Varunraj kalse
Childrens toys and their Development
- ,
- , Uncategorized
Childrens toys and their Development…
लहान मुलांची खेळणी आणि त्यांची जडण-घडण…
©प्रा. पंचशीलडावकर,
(समन्वयक, बालभवन, नारी प्रबोधन मंच,लातुर)
साधारणतः सहा वर्षापूर्वी गॅब्रियल गलिमबर्टी नावाच्या एका इटालियन छायाचित्रकाराने एक विषय घेऊन प्रयोग केला होता. तो म्हणजे, हा छायाचित्रकार जगभरातील वेगवेगळ्या देशांत आपला कॅमेरा घेऊन भरपूर फिरला.
तो जिथे कुठे गेला तिथे त्याने या विषयाला धरून त्यांनी लहान मुलांची काही छायाचित्रं टिपली आणि आपल्या देशोदेशीच्या वारीवरून परत आल्यानंतर त्यांनी ही छायाचित्रं जगासमोर आणली.
या छायाचित्रकाराचा विषय होता ‘टॉय स्टोरी’. तो भारतासह USA, Italy, China, Ukraine, Costa Rica, Morocco, Thailand, Haiti अशा अनेक देशांत १८ महिने सलग फिरला.
आणि या देशांतील मुलं कशा प्रकारच्या खेळण्यांसोबत खेळतात ते आपल्या Photographs मधुन समोर आणलं. त्याने काढलेले Photos लोकांना प्रचंड आवडले त्याची खुप प्रशंसा झाली पण गॅब्रियल यावरती थांबला नाही.
त्याने ‘लहान मुलं आणि त्यांची खेळणी’ हा इतका साधा आणि सोपा विषय निवडला होता पण प्रत्यक्षात तो तेवढा सोपा विषय नव्हता; त्यातून एक नवा विषय बाहेर आला.
त्या देशांचं Environment, culture, economic system यांचा परिणाम हा तिथल्या प्रत्येक व्यक्तीवर होत असतो, हे त्याने आपल्या संशोधनातुन मांडलं आणि विशेषतः त्यात लहान मुलं देखील येतात.
ही त्याची प्रमुख मांडणी होती. त्या त्या ठिकाणच्या मानसिकतेप्रमाणे पालक आपल्या मुलांना खेळणी घेऊन देतात. हे त्याने साधार सिध्द केलं.
उदा. कायम युध्दाच्या खाईत असलेल्या देशात मुलांना नकली बंदुका हमखास खेळण्यात दिलेल्या दिसुन आल्या. आपल्या आजुबाजुला देखील आपण पाहीलं तर याची प्रचिती नक्की येईल.
आपल्या घरी बाळ येणार आहे या जाणीवेनंचं बाळाच्या आगमनासाठी खेळण्यांची खरेदी सुरु होते. बाळासाठी खेळणी घेणं हा, त्यांच्यावरती प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे असे आपल्याला वाटते. जितकी सुबत्ता जास्त तितकी खेळणी जास्त दिली जातात.
लहान मुलांचा सर्वात आवडता विषय म्हणजे खेळ आणि ते ओळखूनच पालक मुलांना खेळणी देतात. दुसरं असं की, मुलांना खेळण्याची सवय ही उपजतच असते. कारण त्याचा जग नावाच्या अवघड अभ्यासक्रमाला प्रवेश झालेला असतो.
आणि ते समजुन घेण्यासाठी स्पर्शातुन, रंगातुन, पाहण्यातुन, आवाजाद्वारे, अनेक हालचाली द्वारे खेळणे चालु होते.
एखादी वस्तु खुप हालतीये आणि ती आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यासमोर स्थिर होत नाही, म्हणूनही बाळाला रडु येतं कारण त्या वस्तुला त्याला पहायचं असतं. न्ह्याहाळायचं असतं. नजरेनं का असेना तिच्या सोबत खेळायचं असतं.
असो आत्ता आपण बाळाच्या विकासासाठी खेळण्यांची निवड कशी करायला हवी हे पाहुयात. सर्वांना माहीतच आहे की, मुलांना इजा न होणारी खेळणी खेळायला द्यावीत, शक्यतो ती, soft toys असावीत.
त्यामधून मुलांच्या सृजकतेला आणि त्यांचा शारीरीक मानसिक आणि बौध्दिक विकासाला चालना मिळायला हवी.
मुलांना प्रत्येक वेळी महागडीच खेळणी दिली पाहीजेत असं काही नाही. पालकांनी अगदी एखाद्या पक्षाचा पंख जरी आणला तरी तो मुलांना लाख मोलाचा आनंद देणारा असतो. पण प्रत्यक्षात आपण काय करतो.??
