Post's
High income Startup:- Councelling and Guidance in Marathi
समुपदेशनाची गरज आणि महत्व
©अशोक सोनवणे, ब्रेन/इंटेलिजन्स ट्रेनर, Counselor
मानसशास्त्रीय उपचार तज्ञ
समुपदेशन (Counseling) म्हणजे नक्की काय?
समुपदेशन (Counseling) म्हणजे फक्त सल्ला किंवा मार्गदर्शन – Guidance नव्हे.
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात उद्भवणार्या मानसशास्त्रीय वा अन्य समस्यांची उकल करण्यात त्या व्यक्तीला साहाय्य वा मार्गदर्शन – Guidance करणे. ही समुपदेशक (Counselor)ची प्रमुख भूमिका.
थोडक्यात आपलाच गुंता आपणच सोडविण्यासाठी समुपदेशक (Counselor) साहाय्य करतात.
अगदी सहा महिन्याचे बाळ सुद्धा आपल्या नैसर्गिक मनमोहक हालचाली करून जवळच्या व्यक्तीचे मन आपल्याकडे आकर्षित करते.
वाढत्या वयानुसार कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्याला जवळ घ्यावे, आपल्यावर खूप प्रेम करावे, आपल्यासोबत खूप गप्पा माराव्यात, आपल्यासोबत भरपूर खेळावे अशी अपेक्षा ठेवते.
दोन वर्षाच्या मुलाची याच अपेक्षेतून सतत बडबड सुरूच असते. पुढे शाळेत जायला सुरुवात झाली की कितीतरी गोष्टीची खटाटोप सुरु असते, किशोरावस्थेत मित्र, शिक्षक, कुटुंब यांच्याकडून अपेक्षा या असतातच.
परंतु या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर मुल चिडचिड करते, रडके बनते, आक्रमक किंवा भावनिक होते, कुठेतरी स्वतःला कुटुंब, शाळा आणि मित्र यांच्याकडून आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचे वाटते.
मग त्याच्यामध्ये एकटेपणाची आणि असुरक्षिततेची भावना तयार होते. साहजिकच अशा मानसिकतेचा परिणाम त्याच्या मेंदूवर होतो.
मेंदूच्या कार्यपद्धतीत हळूहळू अडथळा निर्माण होतो, मेंदूतून स्त्रावणाऱ्या जैवरसायनांचा समतोल बिघडतो. येथूनच त्याच्या व्यक्तिमत्वाला चुकीच्या सवयी लागण्याची सुरुवात होते.
आपल्यावर इतरांनी रागावणे, चिडचिड करणे, टोमणे मारणे, अपमानित करणे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, भीती दाखविणे, शिक्षा करणे हे कोणालाच आवडत नाही.
मग मुलांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुटुंब आणि शाळा येथे सतत रागावणे, चिडचिड करणे, टोमणे मारणे, अपमानित करणे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, भीती दाखविणे, शिक्षा करणे असेच होत असेल तर याचा परिणाम सुद्धा मुलांच्या मेंदूवर होतो.
मुलांच्या मेंदूच्या खालच्या भागात असलेला भावनिक भाग (एमिग्डला) सतत कार्यन्वित होतो.
याउलट मेंदूच्या वरच्या भागात कॉर्टेक्स एरिया मध्ये असलेल्या उच्च बौद्धिक भागात पुरेशा प्रमाणात ग्लुकोज आणि ऑक्सिजन पोहचू शकत नाही, त्याचा परिणाम मुलांच्या मेंदूतील न्यूरॉन्स पेशीच्या जोडण्यावर होतो.
म्हणजेच याचा परिणाम मुलांच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा पडतो.
मुलांच्या मेंदूचा भावनिक भाग (एमिग्डला) सतत एक्टिव्ह राहिला तर मुलांची समजून घेणे, लक्षात ठेवणे, आठवणे, अचूकता, वैचारिक आणि निर्णयक्षमता, समयसूचकता ही बौद्धिक कौशल्य कमी होतात.
तर याउलट आळस, दुर्लक्ष, खोडया करणे, नको त्या गोष्टी करणे, अशा विविध कृती सुरु होतात. यामुळे हळूहळू अशा मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत जाते.
मुलांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची सुरुवात त्याच्या सभोवताली असलेल्या कौटुंबिक, शेजारील, शाळेतील वातवरणातून झालेली असते. म्हणूनच अशावेळी बालक आणि पालक सर्वांनाच समुपदेशन घेण्याची आवशकता असते.
प्रशिक्षित आणि कौशल्य असलेला समुपदेशक अशा मानसिकतेतून काही उपचारात्मक पद्धतीच्या साह्याने मुलांना अशा मानसिकतेतून सहज बाहेर काढू शकतो.
समुपदेशनाची गरज आणि महत्व
समुपदेशन आणी माणसाशास्त्रीय उपचार अभ्यासक्रम या डिप्लोमा कोर्समध्ये आपण खालीलप्रमाणे सर्व गोष्टी शिकू शकता…
1. आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत. आपण मेंदूला अनुकूल वातावरण देतो की प्रतिकूल देतो.
2. मेंदूमध्ये बुद्धिमत्ता कशी विकसित होत असते, अजून गतीने ती विकसित कशी करावी.
3. मानसिकता का बिघडत असते, घटना कशा स्वीकारत असतो. घटनावर भावना कशा तयार होत असतात.
4. समुपदेशन प्रक्रिया कशी असते, केसहिस्ट्री ते 25 उपचारात्मक पद्धती अभ्यासणार आहोत.
5. पूर्ण कार्यशाळा पॉईंट टू पॉईंट ppt वर आणि पूर्ण live असेल.
6. दररोजच्या दररोज भरपूर समस्या आणी प्रश्नावर चर्चा असेल.
7. bp, शुगर, अस्थमा, प्यारालिसेस, हार्टचे आजार सर्व मानसिक समस्यापासून कसे सुरु होतात, त्यापासून बचाव कसा करावा.
8. कुटुंबाचे शरीरिक आणी मानसिक आरोग्य सांभाळून प्रगती कशी साधवी.
9. मेंदू विज्ञान आणी माणसाशास्त्र यावर आधारित मुलावर संस्कार कसे करावेत.
10. समुपदेशन आणी माणसाशास्त्रीय उपचार याच्यात करियर कसे करावे.
वरील विषयसोबत अजून खूप काही खास असेल, त्यामुळे हा कोर्स म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉईंट असेल.
समुपदेशनामध्ये करीअर करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करावा
https://chat.whatsapp.com/JV3mEERTgLM4s7fZvkNfpj
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
You must log in to post a comment.