My title My title
BlogPost'sSomething Different
Trending

The story of the 500 million dollar smiley..!

500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !

The story of the 500 million dollar smiley..!

The story of the 500 million dollar smiley..!

500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !

©सलिल सुधाकर चौधरी

आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील Harvey Ball नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे Harvey Ball हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं.

तो क्लाएंट एक Insurance कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुकताच एक स्पर्धक कंपनीसोबत मर्जर केलं होतं. दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे कर्मचारी एकत्र काम करणार होते. त्यामुळे ऑफिस मधील तणावाचे वातावरण हलके करण्यासाठी त्यांनी Harvey Ball ला काही आनंदी व हलक्याफुलक्या डिझाइन्स बनवायला सांगितल्या.

फोन ठेवल्यानंतर केवळ 10 मिनिटातच Harvey ने पुढे जाऊन जगप्रसिद्ध झालेले Design बनविले. एक पिवळ्या रंगाचा गोल आणि त्यावर काळ्या रंगात काढलेले उभट डोळे आणि मोठं स्माईल. तेच चित्र ज्याला आज आपण smiley ☺️ म्हणून ओळखतो. या कामाचे हार्वेला 45 डॉलर्स मिळाले. इतिहासातील हा पहिला Smiley Icon होता.

लवकरच अमेरिकन कल्चर मध्ये हे सोपे आणि तरीहि परिणामकारक smiley चिन्ह सर्वत्र दिसू लागले. smiley ची लोकप्रियता पाहून अनेकांनी या चिन्हाचा वापर सुरू केला. गिफ्टशॉप चालविणाऱ्या दोघा भावांनी smiley चिन्ह छापून त्याखाली Have a nice day असं लिहिलं. त्यांच्या या नव्या गिफ्ट च्या 50 लाख प्रती विकल्या गेल्या.

हार्वेची ही Design लाखो डॉलर्स किमतीची होती हे एव्हाना कळले होते. पण हार्वे ने एक चूक केली, त्याने कधीच smiley ट्रेडमार्क रजिस्टर केले नाही.

त्यानंतर 8 वर्षांनी 1971 मध्ये जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात फ्रान्स मध्ये एक तरुण पत्रकार आपल्या करिअरची सुरुवात करत होता. फ्रँकलीन लोफरानी असं त्याचं नाव. फ्रान्स-सोयर नावाच्या एका वर्तमानपत्रात सकारात्मक बातम्यांचं एक सदर करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. सकारात्मक बातमीला शोभेल असं smiley सारखच दिसणारं एक चिन्ह त्याने वापरलं. हे चिन्ह Harvey Ball च्या smiley सारखंच होतं.

पत्रकार असला तरी फ्रँकलीन चं “उद्योजक” डोकं काम करत होतं. त्याला या चिन्हांची ताकद कळली होती. त्याने लगेचच फ्रेंच ट्रेडमार्क रजिस्टर केलं. त्याकाळी licensing हा प्रकार फारसा नव्हताच. त्यामुळे ट्रेडमार्क रजिस्टर केले तरी आर्थिक फायदा होत नव्हता. काही वर्तमान पत्रांनी smiley चिन्ह वापरण्याची तयारी दाखविली आणि त्यासाठी पैसे ही दिले.

पण फ्रँकलीन ला मोठ्या प्रमाणावर हे चिन्ह वापरले जावे असं वाटत होते. त्यासाठी तो योग्य संधी शोधत होता. त्या काळात फ्रान्स मध्ये तरुणांमध्ये एक सांस्कृतिक बदलाची चळवळ (Counter – cultural movement) जोर धरत होती. जुने सांस्कृतिक बंधन झुगारून तरुण विद्यार्थी मुक्त प्रेमाची, वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा स्वीकार करत होते. फ्रँकलीन ने हीच संधी साधली आणि आपल्या smileyचे दहा लाख स्टिकर्स छापून विनामूल्य विद्यार्थ्यांना वाटून टाकले. लवकरच हे स्टिकर्स walls, cars वर सर्वत्र दिसू लागले. एका अर्थाने smiley या चळवळीचं प्रतीकच बनला.

smiley लोकप्रिय झालं तसे ब्रँड्स आपोआपच फ्रँकलिन कडे यायला लागले. लवकरच Chocolates, T-shirts, Jeans, Notebooks, Pen, Pencil अशा अनेक उत्पादनांवर smiley चिन्ह झळकू लागले. पुढे रॉक कल्चर येऊ लागले तेव्हा फ्रँकलिन ने अनेक DJ आणि म्युझिक स्टार्स बरोबर smileyच्या वापरासाठी करार केले.

