करियरसाठी उपयुक्त सॉफ्टस्किल्स…
करियरसाठी उपयुक्त सॉफ्टस्किल्स…
एक काळ असा होता कि फक्त एक पारंपारिक पदवी कित्येक नोकऱ्या मिळविण्यासाठी पुरे असायची.
कालांतराने नोकरी व उद्योग जगात मोठे बदल होत गेले. १९९०च्या जागतीकीकरणानंतर बहुराष्ट्रीय कंपन्याचे दार सरकारने खुले केले. या बहुराष्ट्रिय कंपन्याची भाषा व कार्यसंस्कृति वेगळी होती.
तसेच कम्प्यूटर, इंटरनेटमुळे माहिती तंत्रज्ञानात प्रचंड प्रगति झाली होती. भाषा आणि वेगळी संस्कृति असलेल्या या कंपन्यात समन्वय साधन्यासाठी वेगळ्या स्किलची गरज भासु लागली.
हजारो कंपन्या व त्यांचे वेगवेगळे व्यवस्थापन, वितरण-विक्रीकार्यालय तसेच मुख्यकार्यालयात नोकरभरतीची संख्या वाढली. या सोबतच नोकरीसाठी आवश्यक स्किलमधेही आमूलाग्र बदल घडत गेले.
पूर्वी एखाद्या मुलाखतीची तयारी म्हणजे एक स्वच्छ सफेद सदरा त्याला साजेशी पेंट आणि पॉलिश केलेले शूज एव्हड़च अपेक्षित होत. पण आज ते पुरेस नाही.
आज कला, वाणिज्य, वैद्यकीय,अभियांत्रिकीशाखेची पदवी असो की व्यवस्थापनशाखेची, फक्त महाविद्यालयात पुस्तकाद्वारे शिकविले जाणारे शिक्षण म्हणजेच ‘हार्डस्किल’ नोकरीसाठी पुरेशी नाही.
एका सर्वेनुसार नोकरी-व्यापारात यश मिळविण्यासाठी ८०% सॉफ्टस्किल आणि फक्त २०% हार्डस्किलच कामी येते. थोडक्यात यशाच उंच शिखर गाठण्यासाठी हार्डस्किलच्या जोडिला ‘सॉफ्टस्किल’ ची नितांत गरज आहे.
किंबहुना ज्यांच्याकड़े अप्रतिम सॉफ्टस्किल आहेत अशा व्यक्ति औपचारिक पदवी न घेता जुजबी शिक्षण घेवूनही इतरांच्या पुढे गेलेली आहे.
काही लोकामधे जन्मजातच सॉफ्टस्किलचे गुन आढळतात तर काही लोकांनी कमकुवत आर्थिक, सामाजिक परिस्थितीशी दोन हात करत हया सॉफ्टस्किलचे गुन अंगिकारले असतात आणि त्यांच्या प्रगतिचा आलेख सुसाट चढताच असतो.
एलिजिबल आणि एम्प्लॉयेबल मधील फरक काय?
आज दरवर्षी लाखो विद्यार्थी अभियांत्रिकी,तंत्रशिक्षण, वास्तुशास्त्र आणि इतर पद्व्या घेवून बाहेर निघतात पण या हार्डस्किलच्या भरोस्यावर ते नोकरीसाठी फक्त पात्र (एलिजिबल) ठरतात, नोकरीयोग्य(एम्प्लॉयेबल) नाही!
कारण नोकरीसाठी अत्यावश्यक अशी ‘सॉफ्टस्किल्स् त्यांच्याकड़े नसते.
उदाहरण द्यायचे तर एखाद्या कंपनीला दहा पदवीधर अभियंते निवडायाचे असतील तर आज घडिला लाखो अभियंत्याकड़े त्या नोकरीची ‘पात्रता’असते, पण मुलाखतीत जे निवडले जातात तेच फक्त ‘नोकरीयोग्य’ असतात.
शिक्षणातूनच सॉफ्टस्किल असावी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ‘शिक्षण हे वाघिनीच दूध आहे जो ते प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही’ पण आज पदवीधरातही हा गुन दिसत नाही.
शिक्षण मग ते प्राथमिक, माध्यमिक असो की पदवी-पदव्योतर ते घेत असतानाच विद्यार्थ्यांची एकंदरित जड़नघडन अशी व्हावी कि समाज आणि उद्योग जगात वावरताना, इतरांशी संवाद, व्यवहार करताना कोणतीही अड़चन येवू नये हे अपेक्षित आहे.
