Post's
Mysteries of Nilavanti 2
Mysteries of Nilavanti Part 2
गुढ रहस्यमयी निळावंती भाग २
हिंदू संस्कृती अन प्राचीन भारतीय ग्रंथ संपदा याविषयी आपणास बरेच कमी माहित असते.
असाच काही अनुभव अन त्यावर मी केलेला थोडा अभ्यास मी उघड करत आहे, विचित्र अन अभेद्य असे आहे हे सगळे पण विचलित होण्याचे कारण नाही केवळ ओढ अन ज्ञान या दृष्टीनेच हे सर्व आत्मसात करा अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे .
मी Engineer अन व्यावसायिक आहे अन नवीन गोष्टी शिकणे मला फार आवडते. अन त्याच ओघात मी बराच काही अश्या माणसांना भेटतो ज्याचा आपल्या जीवनाशी काही एक संबंध नसतो.
अन त्यांच्याकडून आपण जे ऐकतो ते नवलच असते अन असे बरेच काही मला तुम्हा सर्वांना सांगावे वाटते .
१६०५ अथवा १६२५ नक्की तारीख सांगता येत नाही.
मला पण भास्कराचार्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला त्याचे नाव आहे “निळावंती“ अन मी जवळ पास बरेच महिने या ग्रंथाच्या शोधात आहे अन आज जवळपास ७-८ महिन्यांनी मी तिथेपर्यंत पोहचलो.
पण समजले कि त्याचे अस्तित्व माझ्तापासून दूरच आहे, हे नक्की आहे काय अन ? अन मी का उत्सुक आहे याविषयी ?
हिंदू संस्कृती
फार जुनी आहे अन असे कित्येक मौल्यवान ग्रंथ अन पुस्तके आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी लिहिले आहेत. बर मग आपनास ते माहित का नाही व जर माहित झाले तर आपण तिथेपर्यंत पोहचत का नाही?
हेच तर गूढ आहे …!
पाश्चात्य देशांमध्ये शोध लागतात अन कित्येक वर्ष उलटली कि आपणास कळते हे तर आपल्या ग्रंथ संपदे मधूनच यांना मिळाले आहे मग असे का ?
आपण रक्षक होऊ शकलो नाही किंवा बचाव केला नाही किंवा विकले गेलो कुठे तरी अथवा आणखी वेगळे काही तरी.
तुम्ही शोधाल तर तुम्हाला उत्तर सापडेल जसे मलाही सापडले पण हा तो मुद्दा नाही .
मी खूप दिवस शोधले पण मला हा ग्रंथ सापडला नाही मग कंटाळा येऊन मी शोध थांबवला व आज अचानक मी एका कामानिम्मित्ते बाहेर गेलो असताना एका व्यक्तीशी माझा परिचय झाला.
अन विषय निघता निघता विषय वेदांच्या अभ्यासाचा आला अन मागे होवू तर ते आम्ही कसले ,अन मला ज्ञात झाले कि मी शोध सुरु ठेवायला हवा होता .
मी घरी आलो जवळपास १०.३० वाजले रात्रीचे अन मला Alert Hit झाला या ग्रंथाविषयी अन मी लगेचच फोने लावला कि मला तो विकत घ्यायचा आहे.
अन मला त्याच्या अभ्यासात रुची आहे,पण समोरून जोर जोरात रडण्याचा आवाज आल,२-३ वेळा समोरील व्यक्तीने माझा फोने Cut देखील केला.
पण मला नाही राहवले मी Request केली तर त्यांनी मला सांगितले “ विचित्र असे सत्य आहे जे आजवर एका कापडात आम्ही गुंडाळून ठेवले होते.
आज इतकी वर्ष झाली पण आमचे धाडस नाही झाले कि कापडाचा तो लादा खोलावा अन आत काय आहे ते पाहावे. एकदा उघडून पहिले तर खूप विचित्र स्वप्ने पडू लागली.
