My title My title
Something Different

Science of Mantras

मंत्राच्या ध्वनीलहरी आणि विज्ञान

Science of Mantras



©Anna®2022



प्राचीन सनातन ऋषीमुनींनी ज्या अक्षरांना एकत्र करून जो शब्दसमुह तयार केला त्या शब्द समुहांना मंत्र असे नाव दिले. मंत्र म्हणजे फक्त अक्षरांचा समुह नाही.

मंत्राव्दारे ध्वनिच्या विशिष्ट ध्वनिलहरींची निर्मीती होते हे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच शोधून काढले होते.

मंत्र कोणी, कधी, कसा, कुठे व किती वेळा पठण करायचा याचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे.

प्रत्येक शुद्ध मंत्रामध्ये अगाध सामर्थ्य असते (पुस्तकांमध्ये किंवा युट्युबला हल्ली जे मंत्र दिले जातात ते शुद्धच असतात ह्याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी जाणकार व्यक्तींकडूनच मंत्राची माहीती घेण्याची आवश्यकता असते) शुद्ध मंत्र उच्चारण्याच्या पद्धतीमध्ये त्या मंत्राचे सामर्थ्य दडलेले असते.

मंत्राच्या ध्वनीलहरी आणि विज्ञानाचा कसा संबंध आहे ते आता आपण पाहूया-

मंत्र उच्चारण्याचे तीन प्रकार सांगीतले जातात.

१) आपण सामान्यपणे पठण करतो त्याला “वैखरी” म्हणतात म्हणजे 20Hz पेक्षा कमी असलेला ध्वनी (Infra Sound) असे वैज्ञानिक भाषेत म्हटले जाते.

२) मंत्र तोंडामध्ये पुटपुटणे याला “उपांशु किंवा मध्यमा” म्हणतात म्हणजे जो ध्वनि 20Hz पासून 20,000 (20k) Hz पर्यत असतो जो कानाला ऐकू येतो त्याला वैज्ञानिक भाषेत (Audible Sound) म्हटले जाते.

३) स्वत: मनामध्ये जप करणे ज्याला “मानसिक जप किंवा पश्यंती” म्हणतात म्हणजे जो ध्वनि 20k Hz पेक्षा जास्त असतो (असा ध्वनि सामान्य माणसाला ऐकू येत नाही) अशा ध्वनिला वैज्ञानिक भाषेत (Ultra Sound) म्हटले जाते.

मंत्राच्या ध्वनिपासून आपल्या आसपास त्या ध्वनिंच्या लहरी तयार होतात. उदा. एखाद्या शांत पाण्याच्या तलावाकिनारी तुम्ही बसला आहात;

त्या शांत पाण्यामध्ये तुम्ही एखादा दगड मारल्यानंतर ज्या वर्तुळाकार लहरी तयार होतात अगदी तशाच पद्धतीने मंत्र पठण करणार्‍याभोवती कंपन (Vibration) तयार होतात.

शुद्ध मंत्राच्या उच्चारामुळे निर्माण होणार्‍या लहरी प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकतात. ह्यामुळेच प्राचीन काळापासून मंत्राची जपसंख्या, मंत्र पठणाचा कालावधी, मंत्रजपासाठी जागा याची निश्चितता करण्यात आली आहे.

तुम्ही जसजसा मंत्रजप करत जाता तसतशी त्या मंत्राची कंपने (Vibrations) वाढत जातात आणि तुमच्या भोवती त्या मंत्राची ऊर्जा निर्माण होवू लागते.

वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर तुम्ही जिथे मंत्रजप करत असता तिथे मंत्राच्या ध्वनिलहरी कंपन (Vibration) करत असतात.

ह्यामध्ये प्रामुख्याने ध्वनिलहरींची लांबी (Wave Length), वारंवारता (Frequency), ध्वनिची तीव्रता, ध्वनिची घनता आणि ध्वनीची गती निर्माण होते.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये आजपर्यत Ultra Sound पद्धतीचा वापर उपचारासाठी केलेला दिसून येतो. परंतु हजारो वर्षापूर्वी आपल्या प्राचीन सनातन ऋषीमुनींनी मंत्राच्या माध्यमातून Ultra Sound, Infra Sound आणि Audible Sound चा शोध लावलेला होता.

त्यामुळे जे मंत्रसाधनेला थोतांड समजतात त्यांनी मंत्र आणि त्यामागचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. मंत्रसाधना अंधश्रद्धा किंवा थोतांड अजिबात नाही.

प्राचीन सनातन ऋषीमुनींनी शास्त्राच्या आधारावर शोधून काढलेले प्रगत विज्ञान आहे हे आजच्या पिढीने जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

ब्रिटीश काळात इंग्लंडचा शिक्षणतज्ञ लाॅर्ड मेकॅलेने अख्ख्या भारतभर इंग्रजीचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे आपण आपल्या मुळ संस्कृत धर्मग्रंथापासून दूर गेलो.

आजकाल इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्येच सर्वांनी धन्यता मानली आहे परंतु आपल्या प्राचीन सनातन ऋषीमुनींनी आपल्या सर्वांसाठी जो अनमोल ठेवा दिलेला आहे.

त्या मंत्रशास्त्राचा अभ्यास होणे गरजेचे आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की, मंत्र हे शास्त्र आहे आणि ते ध्वनिवर आधारीत आहे ते सर्व प्रकारच्या उपचारामध्ये वापरता येवू शकते हे आजच्या विज्ञानाने सुद्धा मान्य केले आहे.



मंत्राच्या ध्वनीलहरी आणि विज्ञान

Science of Mantras



©Anna®2022



Science & Difference Between Stotra and Mantra(Opens in a new browser tab)

Science Behind Sculpture of Turtle in Temple(Opens in a new browser tab)

Science Behind Bats in Ancient Temple(Opens in a new browser tab)



Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

 

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button