My title My title
Brain StormingSomething Different

History of Reiki Treatment Methods

History of Reiki Treatment Methods

रेकी उपचार पद्धतीचा पुर्व इतिहास



©दयानंद गुरूजी
संपर्क-8652170720



रिकीला रेकी असेही म्हणतात. Reiki हेच नाव प्राचीन काळापासून प्रचलित असल्यामुळे यापुढे आपणही Reiki असेच म्हणू या.

Reiki हे शारीरिक आजारांना व कमींना भरुन काढणारे हाताद्वारे केले जाणारे हजारो वर्षांपूर्वीचे प्रभावी तंत्र आहे.

हे तंत्र तिब्बेटी बौद्धिस्तांचे असल्याचे मानले जाते. सन १८०० च्या अंती डाॅ. मिकाओ युसयूई या जपानी बौद्धांनी ते पुन्हा शोधून काढले.

हे तंत्र सोपे पण अत्यंत परिणामकारक आहे. ते सहजतेने कोणीही करु शकतो.

Reiki हा शब्द दोन जपानी शब्दांनी बनलेला आहे. ‘रे’ आणि ‘की’ असे ते दोन शब्द आहेत. या ‘रे’ चा अर्थ वैश्विक असा होतो. हा अर्थ बहुतेकांना पटतो.

हा अर्थ अनेकांनी स्वीकारला आहे. खालील जपानी कांजीतील वरचा भाग म्हणजे ‘रे’ हे अक्षर आहे. श्रीमती ताकातांच्या मते वरील अर्थ अचूक आहे.

कांजीतील या रेखाटनांतून अनेक गोष्टींचा बोध होतो. असेही त्या सांगतात. हा कांजीचा प्रकार ऐहिक आणि अत्यंत गूढही आहे.

‘रे’ या अक्षराचा अर्थ वैश्विक असा आहे. ही सत्य परिस्थिती जरी असली तरी त्याचा ‘सगळीकडे’ असाही अर्थ ध्वनित होतो.

Reiki समजून घेण्यासाठी या अक्षरांचा संपूर्ण गूढ अर्थ समजून घ्यायलाच हवा, असे मात्र नाही.

‘रे’ चे ऐहिक स्पष्टीकरणाच्या द्दष्टीने संशोधन केले असता जपानी कांजीतील ‘रे’ हे अक्षर सखोल समज दर्शविते.

Reikiमध्ये वापरल्या गेलेल्या ‘रे’ या अक्षराचा अत्यंत श्रेष्ठ नैसर्गिक ज्ञान किंवा आध्यात्मिक जागृतता असा अर्थ होतो.

इतर प्राणीमात्रांमध्ये नसलेली किंवा कमी प्रमाणात असलेली बुद्धी म्हणजे मानवाला ईश्वराने दिलेली देणगीच आहे.

ती बुद्धि देवाकडूनच आली आहे. ती म्हणजे जागृत चैतन्यच आहे. हे सर्वजण जाणूनच आहेत. ते चैतन्य प्रत्येकाला संपूर्णपणे जाणते.

त्या चैतन्याला सर्व समस्या माहीत असतात आणि समस्यांचे कारणही माहीत असते. त्या चैतन्याला त्या समस्यांना, अडचणींना कसे भरुन काढायचे हेसुध्दा माहीत असते.

डाॅ. चुजीरो हायाशी

डाॅ. हायाशी निवृत्त आरमार अधिकारी होते. डाॅ. यूसयूई यांनी सन १९२५ मध्ये त्यांना ‘Reiki मास्टर’ ची पदवी दिली. तेव्हा डाॅ. हायाशी ४७ वर्षाचे होते.

युसयूई यांनी निधनापूर्वी डाॅ. हायाशींना Reiki च्या प्रसाराची व इतर जबाबदारी सांभाळण्याबाबत विचारले होते. डाॅ. हायाशींनी ही जबाबदारी स्वीकारली.

डाॅ. यूसयूईंच्या शारीरिक व इतर कामींना भरुन काढण्याच्या पद्धतीत Reikiचे प्रतिक आणि Reikiचे ध्येय वगैरे गोष्टींचा समावेश होता.

कोरियामा पर्वतावर आलेल्या अनुभवानुसार त्यांनी ही पद्धत विकसित केली होती. डाॅ. हायाशींना डाॅ. युसयूईंनी शोधून काढलेले तंत्र जास्त विकसित करायचे होते.

त्यांनी टोकियो येथे ‘ Reiki केंद्र’ उघडले. ते उपचाराची सर्व नोंद ठेवत असत. सर्व नोंदीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी उपचार पद्धतीमधील हातांच्या अवस्थांमध्ये प्रभावीपणा आणला.