मग घाबरून तो तसाच बंद केला, परत धाडस केले तर विचित्र अशी भीती जाणवू लागली अन याच भीतीत आयुष्यातले १० वर्ष गेली अन मी घरातल्या माणसांना गमावून बसलो.
मी अचंबित झालो अन काहीच सुचले नाही हे कसे शक्य आहे, आपण कोणत्या युगात जगतोय अन हे कसे काय? पण सत्य हे सत्यच असते.
अन ते शास्त्र आहे केवळ विज्ञान काही किंवा गणित नाही ते तंत्र विज्ञान आहे जे शक्तींना जागे करते.
मी विचारणा सुरु केली , समोरचा व्यक्ती जवळपास ६० च्या वर वयाचा असावा बहुतेक, त्याने माझा आवाज ऐकताच मला म्हणाला बाळा तू इथेच थांब अन तुझ्या आयुष्यात छान काम कर पण याविषयी काहीच विचारू नको अन मी तुला काहीच सांगणार नाही.
पण तरी मी आग्रह केला, त्याने मला सांगितले त्याने काही ठराविक Chapter वाचले अन त्याला विस्मृती येवू लागली प्रत्येक गोष्ट त्याच्याशी काही तरी बोलतेय असे त्याला वाटू लागले.
मी म्हणालो काय हो काका काय तुम्ही “अग बाई अरेच्चा…. पाहिलंय का, ते म्हणाले मुर्खा मी Researcher आहे अन जास्त पहिले आहे तुझ्या पेक्ष्या आयुष्य ?
अन शिकलोही, मी गप्पा बसलो अन ठरवले आता केवळ ऐकायचे अन काही एक विचारायचे नाही कारण माझे तर केवळ फोन बिल पणाला लागले आहे अन मला मिळणारी माहिती अद्भुत आहे हे मला सत्य उमगले होते….
त्यांनी मला सांगायला सुरवात केली अन मी थक्कझालो कारण आजवर मी केवळ ऐकले होते, पण आज अश्या माणसासह माझा पाला पडला आहे.
ज्याने वर्षानुवर्षे प्रत्येक क्षणी मारनाला सामोरे जावे असे काही उराशी घेऊनच जगाला आहे अन हे मान्य कारण भागच होते मला .मी म्हणालो मग भीती वाटत होती तर विकायला का काढला तुम्ही नष्ट करायचा ना तो ग्रंथ.
ते म्हणाले नाही अस केल तर सर्वच नष्ट होईल , मी म्हणालो अहो असे कसे शक्य आहे ते म्हणाले वाचून बघ तू, अन परत काय मनात आले त्यांच्या अन म्हणाले बाळा तू वेड्यासारखा आग्रह करू नकोस.
विषाची परीक्षा घेण्याचे दिवस नाहीत तुझे का करतोस हे सगळे , मी म्हणालो आबा मला केवळ समजून घ्यायचे आहे, ते म्हणाले या ग्रंथामध्ये श्लोक आहेत अन ते ताम्र पानावर संस्कृत मोडी लिपी वर लिहिले आहेत.
अन त्या मंत्रांची शक्ती इतकी मोठ्ठी आहे कि जगभरातील अथवा जगात नसणारी व विचारात व स्वप्नात दिसणारी कोणतीही गोष्ट तुझ्याशी संपर्क करू शकते अन तू त्यांची भाषा जणू शकतोस.
मी थक्क झालो अन मला जाणवले कि याचा संबंध सजीव, निर्जीव, जलचर, भूचर अन खेचर तसेच काल्पनिक गोष्टींशी आहे, अन चान्दिक्या अथवा स्मुर्ती सुमानामध्ये याविषयी बरेच लिहिले आहे.
काही अघोरी प्राथन मध्ये देखील प्रेतास जिवंत अथवा त्याच्या स्वर्ग अन नरकाच्या प्रवासाचे पत्र असे त्याचे संकेत आहेत, मी विचार करू लागलो.