परंपरेने जे आपल्या डोक्यात रुजलेलं आहे ते मुलांना खेळायला घेऊन येतो. उदा. मुलांसाठी वेगळी खेळणी दिली जातात.
जसे की, मुलगा असेल तर guns, horses, cars, विविध रंगाच्या Cars, Swords, Trucks, Tractors, Foot Balls, Crickets, Boxing Gloves.
तर मुलींना Dolls, Fairy Tales, Barbie Dolls, Kitchen Sets, Makeup Kits, Purses, Houses, Teddy Bears, अशी खेळणी जी बाजारात असतात. ती विकत आणून मुलांना खेळायला दिली जातात.
आता प्रश्न पडतो आपण खरोखऱ ही खेळणी विचारपुर्वक निवडली आहेत का?
तर नाही आपली Development ज्या पध्दतीने झाली, त्यानुसार आपण ‘लिंगभाव’ डोक्यात ठेवून ती खेळणी मुलांना दिली. ‘लिंगभाव’ म्हणजे काय तर जन्माने एखादं शरीर स्त्रीयांचं आहे की, पुरुषाचं हे ठरलेलं असतं पण त्या शरीरातील Mind, thoughts, feelings, habits या वेगळ्या असु शकतात.
उदा. एखाद्या पुरूषाच्या शरीरातील मन स्त्रीसुलभ, हळवं, लगेच रडणारं, नाजुक असु शकतं तर याउलट स्त्रीच्या शरीरातील Mind, thoughts, feelings, habits या Bold, brave, strong, fearless असु शकतात.
‘लिंग’ हे जन्मानं मिळतं तर ‘लिंगभाव’ हा समाज निर्मित असतो. आपल्या सामाजिक सांस्कृतिक व्यवहारातुन व वर्तनातुन तो प्रतिबिबींत होत असतो.
म्हणजे आपल्या मुलांची लिंगभावाची Development आपण खेळण्याद्वारे देखील एकप्रकारे पक्की करत असतो.
आणि ही आपण मोठ्यांनी रचून दिलेली किंवा आयती दिलेली गोष्ट, मुलांनी स्विकारावी ही आपली अपेक्षा असते.
आपल्या मुलांना नेमकं काय खेळायचं आहे? कशासोबत खेळायचं आहे? त्याला नेमकं काय आवडतं ?
याचा विचार पालकांनी करायला हवा त्याच निरिक्षण करायला हवं. पण प्रत्यक्षात खुपच कमी प्रमाणावरती सजग पालक याचा विचार करतात.
आमच्या बालभवनात मृग नावाचा साधारण तीन वर्षांचा मुलगा आला. त्याला स्वतःच्या विश्वात रहायला आणि एकटं खेळायला जास्त आवडायचं, कारण घरी सुध्दा तो खुप लाडका आहे.
एकुलता एक असल्यामुळे त्याला फारसं बाहेर सोडलं जात नाही. घरामध्ये त्याचे प्रचंड लाड होतात. परिणामी तो आता इतरांमध्ये मिक्स होण्यास नकार देतो. नातलगांनी कितीही आग्रह केला, लाड केला खेळणी दिली, तरी याची त्याला ना असते.
मृगच्या आईला त्याची काळजी वाटते. डॉक्टरांनी त्यांना बालभवनात जाण्याचा सल्ला दिला. एके दिवशी त्या मृगला घेऊन बालभवनात आल्या. मृग नेहमी प्रमाणे एक खेळणी झाली की, दुस-या खेळणीकडे वळत होता. झपाझप खेळणी बाजुला सारत पुढे जाई.
कोणत्याही एका खेळणीवरती तो दोन मिनिटापेक्षा जास्त खेळला नाही आणि फार रमलाही नाही. मग त्याची नजर बाजुला ठेवलेल्या भातुकलीवरती गेली. खरं म्हणजे मृगसाठी भातुकलीचा खेळ अगदी नवीन होता.
कुठल्याही नवीन खेळाशी बाळाची जेंव्हा ओळख होते, तेंव्हा तो आनंद पाहण्यासारखा असतो. त्याने भातुकली खेळायला सुरुवात केली. खरं म्हणजे मुलांना मोठ्यांसारखं भाषेद्वारे भराभर व्यक्त व्हायला येत नाही म्हणून ती खेळाद्वारे व्यक्त होत असतात.