ज्ञानार्जन करत असतानाच वातावरन आणि संस्कार असे हवे कि नोकरीयोग्य कौशल्याचा त्या शिक्षणात अंतर्भाव असावा. विद्यार्थी शाळा महाविद्यालयात वावरत असताना गुरु, शिक्षक किंवा अध्यापकांचे संस्कार त्यावर होत असतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनात विभक्त कुटुंबपद्धतीत पालकाना पुरेसा वेळ नसल्यामुळे जीवनमूल्य तसेच ‘सांस्कृतिक पालकत्वाची’ जबाबदारी आपसुकच शालेय शिक्षकावर येवून पड़ली आहे.
तसे बघता शाळा महाविद्यालात घेण्यात येणाऱ्या निरनिराळया क्रीड़ास्पर्धा, वाद-विवादस्पर्धा, नाट्यस्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय समाज सेवा, एनसीसी याद्वारेसुध्दा विद्यार्थीची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक जड़नघडन होवून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होने अपेक्षित आहे.
काही उच्च आयआयटी-एनआयटी, आयआयएम् सारख्यासंस्था सोडल्या तर इतर ठिकाणी हे घड़ताना दिसत नाही. आजही उच्चस्तरीय ओद्योगिक संस्थेच्या विद्यार्थ्याना सुट्टीच्या कालावधीत ते शिकत असलेल्या विषयासंबंधित उद्योगात 2-3 महिने ‘इंटर्नशिप’ करने आवश्यक आहे.
या मागे दोन उद्देश असतात एक म्हणजे चारभिंतीच्या बाहेर निघुन उद्योग जगात कस वावरायच प्रशिक्षण घेन आणि दूसर म्हणजे शिकत असलेल्या विषयाच प्रात्यक्षिक ज्ञान.
थोडक्यात महाविद्यालयात ‘हार्डस्किल’ आणि इंटर्नशिप मधे सॉफ्टस्किल अशी ती सांगड असते. एव्हड़च नाही तर उच्चशिक्षण संस्थेमधे वर्षभर घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा, क्लब, सेमिनार आणि संमेलन यामधे विध्यार्थी तावूनसुलाकुन निघत असतात, आपसूकच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि ते जीवनात सफल होतात.
पण आज शिक्षणाची दशा नि दिशा बघता, काही मोजक्या खाजगी शिक्षणसंस्था सोडल्या तर इतर शैक्षणिक संस्थेत असे घड़ताना दिसत.
आज कोणत्याही शहरात बोटावर मोजण्याइतक्याच शाळा-महाविद्यालय असे सापड़तील कि जिथे दर वर्षी नियमित क्रीड़ास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम ईमानइतबारे घेतले जातात.
त्यास् फक्त शिक्षक किंवा विद्यार्थ्याच जबाबदार आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. मुळात शाळा संचालकाचे उदासीन धोरण तसेच शाळेला मैदान किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागेची अड़चन असते.
तसेच परिक्षेच्या अभ्यासात मुलगा मागे राहील, ‘कमी गुण म्हणजे आपण मागे’ मग नसल्या भानगडी कशाला? म्हणून काही पालकमण्डली या बाबतीत उदासीन असतात.
उच्चमाध्यमिक विज्ञानशाखेच्या वर्गाचा विचार केला तर परिस्थिति भीषण आहे.
मग इतर कार्यक्रम सोडा एकही विद्यार्थी महाविद्यालयिन वर्गात उपस्थित असताना दिसत नाही.
मग त्यावर शिक्षक किंवा त्या महाविद्यालयातील अध्यापकाचे संस्कार तरी काय पड़तील.
त्यामुळे सध्याच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांचा व्हावा तसा ‘व्यक्तिमत्व विकास’ होताना दिसत नाही.
मग असे विद्यार्थी जेंव्हा पुस्तकीपदवी घेवून नोकरीनिम्मित बाहेर पडतात तेंव्हा त्यांना इंग्रजीभाषेसहित बऱ्याच अडचणीला तोंड द्यावे लागते.
ग्रुप डिस्कशन तर सोडा पण मुलाखतीत विचारण्यात येणाऱ्या साध्या प्रश्नाचे उत्तरही ते देवू शकत नाही आणि ते मागे राहतात.
आणि यदाकदाचित निवडलेही गेले तर उद्योगजगात वावरताना त्यांना आपले वरिष्ठ तसेच विविध विभागातील अधिकारी यांच्याशी समरस होतांना इंग्रजी संभाषण, देहबोली, पेहराव आणि इतर अडचणी येतात.