म्हणजे जर मृत व्यक्तीस बोलता येत नाही तर त्याचे निरोप हे आपणास प्राणी मात्रांकडून संकेतच्या स्वरूपात मिळतात अन मला माझा मुद्दा गवसला,
त्यांचे सांगणे सुरु होते अन मी जवळ पास अर्ध्या तासापेक्ष्य जास्त वेळ या अनोळखी माणसाशी बोलत होतो .
सदर गोष्टीची सुरवात काही अश्या संभाषणाने झाली “मूर्ख फोन खाली ठेव जीव भरला आहे का तुझा ?
तुला भले बुरे काही कळते कि नाही ” अन शेवट असा कि “ दूर राहा मी सगळ गमावलाय अन वेड लागण्याची लक्षणे आहेत हि सगळी ”अन तुला हात जोडते लांब राहा जर तुला भले काळात असेल तर .
निळावंती ज्याचे नावही शापित आहे अन प्रकाश सूर्यापेक्षाही भयानक प्रखर तोच हा प्रवास नाही म्हणता म्हणता सुरु झाला अन मी कोठे तरी येऊन पोहोचलोय नक्की.
बर्याच कथा आहेत यावर जसे “आपण कोणत्याही प्राण्याला वश करू शकतो अथवा त्याच्याशी बोलू शकतो” बर असे कसे शक्य आहे “पहिल्याच सत्रात पहिलीच ओळ मंत्र मुंगीला वश कसे करावे अन तिच्याशी कसे बोलावे ” .
तसेच एका वाचनातच हा ग्रंथ संपूर्ण वाचून झाला पाहिजे नाही तर कोणतीच शक्ती तुम्ही DeActivate करू सहकार नाही व वेड लागू शकते अन याची बरीच उदाहरणे आहेत कि हे सत्य कसे ते.
त्याच पद्धतीने जर कोणी हा ग्रंथ प्रेताला अग्नी चितेवर ठेऊन तसेच त्याचे भस्म होई पर्यंतच्या कालावधीत वाचला तर तो परम ज्ञानी होतो.
अन तसेच जो कोणी याला अर्ध्यावर वाचन सोडेल त्याची पिढी कधीच वाढणार नाही .
यात किती सत्य अन किती खोटे हे तपासू नका, मी बर्याच चर्चे नंतर इथे पोहचलो अन सगळे मुद्दे निट समजावून घेऊनच त्याची परीक्षा घ्यायची ठरवली अन समोर आलेले हे पहिले सत्य विचित्रच आहे माझ्यासाठी.
बर बुद्धीची तुलना करू नका बरेच महारथी असतात ज्यांना लेखकाच्या बुद्धीची तुलना करावी वाटते त्यांनी कृपा करून ग्रंथ मिळवण्याचा प्रयत्न दूरच पण एखाद्या पंडिताला अथवा जाणकार व्यक्तीशी विचार विनिमय करावा, अन गप चूप बसावे.
रहस्य हि बुद्धी मध्येच साठवली जातात अन ती ओखली तर ती रहस्य कसली .
माझे अनुभव मी मांडताच जाईन पण आग्रह करू नये कोणी .
सदर ग्रंथाच्या विविध प्रती तुम्हास सापडतील अन कश्यातच ताळमेळ दिसणार नाही, बर असे का तर अर्धवट ज्ञान अन दिशाभूल करण्याची मार्केट ची पद्धत,बर्याच जनांनी याचे अनुवाद केले आहेत.
पण तरी सुद्धा तुम्ही रहस्यापासून दूरच राहता असे का तर तुमच्याकडे केवळ शब्द आलेत मंत्र नाहीत यामुळे , बरेच जन दावा करतात आमचे संशोधन श्रेष्ठ आहे मग उत्तर का सापडत नाही कारण लपविणे हा त्यांचा अधिकारच आहे .
जीवनाच्या एका टोकावर तुम्ही तेथे पोहचल जिथे ज्ञान अन प्रकाष्याचा मार्ग खुला होतो पण तो मार्ग दर्शनाने नव्हे तर आत्मबल अन अनुभवानेच यावा लागतो .
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.