या पशूहत्येच्या पापापासून हे रूद्राक्ष रक्षण करते.
शस्त्राअस्त्रापासून हे रूद्राक्ष स्वत:च्या सामर्थ्याने सुरक्षित ठेवते.
एकमुखी रूद्राक्षाची सर्व फले बारामुखी रुद्राक्षामुळे मिळतात.
बारामुखी रूद्राक्ष हे सूर्याच्या अधिपत्याखाली येत असल्यामूळे एकमुखी रूद्राक्षाची सर्व फळे याने देखील मिळू शकतात.
पत्रिकेत जर सूर्याचे स्थान हे अशुभत्व दर्शवत असेल, तर त्यावर बारामुखी रूद्राक्ष हा एक चांगला उपाय ठरू शकतो.
बारामुखी रूद्राक्ष हेदेखील सहजासहजी उपलब्ध नाही हे जरी खरे असले तरीही त्याची दुर्मिळता एकमुखी रूद्राक्षाइतकी नाही.
बारामुखी रूद्राक्ष हे माणसाच्या भोवती एक तेजोवलय निर्माण करते. विशेषतः वडिल मुलांमध्ये जर भांडण, गैरसमज असतील तर ते दूर करण्याचे कार्य हे रुद्राक्ष करते.
वैद्यकिय दृष्ट्याः- ह्रदयरोगावर बारामुखी रूद्राक्ष प्रभावशाली आहे. उजव्या डोळ्यांचे आजार, हाडांचे रोग, मानसिक अस्वास्थ्य या सार्यांवर ते प्रभावशाली आहे. रूद्राक्ष पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी हे पाणी प्राशन केले, तर अनेक रोग आणि व्याधींपासून मुक्तता मिळते. शरीराचे तेज पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि वार्धक्यातही तरुण दिसण्याची किमया या रुद्राक्षात आहे.
पापक्षालन करणारा तेरामुखी रूद्राक्ष-
हे रुद्राक्ष सहसा मिळत नाही. या रुद्राक्षाला कामदेव स्वरूप इंद्राचे प्रतिक किंवा साक्षात मदनदेव समजतात.
खुद्द देवेंद्राचाच याला आशीर्वाद लाभल्याने सर्व देवता धारण कर्त्यांवर प्रसन्न होतात.
श्राद्ध करताना गळ्यात धारण केल्यास पितरांना सद् गती प्राप्त होते.
हा धारण करणार्याला सर्व सिध्दी प्राप्त होतात. सर्व पातके नष्ट होऊन सर्व त्रास दूर होतो. धारणकर्ता सर्वगुण संपन्न बनतो. सदैव सुखी राहतो व आनंदात राहतो.
बारामुखी रूद्राक्षांप्रमाणेच तेरामुखी रूद्राक्ष देखील ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर कार्य करते.
इंद्रदेवतेच्या प्रभावाखालील तेरामुखी रूद्राक्ष अनेक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरते.
आध्यात्मिक प्रगती करणे, अचानक धनलाभ घडवून आणणे, कठीण प्रसंगातून मार्ग काढणे, लोकप्रियता संपादन करण्याचे काम हे रुद्राक्ष करते.
शुक्राच्या प्रभावाखालच्या सहामुखी रूद्राक्षाप्रमाणेच याची फळे मिळतात सहामुखीचा पर्याय तेरा मूखी रुद्राक्ष आहे.
दोन्हीची फलप्राप्ती सारखीच आहे.
सर्व ऐहिक सुखोपभोगाठी तसेच भावंडांना किंवा आई वडिलांना नकळत काही त्रास दिला गेला असेल तर त्याचे पापक्षालन तेरामुखी रुद्राक्ष धारणेमुळे होते.
या रूद्राक्षाचे स्वामित्व इंद्राकडे असल्याने कामदेवतेचा संबंधही या रूद्राक्षाशी येतो.
मंत्रः- या रूद्राक्षाचा ‘ओम ह्यीं नमः।’ हा मुळ मंत्र आहे.
तेरामुखी रूद्राक्षाचे स्वामित्व इंद्राप्रमाणेच कार्तिक स्वामींकडे देखील आहे.
राशींचा विचार केला तर वृषभ, तुळ या दोन्ही राशींना हे रूद्राक्ष अतिशय उत्तम फळे देते.
तसेच शुक्राच्या प्रभावाखाली असलेली तिन्ही नक्षत्रेही या तेरामुखी रूद्राक्षाशी संबंधित आहेत.
भरणी, पूर्वा आणि पूर्वाषाढा या तिन्ही नक्षत्रांवर याच तेरामुखी रूद्राक्षाचा प्रभाव असतो.
तेरामुखी रूद्राक्ष हे कल्याणकारी असल्यामुळे त्याचा संकटनिवारणासाठी उपयोग होतो.
