My title My title
Post'sSomething Different
Trending

1 Another Type of Fraud Happens With Me in the Morning

सावधान अस आपल्या सोबत ही घडु, शकत...

   

1 Another Type of Fraud Happens With Me in the Morning

सावधान अस आपल्या सोबत ही घडु, शकत…!

©सलिल चौधरी.



आज सकाळीच माझ्या बरोबर घडलेली गोष्ट.

महानगर गॅस चे बिल थकले आहे म्हणून त्यांचा एक कर्मचारी घरी आला. आणी लगेचच बिल भरावे लागेल असे सांगितले. त्याने महानगर गॅस चा लोगो असलेला टीशर्ट घातला होता.

मी लगेच माझ्या कडे गुगल पे मध्ये बिल किती आहे ते पहिले. त्याने सांगितलेली बिलाची रक्कम आणि अँप मध्ये असलेली रक्कम सारखीच होती.

बिल भरणा करायला 7 दिवस उशीर झाला होता.

मी लगेचच म्हंटलं की आता गुगल पे मधून बिल भरतो. तर तो म्हणाला की गुगल पे मधून भरू नका. पेमेंट REFLECT व्हायला उशीर होतो.

मी QR कोड देतो त्यावर भरा. किंवा माझ्याकडे मशीन आहे त्यावर कार्ड स्वाईप करा.

त्याने त्याच्याकडे असलेल्या मोबाईल वर पटापट चार पाच टिचक्या मारल्या. आणि QR code दाखवला.

त्या स्क्रीनवर कोठेही माझे नाव नव्हते, अमाउंट नव्हती आणि महानगर गॅस चा लोगोही नव्हता.

यात काहीतरी गडबड असल्याचा मला संशय आला म्हणून मी पेमेंट केले नाही. त्याला म्हंटल की मी माझ्या गुगल पे अँप वरून करतो किंवा तुमच्या अधिकृत वेबसाईटवर करतो.

हा QR कोड मला सेफ वाटत नाही.

असं मी बोलताच तो वैतागला. मी काय fraud नाही आहे, लाखो रुपये आम्ही collect करतो. पेमेंट reflect नाही झाले तर तुम्हालाच त्रास होईल. गॅस कनेक्शन कट होईल.

त्याचा बदललेला आवेश बघून मी म्हंटल की पेमेंट मी तुमच्या अधिकृत वेबसाईटवर करतोय. तुम्हाला कनेक्शन कट करायचे असेल तर करा.

यावर तो म्हणाला की एकदा कट केले की पुन्हा जोडायला दोन महिने लागतात.

एव्हाना मला कळलं होतं की तो मला घाबरवू पाहतोय, जेणेकरून मी त्याच्या कोड वर पेमेंट करावे. अमाउंट जास्त आहे त्यामुळे वेबसाईटवर पेमेंट स्वीकारले जाणार नाही असे म्हणत त्याने अखेरचा प्रयत्न करून पाहिला.

त्याला तिथेच थांबवून मी लगेच वेबसाईटवर पेमेंट केलं. आणि reciept दाखविली. त्या reciept कडे ढुंकूनही न बघता तो चालायला लागला.

थोडक्यात काय तर तो महानगर गॅसचा अधिकृत व्यक्ती होता आणि तरीही fraud करायचा प्रयत्न करत होता.

असे fraud आपल्यासोबत होऊ नये म्हणून काळजी घ्या .

कोणी लिंक पाठविली किंवा QR कोड दाखविला तर खात्री केल्याशिवाय लगेच पेमेंट करू नका.

अधिकृत वेबसाईट/अँप किंवा काउंटर वरच पेमेंट करा.

सिनियर सिटीझन्स ना ऑनलाईन पेक्षा समोरील माणसावर भरवसा असतो. याचा गैरफायदा घेणारे बरेच लोक असतात.

कोणी अवास्तव भीती दाखवू लागला किंवा घाई करू लागला तर शंकेस वाव असतो. खात्री नसेल तर ओळखपत्र मागा.

त्या व्यक्तीचा आणि ओळ्खपत्राचा फोटो काढा. जवळपास प्रत्येक बिलावर QR कोड असतो, तोच वापरून पेमेंट करा.

स्वतःला अशा फसवणुकीपासून सुरक्षित ठेवा. सजग राहा.

Source: netbhet

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button