1st Maharashtra Startup & Innovativation Yatra
महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा…!


Varunraj kalse
1st Maharashtra Startup & Innovativation Yatra


Varunraj kalse
1st Maharashtra Startup & Innovativation Yatra
- August 12, 2022
- , 4:30 pm
- , Career Opportunities, Post's
1st Maharashtra Startup & Innovation Yatra
महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा…!
©महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी
पार्श्वभूमी
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट अप धोरण २०१८” जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. सदर धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अप्स परिसंस्थेच्या विकासाकरिता पोषक वातावरणनिर्मिती करुन त्यातून यशस्वी नवउद्योजक घडविण्याकरिता इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
नविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे (स्टार्टअप यात्रा) ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत, • महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक
पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे
राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे • महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण, कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.
स्टार्टअप यात्रेचे प्रामुख्याने ३ टप्पे असतील:
१. तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान
२. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र (Boot Camp and Pitching Session)
३. राज्यस्तरीय अंतिम सादरीकरण सत्र व विजेत्यांची घोषणा (Final Pitching Sessionand Grand Finale)
सविस्तर माहिती :
१. प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान:
स्टार्टअप यात्रेच्या या प्रथम टप्यात प्रत्येक तालुक्यातील शाळा / महाविद्यालये / ITI / लोकसमुह एकत्रित होण्याच्या जागेवर स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक वाहन (mobile van) पाठविण्यात येईल. सदर वाहनासोबत असलेल्या प्रतिनिधिद्वारे नागरिकांना या यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे इतर पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देण्यात येईल. याचबरोबर नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करून यात्रेच्या पुढील टप्प्याबाबत माहितीही पुरविण्यात येईल.
२. जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्र (Boot Camp and Pitching Session):
सर्व तालुक्यांत प्रचार प्रसिद्धी झाल्यानंतर, राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्रांचे आयोजन केले जाईल. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व विविध क्षेत्रांतील आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पना राज्यस्तरीय सादरीकरण सत्रात सहभागी होण्यास पात्र असतील.
जिल्हास्तरीय निवड :
जिल्हास्तरावरील विजेत्यांची निवड कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीद्वारे केली जाईल. निवडीचे निकष परिशिष्टात नमूद केले आहेत.
३. राज्यस्तरीय सादरीकरण सत्र व विजेत्यांची घोषणा समारोह (Final Pitching Session and Grand Finale)
अ. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे अंतिम सादरीकरण राज्यस्तरीय तज्ञ समिती समोर करण्यात येईल.
ब. अंतिम विजेत्याची निवड राज्यस्तरीय तज्ञ समितीद्वारे केली जाईल.
राज्यस्तरीय निवड समितीची निवड समितीची स्थापना मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी हे करतील.
प्रस्तावित निवड समिती:
अध्यक्ष – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी
सह सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
विद्यालये/ महाविद्यालय यांचे प्रतिनिधी
बँक प्रतिनिधी . राज्यातील नामांकित उद्योजक / स्टार्टअप
इनक्यूबेटर्स चे प्रतिनिधी
स्टार्टअप परिसंस्थेतील भागीदार
राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल / निधी साठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे इतर लाभ ही पुरविण्यात येतील.
अधिकाधिक उमेदवारांनी या स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ घ्यावा, आणि इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

One Comment
Hello..
You are sharing wonderful information.. this is really helpful. God bless you.thanks
You must log in to post a comment.