श्री शंकराच्या अश्रूंचे प्रतीक असलेले चौदामुखी रूद्राक्ष-
देवांनाही वंदनीय असणारे हे रूद्राक्ष दुर्मिळ आणि सहसा न आढळणारे अशाच स्वरुपाचे आहे. या रुद्राक्षाला हनुमंताचे स्वरुप मानतात.
तर काही भगवान शंकराचा अंश मानतात. अत्यंत दुर्लभ असून धारकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. ह्याची उपासना करणार्याला शिवलोकी मुक्ती मिळते.
अनेक व्याधी दूर होतात. सुखप्राप्ती, ऐश्वर्य मिळते.
पद्मपुराणात हे रूद्राक्ष दंडावर किंवा मस्तकी धारण करावे तर शिवपुराणात हे रूद्राक्ष मस्तकी धारण करावे, आणि मंत्र महार्णवात
हे रूद्राक्ष म्हणजे ‘श्रीकंठ’ असल्याचे म्हटले आहे.
निसर्गाकडून मिळालेले हे एक वरदानच आहे. ह्या रुद्राक्षाच्या उपासनेमुळे माणसाला अंतर्ज्ञान प्राप्त होते, शंकराच्या तिसर्या डोळ्याची ताकद प्राप्त होते.
हे रुद्राक्ष गुरुआज्ञे शिवाय धारण करु नये.
भगवान शंकराच्या अश्रूंचे प्रतीक किंवा साक्षात् उमापती महादेवाचे स्वरूप असे या रूद्राक्षाचे वर्णन आहे.
योगविद्येत नैपुण्य प्राप्त करण्यासाठी हा गळ्यात धारण करावा. रोग, चिंता यापासून पूर्ण मुक्तता देणारे हे रूद्राक्ष आहे.
चौदामुखी रूद्राक्ष मस्तकावर धारण केल्यास ‘शिवरूप’ प्राप्त होते, म्हणजेच शिवासमान गुण अंगी येतात. अशी व्यक्ति लोकप्रिय व समाजात पूजनीय होते.
चौदामूखी रूद्राक्षाचा चौदा विद्यांशी संबंध असल्यामुळे धारणकर्त्यास चौदा विद्यांमध्ये प्राविण्य मिळते. रूद्राक्षाचे जे प्रमुख चौदा प्रकार आहेत, त्यामध्ये या चौदामूखी रूद्राक्षाला ‘परम शिव’ असे नाव आहे.
चौदा भुवनांचे स्वामित्व या चौदामुखी रूद्राक्षामुळे प्राप्त होते. या रूद्राक्षामध्ये अतिउच्च ऊर्जा असते त्यामुळे या रुद्राक्षाची धारणा फार जपून करावी लागते.
चौदामुखी रूद्राक्ष हे प्रामुख्याने पंचेद्रियांच्या पलीकडे नेणारे रूद्राक्ष आहे.
मंत्रः- ‘ओम नमः।’ या मंत्रजपाने हे रूद्राक्ष धारण करावे.
वैद्यकिय दृष्ट्याः- प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्व तर्हेचे त्वचारोग, लैगिंक प्रश्न यावर प्रभावी उपचार होतात.
रुद्राक्ष आणि संख्याशास्त्र-
रुद्राक्ष आणि त्यांच्या मुखांची याचा जवळचा संबंध आहे म्हणूनच त्याची निवड ही संख्याशास्त्राशी निगडित असते.
उदाहरणार्थ एकमुखी रूद्राक्ष हे सूर्यप्रभावी तर द्विमुखी रूद्राक्ष हे चंद्रप्रभावी मानले गेले आहे.
अर्थातच याचे मुख्य कारण संख्याशास्त्रानुसार १ हा अंक सूर्याच्या तर २ हा अंक चंद्राच्या प्रभावाखाली मानला जातो.
काही वेळेस रुद्राक्षाची निवड करताना त्या व्यक्तिचे नक्षत्र पाहिले जाते. तेव्हा सुद्धा संख्याशास्त्राशी संबंध येतो.
उदा. एखाद्याचे मघा नक्षत्र असेल तर त्याचा स्वामी केतू असतो. केतू मंगळाप्रमाणे फलप्राप्ती देतो. आणि संख्याशास्त्रामध्ये मंगळ हा ९ अंकाचा स्वामी आहे.
म्हणूनच मघा नक्षत्र असणार्यास नऊमुखी रूद्राक्ष वापरण्यास सांगितले जाते. मात्र हे नक्षत्र सिंह राशीमध्ये समाविष्ट असल्यामुळे सिंह राशीसाठी सांगितलेले एकमुखी रुद्राक्षही वापरले तरी चालते.
त्यामुळेच रुद्राक्षाची निवड करताना जन्मनक्षत्र, रास लक्षात घेऊन रूद्राक्ष किती मुखी धारण करावे हे सांगितले जाते.
आमच्या प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत. ऑफर फक्त 7 नोव्हेंबर पर्यत.
तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/