आज ‘स्टार्टअप’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या युगात कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेच्या पद्व्या काय आणि खाजगी अभियांत्रिकी शाखेच्या पद्व्या काय ह्या कूचकामी ठरत आहे.
त्यामुळे आज देशाचे माननीय पंतप्रधान मोदी यानी आपल्या अनेक भाषणात सॉफ्टस्किलचे महत्व सांगितले आहे, आणि ते आवश्यकच आहे.
आपण किती शिकलात यापेक्षा आपल्याला काय काम येत किंवा आपण कुणाच्या कामी येऊ शकतो का यास जास्त महत्व आहे.
कदाचित हाच धागा पकडून उद्योगजगतात नोकरी शोधताना अड़चन येवू नये.
म्हणून काही वर्षांपुर्बी झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांनी ‘सॉफ्टस्किल’ साठी वेगळी तरतूद केली होती.
तेंव्हा आज गरज आहे कि विद्यार्थ्याने ते शिकत असलेल्या ‘हार्डस्किल’ सह नोकरी उपयोगी ‘सॉफ्टस्किल’ वरही तेव्हड़ाच भर दयावा.
जेणेकरून उद्या नोकरी मिळवने तसेच नोकरीत बढ़ती मिळवने सोपे होईल.
सॉफ्टस्किल हे काही पुस्तकीज्ञान नसून एक अंगिकारावे असे गुन आहेत.
मानसिक इच्छा, प्रबळ जिज्ञासा,विवेकशिलता, निरन्तर अभ्यास यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास घडून तुम्ही इतरापेक्षा काही विशेष घडवू शकता.
‘सॉफ्ट्स्किल्स म्हणजे व्यक्तिमधील व्यक्तित्वात सामावलेले असे काही विशिष्ट कौशल्य-गुन आहेत.
कि जे तुम्हाला इतरापेक्षा वेगळा विचार, वेगळे कार्य करण्याची क्षमता देतो.
त्यामुळेच आज सॉफ्टस्किलचा सगळीकडे बोलबाला आहे आणि कुणीही यामधे मागे पड़ता कामा नये.
मग ह्या सॉफ्टस्किल कोणत्या?
तसा ह्या विषयाचा अवाका खुप मोठा आहे आणि जसजसा शिक्षण आणि उद्योग तंत्रज्ञानात बदल होत आहे.
तसे सॉफ्टस्किलचे महत्व वाढत आहे. त्यात आज कंप्यूटर आणि इंटरनेटस्किलचीही भर पडली आहे.
तरी काही अत्यंत आवश्यक अशा सॉफ्टस्किल खालीलप्रमाणे आहेत.
१. संभाषण आणि संवादकौशल्य
कॉर्पोरेटजगात दोन प्रकारे संवाद होत असतात. एक तोंडी आणि दूसरे लिखित संवाद.
या शिवाय देहबोली आणि हावभाव हे सुद्धा संवादाचाच भाग आहे.
नोकरी करताना आपला संवाद हा अन्तर्गत वरिष्ठ, सहकर्मचारी, कनिष्ठ तसेच बाहेरील ग्राहक तसेच इतर जगाशी होत असतो.
तसेच इंटरव्यूह, प्रेसेजेन्टेशन, मिटिंग आणि ग्रुप डिस्कशनमधे भाग घेताना इतरांचे विचार समजून घेण्याची क्षमता, श्रवणकौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व.
आणि आवाजातील चढ़-उतार याकड़े लक्ष देने आवश्यक आहे.
उत्कृष्ट संभाषण, भाषा आणि सुसंवाद ही यशाची गुरुकिल्ली आहे.
सांघिक नेतृत्वगुणासाठी उत्कृष्ट संवादकौशल्य आवश्यकच आहे.
कम्प्यूटर आणि इंटरनेटच्या युगात कार्यालयीन लिखित संवादामधेही आमूलाग्र बदल घडला आहे.
‘पेपरलेस ऑफिस’ची संकल्पना सगळीकड़े रुजू होत असल्यामुळे ईमेल, च्याटिंग, वीडियो कॉन्फ्रेंस, ट्विटर तसेच इंटरनेटच्या सर्व इतर स्किल्सचा परिपूर्ण वापर करता येणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
२. आत्मविश्वास व स्वयं प्रेरणा
कोणत्याही काम करताना आत्मविश्वास व सकारत्मकतेने पुढे येवून हाताळने ही एक चांगली सॉफ्टस्किल आहे.
हे गुण तुमची कामाप्रति निष्ठा तसेच समर्पण दाखवते. या गुणामुळे तुमच्याकड़े नजर ठेवायची गरज पड़त नाही.