डाॅ. हायाशींच्या काळात महायुद्ध सुरु झाले. युध्दासाठी पुरुषांना बोलावले जाईल हे ते जाणून होते. तसेच त्यांनाही बोलाविण्याची शक्यता होती.

अशा स्थितीत Reikiचे तंत्र संपूर्ण सुरक्षित राहावे म्हणून त्यांनी दोन स्त्रियांना हे संपूर्ण तंत्र शिकविले. या दोन स्त्रियांपैकी एक होत्या त्यांच्या पत्नी आणि दुसर्‍या हावायो ताकाता.

हावायो ताकाता

हवाईमधील काऊईमध्ये २४ डिसेंबर १९०० ला हवायो ताकाता यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील जपानी परदेशवासिय होते.

ते तिथे स्थानिक झाले होते. त्यांचे वडील ऊसाच्या शेतात कामाला होते. त्या सुध्दा लहानपणापासून उत्यंत मेहनती होत्या.

त्या जसजश्या मोठ्या होऊ लागल्या तसतसे त्यांचे काम वाढत होते. त्यांना ज्या ठिकाणी काम मिळाले होते तेथीलच पुस्तक विक्रेते साईची ताकाता यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

त्यांना दोन मुली झाल्या. वयाच्या चौतिसाव्या वर्षी १९३० मध्ये साईची ताकातांचे निधन झाले आणि दोन्ही मुलींच्या संगोपनाची आणि घराची संपूर्ण जबाबदारी श्रीमती ताकातांवर पडली.

आपले घर चालविण्यासाठी त्या कमीत कमी विश्रांती घेऊन परिश्रम करीत होत्या. खूप परिश्रम केल्यामुळे त्यांचे पोटाचे आणि फुफ्फुसाचे दुखणे वाढले. त्यांना त्रास होऊ लागला.

असा त्रास होत असतानाच त्यांच्या भगिनींचे निधन झाले.

ही बातमी आई- वडिलांकडे पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे त्यांना जपानचा प्रवास करण्याची पाळी आली.

त्यांना तिथे आपली तब्येत चांंगली होईल, असेही वाटत होते. त्यांनी अपल्या चुलत बहिणीबरोबर जहाजाचा प्रवास सुरु केला.

आपल्या आई- वडिलांना बहिणीच्या मृत्यूची? दुःखद बातमी सांगितल्यानंतर त्या दवाखान्यात गेल्या.

दवाखान्यातील तपासणीत त्यांच्या पोटात गाठ झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ‘ अपेर्डिक्स’ ची सूज आली होती.

त्यांनी काही आठवडे विश्रांती घेतल्यानंतर आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियेसाठी त्या तयार होत्या.
त्या शस्त्रक्रिया करण्याच्या विशेष टेबलावर झोपल्या होत्या.

शस्त्रक्रिया काही वेळातच सुरु होणार होतो. तेवढ्यात हावायोंना एक आवाज ऐकू आला. आवाज सांगत होता.

शस्त्रक्रिया आवश्यक नाहीये, शस्त्रक्रिया आवश्यक नाहीये, अशा प्रकारचा आवाज याआधी कधीच ऐकला नव्हता.

याचा काय अर्थ होतो हे शोधण्यासाठी त्या इकडे तिकडे बघू लागल्या. त्या आवाजाने पुन्हा तीन वेळेस अधिक जोरात तेच सांगितले.

त्यांनी आपण खडखडीत जागृत अवस्थेत आहोत. याची खात्री करुन घेतली. आपल्याला निव्वळ आभास होत नाहीये. याची त्यांना कल्पना आली.

त्या लगेच शस्त्रक्रियेच्या टेबलावरुन उठल्या. त्यांच्या सभोवतीची बंधने त्यांनी सोडली. त्यांनी डाॅक्टरांशी ह्याबाबत बोलण्याचे ठरविले.

जेव्हा डाॅक्टर आले तेव्हा त्यांनी डाॅक्टरांना सर्व हकिकत सांगितली आणि आपली समस्या इतर कुठल्या मार्गाने दूर होऊ शकते का, हे विचारले.

डाॅक्टरांना डाॅ. हायाशींचे Reiki क्लिनिक माहीत होते. त्यांनी श्रीमती हवायोंना त्याची माहिती दिली.

श्रीमती हवायोंगी Reiki क्लिनिकमध्ये उपचार सुरु केले. त्यांना त्या आधी Reiki बद्दल काहीच माहीत नव्हते.

