My title My title
BlogBrain StormingMental Health
Trending

What is Depression in Marathi

What is Depression in Marathi

What is Depression in Marathi

Depression म्हणजे काय ?

©डॉ सुजाता डोंगरे, 
काॕन्सलर, मेंदूविज्ञान व मानसशास्त्रज्ञ, (मुंबई )

Deep म्हणजे खोल, अगदी आत, आणि प्रेस म्हणजे दाबणे. अगदी शब्दशः अर्थ घेतला तर किती अर्थपूर्ण आहे हा शब्द. हा शब्द आपण रोज ऐकतो असतो. हल्ली अगदी सर्रास वापरतो हा शब्द. पण ह्याचा खरा अर्थ आहे नैराश्य. Depression, हे एका दिवसात, अथवा एका क्षणी येत असत, पण ह्याचा परिणाम फार दिर्घकाळ राहतो.

आपण घडलेल्या घटनेने एवढे निराश झालेले असतो, कि आपले सगळे विचार, सगळ्या भावना ह्या त्या एकाच घटनेच्या विचारात हरवून जातात.

ही निराशा कधीकधी अगदीच काही काळासाठी आली तर ठीक आहे. तो मानवी स्वभावच आहे. पण आपले विचार जर पुन्हा पुन्हा त्याच घटनेचा मागोवा घेत असतील तर मात्र आपण नैराश्याच्या अंमलाखाली येत आहोत, म्हणजेच आपल्याला Depression येत आहे .
 

  • Depression आलेला माणूस हा अधिक चिडचिडा होतो,  त्याला काही झाल कि प्रचंड राग येतो, किंवा ही माणसं स्वतःला अगदीच असह्हाय मानू लागतात.

  • कोणावर सहज विश्वास ठेवत नाही. प्रत्येकाला एका संशयाने बघू लागतात.

  • कोणी साधं बोललं तरी त्याचा चुकीचा अर्थ काढतात.

  • दिवसेंदिवस सगळ्यांपासून दूर होऊ लागतात.

  • दुसऱ्याला दोष देतात, माझा सगळे कसा गैरफायदा घेतायत, किंवा माझ्या गुणांची कुणालाच कदर नाही ही भावना जास्तीत जास्त मनात रूजत जाते.

  • किंवा कधीकधी मी एवढ करतेय/करतोय  ,पण कोणालाच खुश करू शकत नाही, म्हणजे माझ्यातच काहीतरी कमी आहे. 

  • दोन्हीही प्रकारात स्वतःवरचा आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. स्वतःला अपराधी समजू लागतात. 

कोणतेही काम करताना आत्मविश्वास नसल्यामुळे बरोबर होत नाही. मनासारखे यश मिळत नाही. खुप धडपड करूनही कोणी साथ देत नसल्याची भावना घट्ट होत जाते. यासर्वांचा परिणाम म्हणून अधिकाधिक नैराश्य येत जात .
 

मग याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊ लागतो. नीट जेवण होत नाही. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होऊ लागते. यातूनच वारंवार चक्कर येणे, घाम फुटणे, छातीत धडधडणे, डोके दुखणे ,बारीक ताप येणे, भिती वाटणे, अशी शारीरिक लक्षणे दिसू लागतात.
   

  • Depression, येण्याची कारण काय असावीत?

  • तर एखाद्याला सतत जर गृहित धरल जात असेल…

  • सतत त्याचा काही कारणाने अपमान होत असेल…

  • एखाद्याला सतत धाकात ठेवल जात असेल…

  • तर साहजिकच आहे अशी व्यक्तीला नैराश्य येत.

  • पण जर एखादी व्यक्ती अति भावनिक असेल, तिला कुणी साध जरी बोलले तरी सहन होत नाही..

  • अशा व्यक्ती केवळ भावनिक कारणाने नैराश्यात जातात.

     

ही कारण फार छोटी असतात, पण याचे परिणाम फार मोठे असतात.

लहान मुलांना आपण काहीवेळेला शिस्तीच्या नांवाखाली रागावत असतो, त्यांचा अनेकदा नकळत कारण नसताना अपमान करत असतो. 

अनेकदा त्याना मूर्ख म्हणतअसतो. त्यांच्या क्षमतेची, हुशारीची टिंगल करतो.

अनेकदा त्यांची इतरांशी तुलना करताना त्यांच्यातील उणिवा ठळकपणे त्यांना सांगत असतो. त्यांच्या मागण्या सहज धुडकावत असतो.

अशावेळी ही मुलं निराश नाही का होत ? काहीवेळेला मग ही मुल आक्रमक होतात, चिडखोर होतात.

तर कधीकधी खुप भित्री होतात. कोणतही काम करण त्यांना  कठीण होऊ लागते. अशावेळी  सांगा त्यांना  किती त्रास होत असेल?

कारण लहान मुलांना असा काही त्रास होतो हेच कोणाला मान्य नसत.
  

नैराश्य हे अगदी छोट्या कारणांमुळे येत असते .पण त्याचा परिणाम फार भयानक असतो. म्हणून ते वेळीच लक्षात येणे गरजेचे आहे.

लहानमुलांना तर आपण गृहितच धरलेले आहे .,पण तस नाही आहे. त्यांना पण मान, अपमान, राग, माया, दुःख, राग या भावना आहेतच.

त्यांच्या भावनाही आपल्या इतक्याच तीव्र असतात. आईवडील म्हणून तुम्ही याची जाणीव ठेवली पाहिजेत.

नकळत मुलांचा आपण अपमान तर करत नाही ना? याची काळजी तुम्ही घेता का?

त्याच्या कडून अवाजवी अपेक्षा तर आपण करत नाही ना?

त्याची सतत कुणाशी तरी तुलना आपल्याकडून होतेय का?

त्याला जर एखाद्या गोष्टीत अपयश आल तर तुम्ही त्याला, धीर देऊन प्रयत्न करण्यास सागता, कि दोष देताय? 

या गोष्टीचा पालकांनी विचार करायला हवा.
 

हिच मुल पुढे मोठी झाल्यावर त्याच विचारात, भावनेत अडकली तर मला सांगा त्यांचे काय होत असेल?

तुम्ही त्यांना आधार देणारे, प्रेम करणारे वाटत असाल का?

आपल्या अडचणी, समस्या ते तुम्हांला सांगतील?

तुम्ही त्यांना समजून घ्याल हा विश्वास त्यांना वाटेल ?
 

आज म्हणून ही तेरा चौदा वयाची मुलं चुकीच्या सवयीचे गुलाम होत आहेत. कारण नैराश्याने ग्रासलेली ही मुल आज आत्मविश्वास हरवून बसली आहेत.

ह्यांची आपलेपणाची, प्रेमाची, विश्वासाची, आधाराची गरज आज पालकांकडून पूरी होत नाही .
 

खरतर आज पालक, आणि विद्यार्थी हे दोघेही ह्या नैराश्याच्याच अंधारात वावरत आहेत. दोघांनाही गरज आहे ती थोडा वेळ एकमेकांना देण्याची, एकमेकांशी बोलण्याची. आपआपसात संवाद करण्याची.

पालकांनी जसा आपल्या इच्छा मुलांनवर लादू नयेत, तसेच मुलांनीही पालकांना आपल्या गरजा पुरवणारे साधन म्हणून बघू नये.

असं  नात जर हव असेल तर पालकांनो थोडा विचार करा. आपण कस वागायला हव याचा.

नाही का?

Source

What is Depression in Marathi

Depression म्हणजे काय ?

©डॉ सुजाता डोंगरे, 
काॕन्सलर, मेंदूविज्ञान व मानसशास्त्रज्ञ, (मुंबई )

 

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button