My title My title
BlogMental HealthPost's
Trending

What is Obsessive Compulsive Disorder..

OCD म्हणजे नेमके काय?

What is Obsessive Compulsive Disorder..

Obsessive Compulsive Disorder म्हणजे नेमके काय? 

©सुजाता डोंगरे,
काॕन्सलर, समन्वयक
ब्रेनवे रिसर्च फाऊंडेशन
9960286744

 

Obsessive Compulsive Disorder. म्हणजे एखादी गोष्ट सतत करत राहण्याची आपल्याला सवय होते . ती गोष्ट केल्यानेच आपल्याला बरे वाटते . म्हणजे आपल्याला जर कंटाळा येत असेल तरी जर आपण घरातला पसारा आवरण्याचे काम अगदी न थकता करत असू . कधीकधी हे काम आपण तासंनतास करत राहतो. हा पसारा आवरताना ,आपण आधी सर्व सामान पसरतो,आणि मग ते परत होते तसेच लावून ठेवतो. त्यात आपण काय आवरल ? काय नीट ,व्यवस्थित लावल याला महत्त्व नसते . फक्त ते कपाट लावणे ,किंवा ती रूम नीट आवरणे हाच आपला हेतू असतो. यात आपल्याला थकवा येत नाही ,आपण काही काम केल्याचेही दिसत नाही .पण मनाला ,किंवा आपल्या बुध्दीला तो एक चाळा असतो.  पण हे करण आवश्यक असते .ते त्यावेळी जर केले नाही तर अस्वस्थ वाटू शकत ,बैचेन वाटत , मनात कधी अति निराशा येते ,तर कधी राग येतो ,कधी काहीच सुचत नाही . पुढेपुढे हीच आपली सवय आपली साथीदार होऊ लागते . ती एकच गोष्ट आपल्याला करताना बरे वाटायला लागते . मग OCD आपल्या शरीरात पसरू लागते . शरीर इतर कोणत्याही गोष्टीला फारसे महत्त्व देत नाही . 

असे का होते ?  

मेंदूमध्ये प्रत्येक  अवयवाचे एक स्वतंत्र केंद्र आहे .कुठलेही केंद्र दुसऱ्या केंद्राशी जोडलेले नसते . फक्त भावनांचे व विचारांचे केंद्र ही दोन केंद्र इतर केंद्राशी जोडलेले असतात. त्यामुळे कोणत्याही भावनेचा जर योग्य निचरा झाला नाही तर ही भावना त्रासदायक होऊ लागते . मग हळूहळू असुरक्षतिता मनात येऊ लागते .ही असुरक्षितता ,भिती घालवण्यासाठी निरनिराळी कामे करण्याचे योजले जाते .मग कधीतरी कुठेतरी मनाला बरे वाटते .कधीकधी तीच कृती करण्यात समाधान मिळू लागते ,त्यासाठी एखादी कृती सारखी केली जाते . मग वारंवार बाथरूमला जाणे असेल ,किंवा वारंवार हात धुणे असेल ,किंवा कधीकधी एखादी कृती सतत केली जाते .

  वारंवार एखादी कृती करणे ,ती कृती केल्यावर सुरक्षित वाटणे ही OCD आहे .

  याची सुरवात कधी झाली ? कशी झाली ? हे समजणे महत्वाचे आहे . प्रत्येकाला स्वतंत्र  विचार करता येतात . हे समजून घेणे जरूरी आहे . प्रत्येकाला भावना असतात, त्या योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त झाल्या नाहीत, तर माणसाचे विचार थांबतात, त्याचा मेंदू एका विशिष्ट कृतीत अडकून जातो. हळूहळू  बुध्दीची केंद्रे ,कामकरणे बंद करतात ,आणि माणूस या चक्रात अडकला जातो. म्हणूनच मानसिक आजार हा समजयायला वेळ लावू नका. कारण मानसिक आजार हे  मर्यादा ओलांडून बाहेर जाण्यास वेळ लागत नाही, पण जेव्हा ते मर्यादा ओलांडून बाहेर जातात, तेव्हा शरीराची  हानी करायला लागले  असतात.  आणी मग उपचार सुरू होतात ते शरीराच्या व्याधीवर. मनाची अस्वस्थता मात्र तशीच राहते.

बरोबर ना ?

Source

लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Harshada Ghate

I am Harshada Ghate, an MCA student and professional blogger. I enjoy digital creation, video editing, and modeling. I also love working out at the gym. As a digital marketing expert, I can help you luxury-ize your online presence. Check out my website, https://itworkss.in/, for more information. Follow me on Instagram @hasshu_5.3 for luxury lifestyle tips and tricks!
Back to top button
%d bloggers like this: