My title My title
Something Different
Trending

After Covide Times in the Era of Digital World

कोरोना काळानंतर डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार करतांना...!

कोरोना काळानंतर डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार करतांना येणाऱ्या संकटाची चाहुल आणि त्यावरील उपाय…


©वरुणराज कळसे


कोरोना काळामध्ये Paytm, Google Pay, BHIM, Phonepe या सारख्या अप्स मुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होत असताना, दुसरीकडे सायबर फ्रॉड (Cyber Fraud), ऑनलाईन फसवणूकीचं online frauds प्रमाणही वेगात वाढत आहे.


कोरोना आणि संपूर्ण जगावरील त्याचे पडसाद यामुळे २०२०-२१ चे हे वर्ष अनपेक्षित घडामोडींनी चांगलेच गाजले.

संगणक क्षेत्रातील तज्ञ आणि जाणकार एक मताने सांगतात कि ज्या गतिने कोरोना काळात  डिजिटल व्यवहारांमध्ये बदल झाले ते मागील वर्षांच्या किती तरी पटिने जास्त आहेत.

आणि ह्या बदलाची गति अफाट आहे आणि पुढे वाढतच जाणार हे जग बघत आहे. प्रत्येक अविष्कार समाज आणि जगात बदल घडवत असतो आणि मानवीजीवन सूकर होण्यास त्याची मदतही होत असते.


कोरोना काळात जे डिजिटल व्यवहारांमध्ये जे बदल झाले त्याची तुलना करने कठिन आहे. जागतिकीकरण आणि त्या सोबतच कम्प्यूटर आणि माहिती तंत्रज्ञान याचा मोठा परिणाम आज दैनन्दिन जीवनात आपण जाणवत आहोत.

मग ते कार्यालयीन काम असो कि दैंनदिन जीवन सर्वच ठिकाणी आमूलाग्र बदल झाला आहे.


कोरोनानंतर आता सायबर गुन्हात मोठी वाढ झाली आहे. Hackers ने तर भारतीय Tax खात्याच्या संगणकांवर सूद्धा महत्वाची माहिती चोरण्याकरिता सायबर हल्ला केला होता जस कि PAN-आधार-GST-फोन क्रमांक, email address.

पोलिसांसमोर दर दिवशी अशा अनेक आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान असतं. पण अनेकदा सायबर फ्रॉड प्रकरणात आपणच जबाबदार ठरतो.

एखाद्या चुकीच्या लिंकवर, फ्रॉड साईटवर जाऊन केलेल्या शॉपिंग किंवा इतर काही गोष्टींमुळे फ्रॉडला बळी पडतो. परंतु काही अशा टिप्स आहेत, ज्याने सायबर फ्रॉडपासून स्वत:ला सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं.


  • अनेक मोबाईल कंपन्या आपल्या हँडसेटची सिक्योरिटी वाढवण्यासाठी नवे अपडेट्स पाठवत असतात. आपला फोन सिक्योर करण्यासाठी कंपनीकडून अधिकृतरित्या आलेले अपडेट फॉलो करून ते अपडेट (Security Update) ठेवणं फायद्याचं ठरतं. त्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स चेक करू शकता.



  • हॅकिंगपासून वाचण्यासाठी आपल्या ब्रॉडब्रँड राउटरमध्ये असणाऱ्या यूनिवर्सल प्लग अँड प्लेला (UPnP) नेहमी बंद ठेवा. ज्यावेळी गरज असेल, त्याचवेळी ओपन करा.


  • UPnP च्या मदतीने कोणताही आउटसायडर आपल्या नेटवर्कमध्ये सहजपणे कनेक्ट होऊ शकतो. हॅकिंगसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं समोर आलं आहे.



  • चांगल्या ब्रँडचा स्मार्टफोन म्हणजे महागच, हे समिकरण चुकीचं आहे. सॅमसंग आणि एल.जी. सारखे ब्रँडही बजेटमध्ये असणारे चांगले मोबाईल बाजारात आणत आहेत.

  • चांगल्या ब्रँडच्या स्मार्टफोनचं एक वैशिष्ट्य म्हणजे, या फोनचे सिक्योरिटी अपडेट वेळोवेळी येत असतात. यामुळे फोन हॅक होण्याची शक्यता कमी होते.


  • घरी ब्रॉडब्रँडचा वापर करताना, त्याच्या Wi-Fi पासवर्डकडे खास लक्ष ठेवा. वाय-फायचा पासवर्ड सेट करताना, त्यात तुमच्या नावाच्या वापर करू नका.


  • सायबर फ्रॉड करणारे, सर्वात आधी तुमच्या नावाचात वापर करुन फसवणूक, हॅकिंग (Hack) करण्याचा प्रयत्न करतात.



  • मोबाईलचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवणं, सुरक्षेची सर्वात मूलभूत प्रणाली आहे. मोबाईलमध्ये कमीत कमी आठ कॅरेक्टर्सचा पासवर्ड टाकल्यास, हॅकर्सला तो क्रॅक करणं कठीण जातं. पासवर्ड सेट करताना नेहमी नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर करा.



सायबर-क्राईम आणि ऑनलाईन आर्थिक फसवणूक…!

 ज्यावेळी सायबर गुन्हेगार एखाद्या व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक करतात त्यावेळी त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतात.



सर्वांनी खालील प्रमाणे बाबी कायमस्वरूपी लक्षात ठेवा की.



१) तुमच्या बँक खात्यात जर कोणी ऑनलाईन पैसे भरणार असेल, तर तुम्हाला QR Code Scan करण्याची किंवा OTP देण्याची अजिबात आवश्यकता नाही.


२) इतरांना पैसे पाठविताना QR Code Scan करण्याची किंवा OTP ची आवश्यकता असते.


३) तुम्ही जर QR Code scan केला नाही किंवा OTP दिला नाही,  आपल्या मोबाईल सिम कार्डचा नंबर कोणाला दिला नाही, मोबाईल मध्ये apps इंस्टाल करतांना देण्यात येणाऱ्या परमिशन नीट वाचल्या तर,

जगातील कोणताही गुन्हेगार किंवा व्यक्ती तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकत नाही.


४. रस्त्यावर सापडलेली कोणतीही मोबाईल ची केबल किंवा मेमरी कार्ड घेऊन आपल्या मोबाईल साठी वापर करू नये.


५. Public Place मध्ये असणारे फ्री मोबाईल चार्जिंग युनिट शक्यतो वापरू नये खुपच गरज असल्यास Battery Bank सोबत ठेवावी…

तसेच Public Place मध्ये असणारे फ्री वाय फाय शक्यतो वापरू नये खुपच गरज असल्यास data रिचार्ज करावा.


६. आलेल्या कस्टमर केअर सांगणाऱ्या call मध्ये होणाऱ्या संभाषणात Panic Situation मध्ये न अडकता. शांत पणे निर्णय घेणे.

म्हणजे अनेकदा हि लोकं तुम्हाला वेळेच्या बंधनात अडकवणारी असतात. (तुम्हाला निर्णय घेण्यासाठी फक्त ५ मिनिटे आहेत किंवा याच call मध्ये तुम्हाला सांगाव लागेल कि अमुक अमुक गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला हो म्हणव लागेल अथवा अशी संधी तुम्हाला कधीच परत मिळणार नाही)


७) शक्यतो ज्या खात्यामधून तुम्ही ऑनलाईन व्यवहार करता त्या खात्यामध्ये जास्त रक्कम ठेउच नका. म्हणजेच ऑनलाईन व्यवहारांसाठी वेगळे खाते वापरा.


वरील १ ते ६ या सर्व बाबी अगदी बेसिक आहेत, तरी बहुतांश व्यक्ती त्याच चूका करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन आर्थिक फसवणूक चे गुन्हे वाढतच आहेत.




 २०२१ चा अंदाज Quick Heal ने काय वर्तवला आहे पहा.


कोरोनामुळे व्यवसाय व बरेचसे दैनंदिन व्यवहार डिजिटल झाले खरे, पण त्यासोबतच सिस्टीम्समध्ये मॅलवेअर इंजेक्ट करुन संवेदनशील माहिती चोरणारे हॅकर्सही वाढले.

२०२१ मध्ये आपल्या डिजिटल व्यवसायास सायबर सिक्योरिटीने सुसज्ज करण्यावर व्यावसायिकांचा भर असणार आहे.

हे संभाव्य धोके लक्षात घेण्याच्या उद्देशानेच कॉर्पोरेट कंपन्या, एसएमई तसेच सरकारी कार्यालयांना आयटी सिक्योरिटी व डेटा प्रोटेक्शन सेवा पुरवण्यात अव्वल असणा-या क्विक हीलने काही भाकिते वर्तवली आहेत.


येत्या वर्षात डबल एक्स्टॉर्शन, क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार वाढतील असा क्विक हीलचा अंदाज आहे.


  • व्यावसायिकांवर रॅनसमवेअरसह रॅनसमहॅकचे दुहेरी संकट : पूर्वीच्या वॉना क्राय, पेट्या, र्यूक, ग्रँडक्रॅब ई हॅकिंग पद्धतींनी केवळ डीस्क्स एनक्रीप्ट केल्या जात व डिसक्रिप्टींगसाठी खंडणी वसूल केली जाई.


  • अलिकडे मात्र रॅनसमवेअरद्वारे फाईल्ससोबतच वैयक्तिक व संवेदनशील माहितीही हॅक केली जाऊ शकते. खंडणी देण्यास मना करता ही माहिती उघडपणे प्रकाशित करण्याच्या धमक्या दिल्या जातात.


