Varunraj kalse
Self Counselling
- ,
- , Mental Health, Post's
Self Counselling
स्व समुपदेशन
प्रत्येकाला चांगले आरोग्य हवे आहे, स्वताचे विचार हे सकारात्मक असावेत, सकारात्मक विचारामधून सातत्याने सकारात्मक उर्जा स्वतःला मिळत राहावे. नेहमी प्रसन्न मुद्रेत आनंदी जीवन जगावे, सातत्याने आर्थिक प्रगती होत राहावी, याकरिता आपला आहार, व्यायाम आणि दिनचर्या आदर्श असावी, आपल्या कुटुंबामध्ये, नातेवाइकामध्ये, समाजामध्ये आपला प्रभाव वाढत राहावा, असे प्रत्येकाला वाटत असते. असे वाटणे हे साहजिकच आहे. ‘कळतं पण वळत नाही,’ या म्हणीप्रमाणे आपली अवस्था होते.
जर आपल्याला चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य, आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, कार्यालयीन प्रगती साधायची असेल तर ‘Self Counselling’ समजून घ्यावे लागेल. मानसशास्त्रामध्ये ‘Self Counselling’ ही स्वताच्या विचाराला, स्वभावाला, सवयींना दिशा देणारी एक प्रक्रिया आहे.
आपल्या विचाराचा, आपल्या स्वभावातील गुण-दोषाचा आपल्या कर्तुत्वावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम पडत असतो. मग साहजिकच मेंदूविज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या विविध मानसिकतेतून आपल्या मेंदूतून ज्या अल्फा आणि बीटा लहरी निघतात या लहरींचा परिणाम आपल्या सभोवतालच्या परिसरावर, व्यक्तीवर पडत असतो.
आपले कुटुंब, आपला व्यवसाय, आपले कार्यालय, आपला समाज यावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पडत असते. मग ही छाप प्रभाव वाढविणारी, प्रगतीच्या दिशेने जाणारी खूप आवश्यक आहे. याकरिता ‘Self Counselling’ महत्वाचे असते. ‘Self Counselling’ मधून आपण आपल्या विचाराला, प्रयत्नाला, स्वभावाला, गुण-दोषाला, कर्तुत्वाला दिशा देत असतो.
त्यामुळे सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या, भावनिक असंतुलनाच्या, ताण-तणाव व्यवस्थापनाच्या दृष्टीने ‘Self Counselling’ हे अतिशय महत्वाचे आहे, Self Counsellingामध्ये अनेक ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स वापरून आपण आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या व्यवसायाला, आपल्या प्रभावाला सहज वाढवू शकतो.
Self Counselling तंत्र समजून घेऊया
सूर्य उगवला की, संपूर्ण सजीव सृष्टीत बदल होतो, सर्व प्राणी, पक्षी, मानव इतकेच नव्हे तर सभोवतालचे सर्व वातावरण बदलते. त्याचप्रमाणे Self Counselling घेणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब, नातेवाईक कार्यालय, व्यवसाय, शिक्षण, समाज जेथे तुमचे असतित्व आहे तेथील सभोवतालचे सर्व वातावरण सुद्धा बदलते. सृष्टीत बदल हा निसर्गाचा नियम आहे, तसेच व्यक्तीच्या व्यक्तीमत्वात बदल हा ‘Self Counselling’ नियमच आहे. आनंदी व यशस्वी जीवन जगण्यासाठी ‘Self Counselling’ हे मेंदूविज्ञान व मानसशास्त्र मधील महत्वाचे तंत्र आहे.
सर्वात सुरुवातीला आपण ‘Self Counselling’ म्हणजे काय? Self Counsellingाचा पहिला टप्पा कोणता ते समजून घेऊया. Self Counselling ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्याचा लाभ प्रथम स्वतःच्या विचारप्रक्रियेतून स्वतःच्या मानसिकतेवर होत असतो. त्यामुळे लाभार्थीत बदल होऊन तो स्वतःच्या समस्या ओळखतो, समस्येची कारणे शोधतो, स्वताच्या आवडीनिवडी, स्वतःचे विचार, स्वताची निर्णय क्षमता वृद्धिंगत करतो. स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यास सुरुवात करतो. वैचारिक दुष्टया लाभार्थी समर्थ होतो.
Self Counsellingाचा पहिला टप्पा हा ‘स्व’ ची ओळख हा आहे. आपण कुटुंब आणि समाज यांचा विचार करून स्वतःला कुठेतरी विसरून जातो. स्वतःच्या आवडी-निवडी, स्वतःचे छंद, स्वतःचे विचार, स्वतःला काय हवं आहे, स्वतःच्या भावनांना ओळखता येणे, स्वतःचे विचार व भावनांवर नियंत्रण मिळविणे, स्वतःचे ध्येय निश्चित करून, ध्येय गाठण्यासाठी स्वतःला नियोजन करता येणे, आपल्या कार्यपद्धतीत बदल करता येणे, आपला स्वताचा ठसा निर्माण करणे आणि इतरांना आपल्या प्रभावक्षेत्रात आणणे यालाच ‘स्व’ ची ओळख असे म्हणतात.
Self Counsellingामध्ये आपण स्वतःचा वारंवार विचार करीत असतो. आपले ध्येय व भावनांना सतत नजरेसमोर ठेवतो, ध्येयप्राप्तीच्या विचारात मग्न होणे, ध्येयप्राप्तीच्या कलप्नामध्ये स्वतःला गुंतून ठेवण्यासाठी स्वताच्या मेंदूला वारंवार सूचना देत असतो. त्यामुळे मनोमन आपले नियोजन सुरु असते, कळतनकळत आपण ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो. स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य, स्वतःची गुण कौशल्य वाढविण्यासाठी स्वतःला सतत प्रेरित ठेवत असतो, यालाच Self Counselling असे म्हणतात.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्वतःला वेळ देऊन मेडीटेशनमध्ये किंवा मेडीटेशन नंतर स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी नियमीत स्वतःला सूचना देणे, स्वतःची मानसिकता सतत सकारात्मक ठेवण्यासाठी नियमीत स्वतःला सूचना देणे, आपल्या क्षेत्रामध्ये अधिक यश मिळविण्यासाठी आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढावी, सभोवतालचे वातावरण आपल्याला अनुकूल बनावे याकरिता नियमीत स्वतःला सूचना देणे, यालाच स्व-समुपदेशन असे म्हणतात.
स्व समुपदेश हे शारीरिक व मानसिक आरोग्य मिळविण्याकरिता, जीवनामध्ये जे पाहिजे ते मिळविण्याकरिता एक प्रभावी तंत्र आहे. परंतु या तंत्रावर विश्वास बसावा, आपल्या Self Counselling ट्रिक्समध्ये सातत्य राहावे याकरिता प्रशिक्षित कौन्सलरच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस प्रयत्न करावेत. जेणेकरून स्व-समुपदेशन तंत्र सतत घेण्याची सवय तुमच्या मेंदूला आगेल. आणि तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल.
अधिक माहितीकरिता ‘सुजाण पालकत्व’ या युटयूब चॅनेलला भेट द्या. Self Counselling या प्रभावी तंत्रामुळे स्वतःच्या स्वभावाला एक वेगळे वळण लागते, स्वताच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या सवयी रुजल्या जातात, आपल्या सवयीचा, वर्तणुकीचा परिणाम आपल्या मेंदूवर, मेंदुतिल काम करण्याच्या पद्धतीवर, कुटुंबावर व सभोवतालच्या वातावरणावर कसा पडतो ते पुढील भागात पाहूया.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🆁🅴 करा
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.