20-25 वर्ष smiley चर्चेत होता आणि फ्रँकलीन ला कमावून देखील देत होता. पण 90 च्या दशकात smileyची लोकप्रियता ओसरू लागली आणि licensing deals देखील कमी झाल्या. फ्रँकलिनने त्याच्या मुलाला निकोलस ला बिझनेस मध्ये आणले. निकोलस ने सूत्र सांभाळल्या नंतर त्याला जाणवलं की त्याच्या वडिलांनी केवळ लोगो वापरून 25 वर्षे व्यवसाय केला. पण ना त्याला नाव होते, ना कोणती कंपनी.

निकोलस ने पहिल्यांदा आपल्या लोगो नाव दिले “smiley” आणि एक कंपनी स्थापन केली “The Smiley Company” . त्यानंतर आपले ब्रँड नाव, चिन्ह त्याने 100 पेक्षा जास्त देशांमध्ये रजिस्टर केले. जिथे ते चिन्ह आधीच कुणी रजिस्टर केले त्यांच्याकडून विकत घेतले किंवा कायदेशीर लढाई करून जिंकून घेतले.

एवढं करून निकोलस थांबला नाही तर त्याने आपल्या लोगोसोबत अशी गोष्ट केली जी करण्याची हिंमत Branding च्या जगात कोणीही करणार नाही. संगणक आणि इंटरनेट क्रांती होऊ घातली आहे आणि त्यात smiley वापरता येत आहे  हे पाहून निकोलस ने smileyची असंख्य रूपं डिझाईन करून घेतली. हसणारा 😊, रडणारा 😢, रागावलेला ☹️, आश्चर्य चकित झालेला 😮 अशी 300 पेक्षा जास्त चिन्ह निकोलस ने केली. यांनाच आपण EMOTICONS म्हणून ओळखतो. Smiley World नावाने “जगाची नवीन भाषा” असं ब्रीदवाक्य घेऊन निकोलस ने कंपनीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. सॅमसंग आणि नोकिया या मोबाईल कंपन्यांनी देखील त्यांच्याबरोबर licensing deal केली.

फ्रँकलीन आता 76 वर्षांचा आहे आणि पिवळा गोल हसरा चेहरा असलेले हे चिन्ह घेऊन The Smiley Company आजही दरवर्षी 500 मिलियन डॉलर्सचा बिझनेस करत आहे. McDonald’s, Coca-Cola, Nutella, Nivia  असे 300 ब्रँड्स आजघडीला SMILEY वापरत आहेत. एवढेच नव्हे तर लंडन मध्ये The Smiley Company च्या ऑफिस मध्ये 40 लोकांची मार्केटिंग टीम कोणत्या नव्या ब्रँड्स सोबत डील करता येईल याचा शोध घेत असते.

हा smiley ज्याने सर्वप्रथम बनवला त्या Harvey Ballला यापासून 45 डॉलर्स पेक्षा काहीच मिळवता आले नाही. आणि फ्रँकलिनने मात्र यातून पैसे कामावणारी एक मशीनच तयार केली.

itworkss च्या वाचक मित्रांनो, एका छोट्या smiley च्या मोठया बिझनेसची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. उद्योजकांनी शिकण्यासारखे यात बरेच स्टार्टअप धडे लपले आहेत. Legal, Marketing, Branding, Business Model, Market Expansion, Brand Extension, Adaption, Succession अशा खूप गोष्टी शिकता येतील. तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात ते खाली कमेंट्स मध्ये अवश्य लिहून कळवा.

©सलिल सुधाकर चौधरी

The story of the 500 million dollar smiley..!

500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !

 

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button