My title My title
BlogMental HealthPost's
Trending

7 Common Reasons Why Some People Never Get Succeed

प्रामाणिक कष्ट करून सुद्धा यश न मिळण्याची ७ कारणे

7 Common Reasons Why Some People Never Get Succeed

7 Common Reasons Why Some People Never Get Succeed in life…

प्रामाणिक कष्ट करून सुद्धा यश न मिळण्याची ७ कारणे….!

©यशश्री जोशी (ताई)

मला खूप लोकांनी प्रश्न केले की, ताई मी खूप मेहनत करतो, कष्ट करते पण हवं तसा यश मिळत नाही. काही उपाय सांगा. मी काही उपाय द्यायच्या आधी आपण आधी आपल्याच आयुष्यात डोकावून बघूया म्हणजे आपले कुठे चुकत तर नाही ना ! हे समजेल.

तुम्ही हुशार आणि मेहनती आहात, लोकांमध्ये तुम्ही अगदी काय म्हणतात ते फेमस आहात पण हवं तसं यश नाही, कष्टाचा मोबदला नाही हे आज 80 टक्के लोकांचे मत आहे. एखादी परिक्षा असो, स्पर्धा असो वा नोकरीसाठी मुलाखत, पण आपली निवड झाली नाही की मनात शंका येते, निराशा येते. मात्र यावेळी नेमकी कोणती चूक हे मात्र सुचत नाही.

अशावेळी मनस्ताप करून घेत नशिबाला दोष देण्यापेक्षा आपली चूक शोधून ती सुधारली तर निश्चितच भविष्यात अपयशाला सामोरे जावे लागणार नाही ह्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही.

सगळंच चुकतंय, आपण प्रयत्न करतोय पण काहीच मनासारखं घडत नाही. ह्यामुळे सतत टेन्शन राहते आणि आपण त्याच त्याच गोष्टीचा विचार करून इतर चांगल्या घडणाऱ्या गोष्टींकडे चक्क दुर्लक्ष करतो. आपल्याकडे कष्ट करायची तयारी आहे, गुणवत्ता आहे, क्षमता आहे, हिम्मत आहे, काही नाही असे मुळीच नाही पण शंका घेऊन आपण आपल्यालाच कमी लेखत असतो.

Table of Contents

प्रामाणिक कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे. परंतु ते करून सुद्धा तुम्हाला यशाची चव चाखायला मिळत नसेल तर नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि ते आपण शोधून काढलं पाहिजे.

ह्याची काही कारणे आहेत जी अनेक लोकांशी बोलताना लक्षात आली आहेत. त्यावर थोडा प्रकाश टाकते –

१) यश अपयशाची सतत चिंता करणे –

आपल्या आयुष्यात यश आणि अपयश ह्याची आपण सारखी चिंता करतो. चिंता ही चीतेला जवळ आणते. चिंता म्हणजे काळजी करून आपण नाही त्या आजारांना आमंत्रण देतो. काळजी करून जर काही छान घडणार असेल तर बसा करत काळजी. काळजी करून काही मिळत नाही होते ती फक्त डोकेदुखी.

२) स्वतःशी प्रामाणिक नसणे –

आपल्या मनात जर सतत कपट, कारस्थान असेल आणि आपण दुसऱ्याला पाण्यात पाहत असू तर आपल्या सोबत हेच होणार आहे. पृथ्वी गोल आहे, करावे तसे भरावे. स्वतःशी प्रामाणिक रहा. चांगले विचार करा.

३) स्वतःच्या कामाविषयी तक्रार करणे –

आपण कितीही काहीही केले तरी कौतुक दुसऱ्याचे हे मला खूप वेळा ऐकायला मिळते. स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा ठेवा. यश मिळेल. आपल्या कामावर प्रेम करा, काम तुमच्यावर प्रेम करून यश देईल. सतत तक्रार करणे बंद करा.

४) तुम्ही तुमच्या मनाचा कौल ऐकत नाही –

आजकाल ऐकावे जनाचे करावे मनाचे हे कोणी आचरणात आणतच नाही, सतत दुसऱ्याच्या विचारांचे गुलाम. हा असा म्हणाला मग मी हे करतो/करते. तो ते म्हणाला मग मी ते करते/करतो. अरे का? तुम्हाला स्वतःच डोकं नाही का? मन नाही का? आपल्याला काय परवडू शकते, आपल्याला काय जमू शकते? हे न समजण्याईतके आपण बालबुद्धी आहोत का? समोरची व्यक्ती लाख म्हणेल मर्सिडीज घे आणि फिर काय होत नाही. पण गाडी घेतल्यावर त्याचे हफ्ते फेडायला आणि पेट्रोल घालायला सल्लागार नाही येणार आहे. तुमचेच पैसे जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या डोक्याने चालणं बंद करा. आणि स्वतःच्या मनाचे ऐका.

५) इतरांशी तुलना करणे –

आजच्या जगात प्रत्येकाने आपले अंथरूण बघून पाय पसरावे. जे आहे ह्यात समाधान मानायला शिकणे खूप महत्वाचे आहे. कारण इतरांशी तुलना करताना आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त करायला जातो आणि कर्जबाजारी होतो. त्यामुळे प्रत्येकाचे नशीब, गरज, आयुष्य वेगळे आहे हे समजून घ्या आणि तुलना करणे बंद करा. प्रत्येकाचे वेगळे महत्व आहे जगात त्याचे वेगळे स्थान आहे ते जपा.

६) नकारात्मक वातावरण –

आपल्याच नकारात्मक विचारांनी आपण आपल्या आजूबाजूला नकारात्मक विचारांचे बीज पेरतो. एक म्हण आहे,- पेराल ते उगवेल. मग आयुष्य पण तसेच होते. म्हणून चांगल बोला, सकारात्मक रहा आणि मग बघा तुमचे चांगलंच होईल.

७) स्वतःला जगापुढे न आणणे –

भित्या पाठी ब्रह्म राक्षस. घाबरु नका. स्वतःबद्दल मनात न्यूनगंड बाळगू नका. कोण काय म्हणेल ह्याचा विचार करू नका. स्वतः साठी जगा. लोकांच्या समोर यायला घाबरु नका. तुमच्या दिसण्यावर काही नसतं. विचार महत्वाचे असतात.

पृथ्वी गोल आहे आणि अध्यात्म खूप खोल आहे. जप करा आणि यशाचा मार्ग सुकर करा

यशश्री जोशी (ताई) – 7249073958

Source

7 Common Reasons Why Some People Never Get Succeed in life…

प्रामाणिक कष्ट करून सुद्धा यश न मिळण्याची ७ कारणे….!

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button