३. प्रभावशालि नेतृत्वगुण
कॉर्पोरेट जगात बढ़ती सांघिक कार्य करण्यासाठी तसेच बढ़ती मिळवन्यासाठी तुमच्याकड़े नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे.
तुमच्याकड़े इंग्रजीभाषेवर चांगले प्रभुत्व, सकारात्मकता, उत्कृष्ट संवादकौशल्य, कामाप्रति निष्ठा.
इतराना प्रेरित करनारे व्यक्तिमत्व असे गुण असतील तरच तुम्ही एखाद्या संघाचे नेतृत्व करु शकता.
४. जबाबदारी घेण्याची क्षमता
आपन करत असलेल्या चांगल्या कामाचे श्रेय फक्त स्वतःकड़े न घेता ते एक संघाला देणे.
आणि काही घडलेल्या चूकांची जबाबदारी इतरावर न ढकलता प्रामाणिकपणे स्वतः वर घेणे हीसुद्धा एक सॉफ्टस्किलच आहे.
जो तुमचा स्वभाव दर्शविते.
५. योग्य निर्णय घेण्याची क्षमता
तुम्ही जेंव्हा एका संघाचे कप्तान असता.
तेंव्हा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यातच तुमचा आणि तुम्ही काम करत असलेल्या कंपनीचा फायदा असतो.
तेंव्हा हा गुन एका व्यवस्थापकामधे असणे जरूरी आहे.
६. सांघिक व्यवस्थापन कौशल्य
कोणतेही काम करताना एक टीमची गरज असते.
एका टिमचे कार्य तेंव्हाच चांगले होते जेंव्हा त्या संघात सुसंवाद, भावना, मनोमिलन चांगले असते आणि मतभेद नसतात.
७. समस्या सोडवण्याची सक्षमता
कॉर्पोरेटमधे टीमवर्क करताना बऱ्याच वेळा अशी समस्या येते कि त्या समस्यचे थंड डोक्याने विचार करून योग्य तो पर्याय निवडावा लागतो.
अशा वेळेस सर्व टीममेंबरना विश्वासात घेवून योग्य निर्णय घेता येणे ही एक सॉफ्टस्किलच आहे.
अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात कप्तानमधे हा गुन बघायला मिळतो.
८. वेळेचा व्यवस्थापन आणि तणाव झेलण्याची क्षमता
कॉर्पोरेटमधे काम करताना बऱ्याच वेळेस दिलेले कामाची वेळमर्यादा ‘डेडलाइन’ दिलेली असते.
अशा वेळेस तनावाखाली न वावरता कामाचे योग्य नियोजन करून डेडलाइनच्या आत काम करने आवश्यक असते. ही एक सॉफ्टस्किलच आहे.
९. जोखिम घेण्याची क्षमता
बऱ्याचदा जास्त जोखिम जास्त फायद्याची असते. .
कॉर्पोरेट आणि उद्योग-व्यवहारात अनेक वेळा जोखिम घ्यावी लागते अशा वेळेस आपले मानसिक संतुलन न बिघडवता योग्यनिर्णय घ्यावा लागतो.
१०. या शिवाय नेगोशिएशन, फ्लेक्सीबिलिटी
अशा काही सॉफ्टस्किलस आहेत ज्या कॉर्पोरेटमधे आवश्यक आहेत त्या आत्मसात करून तुम्ही ‘अपडेटेड’ होणे आवश्यक नाहीतर ‘आउटडेटेड’ समझले जाणार.
तेंव्हा महाविद्यालत शिकनारे कला, वाणिज्य विज्ञानशाखेचे विद्यार्थी असो.
कि वैद्यकिय, अभियांत्रिकी, सीए, सीएसचे विद्यार्थी यांनी वेळीच सॉफ्टस्किल्सचे महत्व समजून त्या दिशेने वाटचाल करावी.
नियमित अवांतर वाचन, व्यायाम, संगणक-इंटरनेट प्रशिक्षण घेवून विविध कार्यशाळेत भाग घेत रहावे.
तसेच वकतृत्त्व, नाट्य, वाद-विवाद स्पर्धेमधे भाग घेत रहावे.
एव्हडेच नव्हे तर जोपर्यंत नोकरी मिळत नाही.
तोपर्यंत अनुभव म्हणून एखाद्या खाजगी कंपनी, एनजीओमधे पार्टटाइम नोकरी करून स्वतःस अपडेट करत रहावे.
जेणेकरून उद्या कॉर्पोरेटमधे नोकरी मिळविणे सूकर होईल.
© प्रेम जैस्वाल, premshjaiswal@gmail.com