  • संवेदनशील डेटा उघड झाल्याने कंपन्यांच्या जीडीपीआर वर अतिशय गंभीर परिणाम होतात; तर हे टाळायचे म्हटले तर भरमसाठ खंडणी भरावी लागते, असे हे दुहेरी संकट आहे. या युक्तीस रॅनसमहॅक अथवा डबल एक्स्टॉर्शन असे म्हणतात.


  • मेझ, डॉपल पेमर, र्युक, लॉकबीट, नेटवॉकर, माऊंटलॉकर, नेटफिल्म हे ज्ञात रॅनसम हॅकर्स असून त्यांचा २०२१ मध्ये देखील बराच प्रभाव असणार आहे.


  • क्रिप्टो माइनर्सची नवी फळी :क्रिप्टोकरंन्सीची किंमत कायमच जास्त असते व ह्या किंमती २०२१ मध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.


  • बीटकॉइन्स आणि मोनेरो यासारख्या क्रिप्टोकरंन्सीची किंमत २०२० या वर्षात तब्बल तिपटीने वाढली आहे. क्रिप्टोकरंन्सीच्या वाढत्या किंमती हॅकर्सना अधिकाधिक क्रिप्टो माइनर्स बनवून त्याद्वारे खंडणी उत्पन्नाचे निमंत्रण देत आहेत.


  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेपेक्षा उपाययोजनांकडे लक्ष वेधणारी संकटे कोरोना महामारीच्या सुरुवातीला रॅनसमवेअरचे स्वरुप व त्यांची नावे फिशींग साईट्स, बनावट मोबाईल एप्स तसेच कोरोनाबद्दल जागृतीपर माहिती, लक्षणं, उपाययोजना, पीपीई कीट्स, टेस्ट कीट्स, लॉकडाऊन व सोशल डीस्टंसिंगशी संबंधित होती.


  • डीप फेक्स ते सायबर फ्रॉड्स :डीप फेक्स म्हणजे डीप लर्निंग टेक्नॉलॉजीने एखाद्या व्यक्तीचे खोटे ऑडियो अथवा विडियोज बनवणे. हे ऑडियो / विडियोज खोट्या बातम्या व सायबर फ्रॉड्ससाठी वापरले जातात.


  • अशा फसवणूकीचा अव्वल नमुना म्हणजे एखाद्या कंपनीचा कार्यकारी अधिकारी आपल्या कर्मचा-यां ना ठराविक रक्कम पाठवायला सांगतो.

    असा बनावट ऑडियो / विडियो बनवला जाणे असे बरेच प्रकार २०२१ मध्ये घडू शकतील.


  • फिशींग अटॅक्स मधील ऑटोमेशन :हॅकर्स दिवसेंदिवस अधिकाधिक फिशींग अटॅक्स ऑटोमेशन पद्धतीने करत आहेत. २०२१ मध्येही असेच होईल.

  • युजर्सना आमिष दाखवण्यासाठी सोशल इंजिनियरींग ट्रीक्सचा वापर करण्यात येईल.


  • मोबाईल बँकींगमधील वाढते सायबर हल्ले :सप्टेंबर २०२० मध्ये सरबेरस मोबाईल बँकींग ट्रोजनचा सोर्स कोड सर्वांसाठी प्रकाशित केला गेला, हा कोड मोफत होता.


  • यानंतर लगेचच मोबाईल अॅप इंन्फेक्शन्समध्ये भरमसाठ वाढ झालेली दिसून आली होती.

    त्यामुळे साहजिकच येत्या वर्षात मोबाईल बँकींग क्षेत्रात सरबेरस कोडवर आधारित मॅलवेअर येण्याची शक्यता आहे.


  • क्विक हील सिक्योरिटी लॅबचे संचालक हिमांशू दूबेम्हणाले की कोविड-१९ व त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील परिणामांची कोणी कल्पनाही केलेली नसेल.


  • तसेच या महामारीत सायबर गुन्हेगारांना नव्याने हॅकिंगचे बहाणे मिळाले. ही गुन्हेगारी येत्या वर्षातही असणार आहे. जसे की या वर्षात डबल एक्स्टॉर्शन क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार बोकाळतील.


  • आम्ही क्विक हीलध्ये आमच्या ग्राहकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणण्यासाठी व नवनवीन सायबर हल्ल्यांपासून त्यांना सावध करण्यासाठी कटिबद्ध आहोत.



सायबर सिक्युरिटी क्षेत्रातल्या जगातील सर्व एक्सपर्टसपुढे २०२१-२२ मध्ये मोठे आव्हान असणार आहे हे नक्की…!



©वरुणराज कळसे

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button