Brain Storming
The Reality of Some (Fake) Business Coach in Marathi
The Reality of Some (Fake) Business Coach
© श्रीकांत आव्हाड
बऱ्याचदा ऐकायला आलं असेल किंवा बघायला मिळालं असेल…
एखाद्याने कोणत्यातरी Business Coach कडे २-३ लाख खर्च करून Coaching घेतलेली असते आणि वर्षभरातच त्याच्या श्रीमंतीमध्ये खूप मोठा बदल घडलेला दिसून येतो.
आधी उगाच काहीतरी होता आता मोठी गाडी येते, कपडे Branded घालायला सुरुवात करतो. हाताखाली एखादा PA असतो.
असा एखादा व्यक्ती एक तर आपला माहितीत असतो किंवा आपल्या एखाद्या ओळखीच्या एखाद्याच्या माहितीतील असतो… पण कुठेतरी ऐकायला मिळतंच…
त्यांना नक्की काय बदल घडला विचारावे तर ते निश्चित काही सांगत नाहीत, फक्त खूप फायदा झाला असंच सांगतात. मग आपणही विचार करत बसतो.
नक्की काय केलं असे कि याचा Business एवढा मोठा झाला…
खरी गंमत वेगळीच असते.
हे Coach या व्यावसायिकाला तीन चार महिने ब्रेन वॉश करून Business वाढवायचा.
म्हणजे तुमची श्रीमंती दिसली पाहिजे असे सांगण्यावरच भर देतात.
मग यातून कर्ज घेऊन, CC चा पैसा वापरून महागडी गाडी घ्यायला लावले जाते.
महागड्या Branded वस्तू हाताळायला लावल्या जातात.
आता २ लाख Coaching साठी दिलेत म्हटल्यावर आणखी १०-२० लाख खर्च करायला काही प्रॉब्लेम नसणारच…
हा Entrepreneur (उद्योजक)सुद्धा ते सांगतील त्यानुसार लाखो रुपये खर्च करायला सुरुवात करतो.
इकडे याच्या ओळखीचे कन्फ्युज होतात कि याचा Business वर्षभरात असा काय वाढला कि एवढी श्रिमंती आली.
आता एखाद्याचा Business चांगला चालू आहे कि नाही हे काय आपण त्याचे बॅलन्स शीट, सेल्स डेटा पाहून ठरवू शकत नाही, ते आपल्याला कशाला दाखवतील.
आपण त्याची गाडी आणि कपडे पाहून सगळा काही अंदाज लावतो.
म्हणजे त्यांना काय बदल झाला विचारलं तर ते काहीच न बोलता खूप फरक पडला एवढाच सांगतात, अगदी जवळच्या मित्रांना सुद्धा ते काही कळू देत नाहीत.
हे त्यांना Coach ने सांगून ठेवलेलं असतं. यातून व्यावसायिकाला काही विशेष फायदा होत नाही, पण त्या Coachचं नाव आणखी मोठं होतं…
आणि त्यांना आणखी २ लाख फी देणारे नवीन Entrepreneur (उद्योजक) भेटतात…
आपल्या उत्पन्नातून जास्तीत जास्त १०% खर्च एंटरटेनमेंट आणि गाडीवर झाला पाहिजे हे तो Coach आपल्या Client कधीच सांगत नसतो.
आपल्या वर्किंग कॅपिटलमधला पैसा हा Business व्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरायचा नसतो हे तो कधीच आपल्या Clientला सांगत नसतो.
कर्ज घ्यायचंच तर आधी Business साठी आणि त्यातून येणाऱ्या पैशाचे नियोजन जुळले तर मग इतर गोष्टींसाठी हे तो आपल्या Clientला कधीच सांगत नसतो…
तीन चार वर्षांनी हे Entrepreneur (उद्योजक) कधी कुठे दिसले तर त्यांच्या प्रगतीमध्ये सुरवातीला झालेला बदल एवढीच निशाणी उरलेली असते, त्यातही काही वाढ झालेली दिसून येत नाही.
कारण त्यांना Business वाढवण्यासाठी कोणतीही निश्चित Strategy त्या Coaching मधून मिळेळली नसते. त्यांना फक्त भपका कारण्यासाठी मार्गदर्शन मिळालेलं असतं, त्यात ते हवा करून घेतात.
मोटिव्हेशनल लेक्चर आणि दिखावा करण्याची Strategy म्हणजे Business कन्सल्टेशन नसत हे त्यांना समजायला दोन-तीन वर्षे जातात.
असाच माझ्या एका महितीतल्याने एका वर्षात १० पटीने Business वाढवण्यासाठी २ लाख रुपये एकाकडे खर्च केले होते, त्यांनी सल्ला दिला कि १० पटीने Business वाढवण्यासाठी १० ब्रॅंचेस सुरु करा.
आता १० ब्रॅंचेस सुरु करण्यासाठी १० पट गुंतवणूक लागते, आणि १० पट गुंतवणूक केल्यांनतर Business सुद्धा १० पटीने वाढेलच हे त्याला माहित नसावं म्हणून त्यालाही तो सल्ला मनापासून पटला…
खरी गंमत याच्या पुढे आहे, त्याचा व्यावसाय होता MS-CIT सेंटरचा.. आणि हे सेंटर आपल्या मनाप्रमाणे १० ठिकाणी सुरु करता येत नाही हे कळलल्यावर तो “१० पटीने Business नाही वाढला पण फायदा झाला” असंच सगळ्यांना सांगतो…
#आहेघरचं_करा_खर्च
अशाच एका लाखो रुपये घेणाऱ्या आणि फक्त मोठी गाडी आणि महागड्या वस्तू घेण्याचे मार्गदर्शन करणाऱ्या एका Business Coach ने माझ्याच Business Tips आपल्या नावाने खपवल्याचं काल पाहण्यात आलं.
त्याने त्या Tips इतर ठिकाणाहून घेतल्या हा विशेष महत्वाचा मुद्दा नाही, महत्वाचा मुद्दा असा आहे कि जर त्याच्याकडे स्वतःचे बेसिक कंटेन्ट सुद्धा नसेल तर तो Coachingमध्ये नक्की काय सांगत असेल?
The Reality of Some (Fake) Business Coach
© श्रीकांत आव्हाड
5 Business Ideas For College Students In 2022 [No Investment Needed](Opens in a new browser tab)
Unique Startup Ideas for India with 20x Faster Growth(Opens in a new browser tab)
Top 7 out of the box Startup Ideas that will Grow in India(Opens in a new browser tab)
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.