Post's
Things to Remember While Using Social Media – In Marathi

Things to Remember While Using Social Media
©टीम नेटभेट
आपण सगळेच गेल्या काही वर्षांपासून Social Mediaला सरावलो आहोत. आपल्याला Social Media हाताळायला लागून अनेक वर्ष उलटली.
तरीही आजही अनेकांना हा मीडिया कसा काम करतो ते नक्की उमगलेलं नाही..
मात्र, आपलं म्हणणं मांडण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी नि आपल्याला व्यक्त होण्यासाठी कोणत्याही क्षणी आपल्या हाताशी उपलब्ध असलेलं
हे माध्यम हीच या माध्यमाची जमेची बाजू लक्षात घेऊन अनेक लोक या माध्यमाचा वापर करताना दिसतात.
तुम्हीही जर Social Mediaचा वापर करून स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित असाल तर या काही महत्त्वाच्या टीप्स खास तुमच्यासाठी –
1. अगदी अस्सल, खरे रहा –
Social Mediaवर अनेकजण केवळ आपल्या जीवनाची चकचकीत, आनंदी आणि सुखी बाजूच जाणीवपूर्वक दाखवतात.
मात्र हे माध्यम इतकं इंटरॅक्टीव्ह आहे की येथे खरंतर तुम्ही स्वतःला योग्य प्रकारे लोकांसमोर व्यक्त केलंत तर आणि तरच लोक तुमच्याकडे आकर्षित होतात.
तुमच्यातील चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू, तुमच्या जीवनाची खरी कथा हे सारं वाचून लोकांना जेव्हा तुमच्यातील खऱ्या सच्च्या प्रामाणिक व्यक्तिची ओळख होते.
तेव्हाच आणि त्यानंतरच ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करू लागतात. जेव्हा एवढं उदंड प्रेम मिळतं, तेव्हा त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायवृद्धीसाठीही करू शकता.
लक्षात घ्या, लोक आधी तुमच्याशी कनेक्ट होतात आणि त्यानंतरच ते तुमच्या कामाशी किंवा तुमच्या व्यवसायाशी कनेक्ट होतात.
लोकांचा जेव्हा तुमच्यावर विश्वास बसतो त्यानंतरच ते तुमच्या उत्पादनांवर विश्वास ठेवतात. म्हणूनच आपला प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. स्वतःचं खरं रूप जगासमोर आणा.
2. स्वतःवर संशय घेणं बंद करा –
एखाद्या विषयावर पोस्ट लिहीली तरीही अनेकांना स्वतःवर विश्वास नसल्याने ते ती पोस्ट शेअर करावी की नाही याचा अतिविचार करत बसतात.
मग अखेरीस पुरेसं आत्मबळ मिळालं नाही तर ती पोस्ट चक्क डिलीटही करून टाकतात. त्यांच्या मनात अशा क्षणी विचारांचं काहूर माजलेलं असतं.
मी जर ही पोस्ट शेअर केली तर काय होईल, काय लोकांना माझी पोस्ट आवडेल का, पण जर लोकांना ती पोस्ट आवडलीच नाही तर मग मी काय करू, मला या पोस्टवर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या तर..
माझ्या या पोस्टनी गदारोळ माजला तर… असे असंख्य विचार त्यांचे त्यांनाच जाचत रहातात आणि मग ती पोस्ट शेअर करणं तर दूरच, ती चक्क डिलीटच करून अशी मंडळी मोकळी होतात.
लक्षात ठेवा, तुमचे विचार मांडण्यासाठीच तर हे माध्यम आहे नं.. त्यामुळे काही मत समोरच्याला नाही पटली, काही विचार समोरच्याला नाही पटले.
तरीही ते तुमच्यातील त्यांना पटणाऱ्या विचारांना तर नक्कीच समर्थन करतील.. ते म्हणतात ना, There is hardly anything to loose and so much to gain… तसंच काहीसं…
म्हणूनच स्वतःवर संशय घेणं थांबवा. तुमच्या पोस्ट नीट विचारपूर्वक, काळजीपूर्वक लिहा आणि त्या Social Mediaवर आत्मविश्वासाने शेअर करा.
मग सहाजिकच, नेमकं काय लिहायचं या पोस्ट्समध्ये असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल?
तर तुमच्या पोस्टमध्ये, तुमचे विचार, तुमचा विश्वास, तुमची मूल्य हे सारं सारं नीट, नेमकेपणाने तुम्ही लिहून लोकांपुढे मांडलं पाहिजे.
3. Personal Branding ला कधीच उशीर झालेला नसतो –
Personal Branding .. अर्थात.. स्वतःचं Branding करताना कधीच उशीर झालेला नसतो ही मेख येथे लक्षात ठेवायला हवी.
अर्थात, स्वतःचं Branding तुम्ही कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत करू शकता, किंबहुना करायला हवं…
त्यामुळेच जनमानसात तुमची एक छान प्रतिमा, एक छान ओळख निर्माण होते.
अगदी छोटी सुरूवात म्हणजे तुम्ही दिवसभरात काय काय केलंत, तुमचा दिवस कसा इतरांपेक्षा वेगळा होता याविषयीच्या छोट्या छोट्या पोस्ट्स तुम्ही लिहून लोकांचं लक्ष वेधू शकता.
Social Mediaवर जेवढी दृष्यमानता आपण आपली वाढवू तेवढे अधिक संख्येने लोक आपल्याशी जोडले जातात. त्यानंतरच लोक आपल्यावर प्रेम करू लागतात, आपल्याकडे आदराने बघू लागतात.
4. तुमच्या आवडत्या लोकांशी कनेक्ट व्हा, तुमच्या प्रेरणास्थानांशी कनेक्ट व्हा –
Social Mediaवर अनेक लोक स्टार होऊन जातात कारण त्यांचं लिखाण, त्यांचं व्यक्त होणं, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली व मूल्य या साऱ्याबद्दल ते वेळोवेळी मोकळेपणाने प्रामाणिकपणे लिहीत असतात.
अशा लोकांच्या पोस्ट्स वाचूनही तुम्ही शिकू शकता. म्हणूनच, अशा चांगल्या लोकांच्या संपर्कात रहाणं, त्यांच्याशी Social Mediaवरून कनेक्ट राहून त्यांना फॉलो करत रहाणं आत्मसात करा.
जमल्यास त्यांना भेटा, त्यांना प्रश्न विचारा. त्यांच्या सवयी जाणून घ्या, त्यांची शैली, जीवनपद्धती, जीवनमूल्य जाणून घ्या.
त्यांच्या चुकांमधून शिका.
त्याहूनही अधिक उत्तम म्हणजे अशा मंडळींच्या ग्रुप्समध्ये किंवा पेजेसवर शिरकाव करा आणि सतत त्यांचे निरीक्षण करत रहा.
त्यांना आदर्श मानून स्वतःही त्यांच्याप्रमाणे स्वतःत वा लिखाणात बदल करून आपला सच्चेपणा जगाला दाखवून द्या.
आमच्या प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…
आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.
तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
learn.netbhet.com