My title My title
Uncategorized
Trending

Top Fan

टॉप फॅन - लघुकथा

Top Fan

TOP FAN

टॉप फॅन – लघुकथा

©नेहा गोसावी

“तुला काय वाटतं हे प्रमोशन तिने स्वतः च्या बळावर कमावलं? अरे मी .. मी.. बघितलंय तिला ऑफिस बाहेर आपल्या बॉस सोबत..” कार्तिक त्याच्या बाजूच्या डेस्क वर बसलेल्या मित्राला सांगत होता.

तेवढयात ऋतु तिथे आली, त्याला उठवलं आणि अख्ख्या ऑफिस समोर त्याला जाब विचारला.

“काय अफवा पसरावतोय तू कार्तिक? ते डील मी क्रॅक केलं म्हणून माझं प्रमोशन झालं. आणि तू लोकांना हे काय सांगत सुटलाय?”

“बरोबरच तर बोललो ना मी, असं कसं तू डील क्रॅक केलंस? मागाच्याही वर्षी मी याच क्लाएंट ला प्रपोजल पाठवलं होतं, अगदी मीटिंग वैगरे सगळं केलं, तुझा सिनियर असून सुद्धा त्यांनी ते प्रपोजल रेजेक्ट केलं होतं आणि आता त्यांनी ते चक्क accept केला तेही माझ्या पेक्षा तीन वर्षांनी ज्युनिअर असलेल्या मुलीकडून? Strange” त्याने हात हवेत उडवले आणि त्याच्या डेस्क वर जाऊन बसला.

तिने आजुबाजुला नजर फिरवली, सगळे तिच्याच कडे बघत होते, काहींचे चेहरे गंभीर तर काहींच्या चेहऱ्यावर तुसडेपणा चे भाव, कोणीही तिच्या या कामगिरीवर कौतुकाने बघत नव्हत.

नाराज होऊन ती घरी आली. फ्रीज मधल पाणी गटागटा प्यायली आणि त्याच अवस्थेत ती सोफ्यावर तशीच बसली, कितीतरी वेळ.

रात्र झाली तसा तिचा नवरा मंदार lach उघडून घरात आला. Lights लावले तर ऋतु दिसली अंधारात बसलेली, एकटीच तिच्या विचारांमध्ये हरवलेली.

“काय झालं बाळा?” त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं. तसा तिने आज ऑफिस मध्ये घडलेला प्रकार रडत रडत सांगितला.

“खूप वर्षांपासून बॉस हे डील क्रॅक करायच्या मागे लागले होते, या वर्षी मी ते केलं म्हणून त्यांनी माझं प्रमोशन केलं. तर…आणि ही आजची गोष्ट नाही नेहमीचच आहे झालंय हे. कार्तिक मला बोलण्याची एकही संधी सोडत नाही. उठता, बसता, कानी, कपाळी माझंच नाव त्याच्या मुखात..

मला एक दोन जणींनी सांगितलं आहे की कायम माझ्याच चुगल्या करत असतो आणि इतर लोकांना भडकावतो…

आजचा इतका आनंदाचा दिवस माझ्यासाठी पण आता असं वाटतं निघून जावं त्या ऑफिस मधून.”

“ओके, रिलॅक्स…” मंदार तिला थांबवत म्हणाला.

“तुला “fan” माहिती आहे का ग?”

तिने बोट वरती करून विचारलं “हे ?” किती हसला तो…

“नाही ग, नाही पंखा नाही!”

“मग?”

“तू कोणत्या हिरोची फॅन आहेस?”

“शाहरुख”

“हा तो फॅन म्हणतोय मी.”

“मग त्याचा इथे काय संबंध?”

“Hmm. मला सांग, फॅन या term चा नेमका अर्थ काय?”

” प्रोफेशनल लेव्हल वर कोणीतरी आवडणं, त्यात इंटरेस्ट घेणं किंवा फॉलो करणं “

” तुला माहिती आहे, हे फेसबुक पेजेस असतात ना, त्यावर काही जणं “टॉप फॅन” म्हणून ओळखले जातात”

“हो?”

“हम.. म्हणजे जो व्यक्ती त्या पेजच्या पोस्ट वर अधिकाधिक वेळा कमेंट करत असेल त्याला “TOP FAN” चा शिक्का मिळतो.”

“बरं मग?”

“मग काय, कमेंट करतो म्हणजेच त्या पेज मध्ये इंटरेस्ट दाखवतो?”

“हो..”

“पण तुला माहितीये? बहुतेक वेळा TOP FAN कोण असतात?”

“कोण?”
“कधी कधी पेज चे जास्तीत जास्त TOP FAN निगेटिव्ह कमेंट्स करणारे असतात. उदाहरणार्थ, मला एखादी गोष्ट पटली नाही तर ती सोडून न देता मी त्या पोस्ट वर निगेटिव्ह कमेंट्स पास करणार.

जर त्या पेजच्या प्रत्येक पोस्ट वर जरी मी निगेटिव्ह कमेंट टाकली तरी त्या पेज चा “TOP FAN” असा शिक्का मला बसेल.

कारण मी जर त्या पेज च्या प्रत्येक पोस्ट ला कमेंट करतोय, याचा अर्थ मी त्या पोस्ट मध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतोय.

जास्त इंटरेस्ट दाखवतोय म्हणून ते मला टॉप फॅन म्हणतात. आता हीच गोष्ट आपण खऱ्या आयुष्यात बघितली तर?

जी लोकं आपल्या बद्दल वाईट बोलतात, आपल्या प्रत्येक गोष्टींना नाव ठेवतात. लोकांकडे आपल्या बद्दल काहीही बोलतात याचा अर्थ त्यांना आपल्यात भयंकर इंटरेस्ट असतो मग अशा लोकांना काय म्हणायचं?”

“कळलं” ऋतूने हसून म्हटलं आणि तिथून उठली.

दुसऱ्या दिवशी पासून ऑफिस ला गेल्यावर कार्तिक कडे स्मितहास्य केलं आणि काहीच मिनिटांत तिथल्या एका व्हाईट बोर्ड वर सुंदर हस्ताक्षरात एक मजकूर उमटला. तो मजकूर होता.

“Feel like celebraty when people talk about you behind your back. Whatever, whoever they are! They are your Top Fan.”

Source: itworksseducation

TOP FAN

टॉप फॅन – लघुकथा

©नेहा गोसावी

लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.

All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Share this Article

Leave a Reply

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button