जगाचा अभ्यास करण्याच्या प्रक्रियेत ते आपल्या अवताल भवतालच्या माणसांचे निरिक्षण करतात. त्यांचं अनुकरण करत असतात. या अनुकरणातुनच मुलं ‘रोल प्ले’ म्हणजे दुस-याच्या भूमिकेत शिरुन जगाकडे पाहण्याची संधी ते खेळाच्या माध्यमातुन घेत असतात.
मृग देखील तसाच करत राहीला. त्याने किचन वरती पातेलं ठेवंल, त्याला पकडीने घट्ट पकडलं, कप घेतले, त्यावरती गाळणी ठेवली, कपामध्ये खेळातला चहा ओतला. पातेल खाली ठेवलं आणि स्वतःशीच पुटपुटला ‘हळू हं… भाजेल!’
आणि आम्हा सर्वांना त्याने चहा दिला. तो खेळ तो कितीतरी वेळ खेळत राहीला. अलिप्त असलेल्या आपल्या मुलाला भातुकलीचा खेळ इतका आवडावा, हे त्याच्या आईसाठी आश्चर्यकारक होतं.
तिने आमच्याकडे तिची शंका व्यक्त केली; ‘हा तर मुलींचा खेळ आहे, मग त्याला अशीच मुलींच्या खेळाची सवय लागली तर…?’
मृगच्या आईला पडलेला हा प्रश्न आपल्या समाजातील हजारो पालकांचा प्रश्न आहे. हे मी नीट ओळखले होते. आम्ही त्यांना सांगितलं. ‘भातुकली हा खेळ केवळ मुलींचा नाही तर तो तितकाच मुलांचाही आहे.’
मुलं खेळातुन जगाला थेट भिडतात इतरांच्या भूमिका त्यांना समजायला त्यांच्या संवेदना जाणून घ्यायला मदत होत असते. मुल जेंव्हा भातुकलीशी खेळतं तेंव्हा ते आई, आजी, आजोबा, बाबा यांच्या भूमिकांचा अभ्यास करत असतं.
सोलणं, चिरणं, ओटा पुसणं, एका हाताने एक वस्तु पकडून दुस-या हाताने ओतणं या कृती मुलांनी केल्या मुळे त्याच्या बोटांमधील स्नायु कशा प्रकारे क्रिया करतात हे त्याला समजुन येतं. आपल्याला जे दिसलं ते खेळातुन त्याची समज करुन घ्यायला मदत होते.
उदा. चिन्मय बाहुलीला आपल्या मांडीवरती हळूच उचलुन घेतो उचलांना उं…हुश असा मोठ्यांसारखा आवाज करतो. तिचे लाड करतो, तिला दुध पाजवतो, तिला अंघोळ घालतो आणि छान कपडे घालुन पोटात घेऊन झोपतो सुध्दा.
या त्याच्या कृतीतुन ममत्व, मातृत्वाचा काल्पनिक आनंद तो घेतो, याचा अर्थ तो आपल्या पालकांच्या निरिक्षणातुन शिकलायं की, लहान मुलांना किती काळजीने सांभाळायला हवं. त्यांची कशी देखभाल करायला हवी.
ममत्वाची स्त्री सुलभ भावना लहान वयात आपल्या मुलांमध्ये विकसित झाली तर कुठलंही मुलं मोठं झाल्यानंतर दुस-या स्त्रीवरती अन्याय आणि अत्याचार करणार नाही. कारण त्याने रोल प्ले करुन इतरांच्या दुःखाची सल काही प्रमाणात का असेना बालवयात अनुभवलेली असते.
विशेषतः मुलं आणि मुलींना अशी लिंगभाव प्रदर्शित करणारी खेळणी देण्यापेक्षा, ती ‘Gender Neutral ’ खेळणी द्यावीत म्हणजे, त्यामधून त्यांचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रवास ते स्वतः निवडतील असे मत, अमेरिकेतील बालमानसशास्त्राच्या अभ्यासक डॉ.एलिझाबेथ लोम्बार्डो यांनी अलिकडेच व्यक्त केलयं.
मुलांचा विकास STEAM (science, technology, engineering, mathematics and A for art) या आधारावरती झाला पाहीजे. असं अलीकडे झालेल्या संशोधनातुन स्पष्ट करण्यात आलयं.
तेंव्हा ‘Female’ आणि ‘Male’ या द्वंद्वापलिकडे जाणारी व्यक्ती म्हणून आपल्याला आपल्या बाळाला अवकाश देता आला तर, तो नक्कीच आपल्यातील पालकत्वाचा सर्वात मोठा विजय असेल.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🆁🅴 करा
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.