Post's
Smartphone मधील व्हायरस कसा शोधायचा? लक्षणे, उपाय आणि खबरदारी
फोनमधील व्हायरस कसा शोधायचा?
लक्षणे, उपाय आणि खबरदारी
Digital Ritesh
Smartphone मध्ये असंख्य कारणांनी Virus घुसू शकतो. आणि त्याचा परिणाम Smartphone च्या Function वर होतो. खरंतर Smartphone मध्ये Virus शोधणं फार सोपं आहे…
Virus वेळेवर कसा शोधायचा आणि त्यानुसार तातडीने कोणता उपाय करायचा, काय काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.
हॅकर्सद्वारे मोबाईल फोन वारंवार लक्ष्य केले जातात. पण काळजी करु नका, मोबाईल फोनमध्ये Virus असल्याची लक्षणे कोणती हे जाणून घेणं सोपं आहे.
तुमच्या फोनमध्ये Virus असल्याचे संकेत
- मोबाईल डेटाचा लक्षणीय वापर
- फोन जास्त गरम होणे
- बॅटरीचे आयुष्य कमी होणे
- Apps सातत्याने Crash होणे किंवा हळू उघडणे किंवा अजिबातच न उघडणे
- तुमचा फोन Slow होणे
- वारंवार Popup येणे
- अज्ञात Apps इन्स्टॉल होणे
तुमचा फोनमध्ये वर सांगल्याप्रमाणे काही काही लक्षणे दिसत असल्यास Malware असल्याची शक्यता आहे…
फोनमधून व्हायरस काढून टाकणे
- लक्षणे दिसताच तुमच्या फोनमधून नको असलेले Apps काढून टाका
- फोनमध्ये Antivirus सॉफ्टवेअर (सशुल्क म्हणजेच Paid Apps) टाका.
- Anti-Virus सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा फोन पूर्णपणे Scan करा.
- तुमच्या संपूर्ण डेटाचा Backup घ्या आणि Factory Reset करा.
खालील खबरदारी अवश्य घ्या…
- Anti-Virus सॉफ्टवेअरशिवाय तुमच्या फोनमध्ये कोणतंही सॉफ्टवेअर कधीही डाऊनलोड करु नका.
- सार्वजनिक Wi-Fi वापरणं टाळा.
- SMS, E-Mail आणि इतर माध्यमातून शेअर केलेल्या नको असलेल्या लिंकवर क्लिक करु नका.
- कोणत्याही सोर्सवरुन कोणतंही फ्रीवेअर डाऊनलोड करणं टाळा.
- तुमचा फोन दुसऱ्याच्या हातात देणं टाळा.
- तुमचा फोन कायम अधिकृत सर्विह सेंटरमध्येच दुरुस्त करा.
- तुमच्या फोनवर लॉक ठेवा.
- मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन करुन सर्व बँकिंग Apps सुरक्षित ठेवा
Also Read,
How to Recover Permanently Deleted Files and Folders in Google Drive | Digital Ritesh