My title My title
Brain Storming

Think big but start small

मोठा विचार करा पण छोटी सुरुवात करा…



©टीम नेटभेट



बऱ्याच लोकांना बिजनेस मध्ये उतरायचे असते, काही नवीन सुरुवात करायची असते, स्वतःचं स्टार्टअप सुरु करायचं असतं.

बऱ्याच जणांना मोठं काहीतरी करून दाखवायचं असतं, मोठी उडी घ्यायची असते. पण मित्रांनो, शेकडो किलोमीटरचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो हे लक्षात घ्या.

बाळ आधी रांगतं, नंतर चालायला लागतं, आणि त्यानंतर धावायला लागतं. बिझनेसचही असच आहे. आधी हळूहळू सुरुवात करा आणि त्यानंतर मोठी उडी घ्या, काही टिप्स सर्व नवउद्योजकांना देतो आहोत-



१. तुम्ही नक्की ग्राहकांचा कोणता प्रॉब्लेम सोडवताय त्याकडे लक्ष द्या

​ कोणताही बिझनेस सुरु करण्याची सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे ग्राहकांचा नेमका प्रॉब्लेम ओळखणे. त्यानंतरच तुम्ही ग्राहकांना तुमच्या बिजनेस च्या माध्यमातून एक सोल्युशन देऊ शकता.

जर तुम्ही अशा मार्केटमध्ये उतरत आहात जिथे ग्राहकांच्या प्रॉब्लेम्सना उत्तर तुमच्या स्पर्धकांनी यापूर्वीच दिलेले आहे.

तर मग बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये तुम्हाला काय बदल करता येतील, काय सोपे करता येईल, काय स्वस्त करता येईल, काय चांगलं करता येईल, किंवा त्यांची उपयुक्तता कशी वाढवता येईल याचा विचार करा.


२. ज्या मार्केटमध्ये तुम्ही उतरणार आहात त्याचा अभ्यास करा

जेव्हा मॅगी, केलॉग्ज , जिलेट यांचे उत्पादन भारतात आले तेव्हा त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

परदेशात खूप चालणारी ही उत्पादने भारतात मात्र चालत नव्हती. कारण प्रत्येक मार्केट वेगवेगळं असतं.

भारतीय बाजारपेठेनुसार उत्पादनांमध्ये, आणि मार्केटिंगमध्ये बदल केले तेव्हा कुठे या कंपन्यांची उत्पादने भारतीय ग्राहकांनी स्वीकारली.

अगदी भारतातही प्रत्येक राज्य वेगळ मार्केट आहे, प्रत्येक राज्यामध्ये शहर आणि गाव वेगवेगळे मार्केटस आहेत.

तेव्हा तुम्ही नक्की कोणत्या बाजारात आहात त्याचा नीट अभ्यास करा.

तेथील ग्राहकांच्या आवडीनिवडी, सवयी , प्राधान्य, प्रश्न काय आहेत याचा जर तुम्ही अभ्यास केलात तरच तुम्हाला तुमचे उत्पादन ग्राहकांसाठी योग्य आहे की नाही हे ठरवता येईल.

आणि त्या अनुषंगाने योग्य ते बदल करता येतील.


३. आपले उत्पादन किंवा बिझनेस आयडिया टेस्ट करा

बाजारात उत्पादन आणण्यापूर्वी टेस्ट करणं महत्त्वाच आहे.

काही लोकांना बिझनेस आयडिया आवडेल काही लोकांना आवडणार नाही. ज्यांना ती आवडली नाही त्यांचा प्रतिसाद नीट तपासून बघा.

त्यांनी तुम्हाला मोलाची माहिती दिलेली असेल. ती वापरून उत्पादनामध्ये योग्य ते बदल करा आणि मगच प्रॉडक्ट लॉंच करा.


४. प्रतिक्रिया जाणून घ्या
अगदी अनोळखी व्यक्तींना, किंवा वेगळ्याच क्षेत्रातील व्यक्तींना तुमच्या प्रॉडक्ट किंवा बिझनेस आयडिया बद्दल सांगा.

त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असेल आणि त्यामुळे तुम्हाला अशा काही प्रतिक्रिया मिळतील ज्या तुमच्या ग्राहकांकडून देखील मिळणार नाहीत.

त्यांचा वापर आपलं उत्पादन अधिक चांगले करण्यासाठी करा.


५.योग्य मार्केट निवडा
आता तुम्ही बिजनेस लॉन्च करण्यासाठी तयार झाला आहात. परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे छोटी सुरुवात करा.

मोजकच मार्केट शोधून ते जिंकता येते का बघा, त्यानंतर पुढच्या छोट्या मार्केट मध्ये जा.

लगेचच नव्या शहरांमध्ये नव्या राज्यांमध्ये प्रॉडक्ट लॉन्च करायला जाऊ नका.


६. मोजकी टीम

​पैसे असले तरीदेखील खूप जास्त टीम वाढवू नका.

सुरुवातीला प्रत्येकाने प्रत्येक काम केले पाहिजे असा अट्टाहास ठेवा. तुम्हाला कदाचित वाटेल की प्रत्येक कामासाठी योग्य माणूस नेमला ती कामे पटापट होतील, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही.

जेवढी जास्त माणसं, तेवढे जास्त कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स तुम्हाला आढळतील.


७. कार्य क्षमता वाढवण्यावर भर द्या
​तुमच्या मशीन्स, मॅनपावर आणि मटेरियल या तीन “M” चा पुरेपूर वापर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या तीनही M मध्ये वाढ करू नका.

जोपर्यंत हे तिन्ही M किमान 80 टक्‍क्‍यापर्यंत वापरले जात नाहीत तोपर्यंत कार्यक्षमता सुधारण्याला वाव आहे. हा नियम जर तुम्ही वापरला तर कधी तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.

बिजनेस मोठा करणे, आणि बिझनेस प्रॉफिटएबल करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा.

योग्य कारण असल्याशिवाय बिजनेस मोठा करण्याच्या मागे जाऊ नका.

गुंतवणूकदार, मार्गदर्शक, चांगले उत्पादन, कार्यक्षम ऑपरेशन्स आणि चांगली टीम आधी उभी करा त्यानंतरच बिझनेस मोठा करण्याच्या दिशेने पावले टाका.



धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Source: Whatsapp

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button