My title My title
Brain StormingSomething Different

Science Behind Bats in Ancient Temple

Science Behind Bats in Ancient Temple…

प्राचीन मंदिरांमध्ये वटवाघळे का असतात…?

 



©Anna®2021



मित्रांनो! आपल्या आसपास शेकडोंच्या संख्येमध्ये वटवाघुळ आपण पाहीलेले असतील.

वटवाघुळ वास्तविक पुरातन मंदिरे, जुन्या वास्तु, भवन, जंगल किंवा एखाद्या झाडावर स्वत:ला उलट्या दिशेने लटकवून घेतलेली दिसतात.

दिवसाच्या उजेडामध्ये वटवाघुळाला कधीही शक्यतो आपण बघत नाही. वास्तविक वटवाघुळ प्रकाश पसंद करत नाहीत.

वटवाघुळांचे डोळे वास्तविक प्रकाश सहन करण्यायोग्य मुळीच नसतात. पौर्णिमेच्या रात्रीचा प्रकाशसुद्धा सहन होत नसल्यामुळे वटवाघुळ अंधार्‍या ठिकाणी जातात.

परंतु वटवाघुळामध्ये एक अद्भुत शक्ती आहे हे खूप कमी लोकांनाच माहीती असेल.

मी प्रत्येकवेळी एक गोष्ट आवर्जुन सांगतो की, सनातन हिंदुऋषी मुनी हे फक्त मंत्रसाधना करणारे आणि यज्ञ करणारे सिद्ध साधुच नव्हते तर ते एक संशोधक सुद्धा होते.

आपल्या हिंदु ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वीच वटवाघुळांवर असे संशोधन केले होते की, ते ऐकल्यावर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल.

सर्वसामान्य मनुष्य केवळ २० किलो हर्ट्स ( 20 Hz- 20 KHz ) एवढाच ध्वनी ऐकू शकतो. ज्याला वैज्ञानिक भाषेत इन्फ्रा साऊंड (Infra Sound) असे म्हणतात.

परंतु त्यावरचा ध्वनी सर्वसामान्य मनुष्य ऐकू शकत नाही. ज्याला शास्त्रामध्ये सुक्ष्म ध्वनी असे म्हणतात.

वटवाघुळाला सर्वसामान्य मनुष्याला जो ध्वनी ऐकू येत नाही तो सुक्ष्म ध्वनी ऐकू येण्याची दिव्य क्षमता प्राप्त आहे.

वटवाघुळ २०० किलो हर्ट्स एवढा दिव्य ध्वनी ऐकू शकतात. आपल्या सनातन हिंदु ऋषीमुनींनी ह्याचा शोध हजारो वर्षापुर्वीच लावला होता.

आजच्या वैज्ञानिकांनी सुद्धा काही वर्षापुर्वीच सिद्ध केले आहे की, विशिष्ट जादुई ध्वनी म्हणजेच अल्ट्रा साॅनिक साऊंड निर्माण करून वटवाघुळाला आकर्षित करता येते.

परंतु हिंदु ऋषीमुनींनी हजारो वर्षापुर्वीच वटवाघुळाची क्षमता ओळखली होती त्यामुळेच त्यांनी जुनी मंदिरे, वास्तु, भवन बांधण्यासाठी वटवाघुळ जिथे निवास करतात अशी ठिकाणे निवडली होती.

ह्यामागचे खरे कारण हे आहे की, २०० किलो हर्ट्सचा ध्वनी ( 20 MHz- over 20,000 Hz) शास्त्रामध्ये आणि आजच्या विज्ञानामध्ये जादुई ध्वनी ( Ultra sonic Sound ) म्हणून ओळखला जातो.

आणि हा आवाज ऐकण्याची क्षमता केवळ वटवाघुळांमध्येच आहे. ह्या दिव्य ध्वनीमुळे वटवाघुळ त्या ध्वनीकडे आकर्षित होतात.

अशा ठिकाणी ध्यानमंदिर, साधना, भवन, वास्तु, मंदिरे पुर्वी बांधली जात होती.

कारण मनुष्याने जर अशा ठिकाणी मंत्र पठण केले असता त्या मंत्रामुळे अवतीभोवती सर्किट डायग्राम तयार होतो ज्याला आपण ध्वनी तरंग असे म्हणतो.

जादुई ध्वनी (अल्ट्रा साॅनिक साऊंड) आणि मंत्राचा ध्वनी तरंग ( सर्किट डायग्राम) ह्यांच्या संयोगाने एक साऊंड डिव्हाईस निर्माण करता येवू शकतो.

हा एकत्रित निर्माण होणारा जादुई ध्वनी मनुष्याला विविध ग्रहावर घेवून जावू शकतो. ज्याला अध्यात्मामध्ये समाधी अवस्था असे म्हणतात.

आणि आजच्या वैज्ञानिक भाषेत “स्टार गेट ऑफ ब्रम्हांडा” असे आपण म्हणू शकतो.

आजपर्यत कोणत्याही धर्मामध्ये असे संशोधन कधीही झालेले नव्हते परंतु सनातन हिंदु ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वीच ह्या दिव्य ध्वनीचा शोध लावून परलोकातील शक्तींशी संपर्क साधला होता.

अजूनही हिमालयातील सिद्ध साधु ह्याच आधाराचा उपयोग करतात आणि परलोक शक्तीशी नेहमी संपर्क ठेवतात.

ह्यावरून हे स्पष्ट होते की, आपले पुर्वज आजच्या विज्ञानापेक्षा कितीतरी प्रगत संशोधन करत होते.

प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनी परलोक ग्रहावरून सुचना व संदेश प्राप्त करण्यासाठी ह्या दिव्य ध्वनीचा उपयोग करत होते.

मित्रांनो! हा आहे आपला प्राचीन सनातन हिंदु धर्म आणि हे आहेत आपले प्रगत हिंदु ऋषीमुनी. आजच्या विज्ञानाच्या कितीतरी वर्षापूर्वीच आपल्या पुर्वजांनी अनेक शोध लावून ठेवले आहेत.

त्यामुळे अंधश्रद्धा सोडा आणि अगदी वैज्ञानिक दृष्टीकोनातून हिंदु धर्माचा, पुरातन ग्रंथांचा आणि मंत्रांचा अभ्यास करा.

आपले पुर्वज शास्त्र जाणणारे आणि वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे समृद्धशील संशोधक होते हे कधीही विसरू नका.

टिप- वरील लेख पुरातन प्राणीशास्त्र आणि पुरातन ग्रंथाच्या आधारे लिहला आहे. ह्याची कृपया नोंद घ्यावी.



©Anna®2021 (7249157379)



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button