त्या उपचार केद्रात उपचार करणार्‍या व्यक्तीने हाताच्या विशिष्ट पद्धतींद्वारे त्यांना तपासले. त्याद्वारे तिने जे अनुमान लावले ते डाॅक्टरांच्या अनुमानाशी जुळणारे होते.

हे बघून श्रीमती हवायो प्रभावित झाल्या आणि या उपचाराद्वारे आपला आजार नक्की बरा होईल असा त्यांना विश्वास वाटू लागला.

ते स्वतः वर होत असणार्‍या उपचारावर काळजीपूर्वक लक्ष ठेवू लागल्या.

दोन Reiki प्रशिक्षक त्यांच्यावर दररोज उपचार करीत असत.

त्यांच्या हाताची उष्णता अत्यंत प्रखर असे. त्यामुळे श्रीमती ताकातांना ते एखादे उपकरण वापरत असतील असे वाटायचे.

एक दिवस त्यांनी त्यांच्या आजूबाजूला पाहिल्यावर त्यांना तसे काही उपकरण दिसले नाही. उपचारकर्त्यांनी मोठ्या बाहयांचा शर्ट घातला होता.

म्हणून बाहीमध्ये एखादे उपकरण असावे अशी शंका त्यांना आंली तेव्हा त्यांनी उपचारकर्त्यांना बाहया वर करुन दाखविण्याची विनंती केली.

त्यांच्या बाहीतही काहीच नव्हते. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. उपचारकत्यांना बाईंनी आपल्याला असे का करायला सांगितले हे एव्हाना उगमले होते.

उपचाराकत्यांनी बाईंचे शंका निरसन केले आणि त्यांना Reiki कशा पध्दतीने काम करते याची माहिती सांगितली.

श्रीमती ताकाता दररोज उपचार घेत होत्या. त्यांना स्वतःत सुधारणा होत असल्याचे वाटत होते. चार महिन्यात त्यांचा संपूर्ण आजार बरा झाला.

त्यांच्यातील कमी भरुन निघाल्या. इतका चांगला परिणाम झाल्यानंतर त्या Reikiपासून प्रभावित झाल्या आणि त्यांनी Reiki शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली.

Reiki हा जपानी प्रकार आहे. आणि जपानबाहेर गेल्यास तो आपल्याला शिकता येणार नाही, हे त्यानां माहीत झाले.

श्रीमती ताकाता दवाखान्यातील शस्त्रवैद्यांना भेटल्या. त्यांनी शस्त्रवैद्यांना विनंती केली की, त्यांनी डाॅ. हायाशींना त्यांनी Reiki शिकविण्याबाबत सांगावे.

शस्त्रवैद्यांनी श्रीमती ताकातांची विनंती मान्य केली. डाॅ. हायाशींना स्वतःच्या पतिच्या व्यतिरिक्त अजून एका स्रीला Reiki शिकविण्याची इच्छा होती.

त्यांनी श्रीमती ताकातांची अत्यंत दीर्घ प्रयत्न करण्याची चिकाटीची वृत्ती बघितली आणि त्यांना Reiki शिकविण्याचे ठरविले.

१९३६ च्या वसंत ऋतुत श्रीमती ताकातांनी Reikiची प्रथम पदवी प्राप्त केली. डाॅ. हायाशींबरोबर काम केले आणि दुसरी पदवीही मिळविली.

श्रीमती ताकाता १९३७ हवाईट परतल्या. त्यांनी डाॅ. हायाशींच्याच पावलावर पाऊल ठेवून डाॅ. हायाशींच्या कन्येसह हवाईट Reiki केंद्र उघडले.

त्यांनी हवाईत Reikiसाठी प्रयत्न केले. सन १९३८ मध्ये डाॅ. हायाशींनी त्यांना ‘ Reiki मास्टर’ ही पदवी बहाल केली.

डाॅ. हायाशींकडून ही पदवी मिळविणार्‍या तेराव्या आणि शेवटच्या Reiki मास्टर होत्या.

जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी श्रीमती ताकातांना Reiki चे प्रशिक्षण इतरांनाही देण्याची आवश्यकता वाटू लागली.

त्याबाबत गांभीर्याने विचार करु लागल्या. जपानी आदर व्यक्त करण्याची पद्धत पाश्चात्यांच्या मनात बिंबवणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.

त्यांना कळून चुकले. श्रीमती ताकातांमध्ये अत्यंत चिकाटी असल्यामुळे त्या सहजगत्या Reiki मास्टर झाल्या होत्या.

त्यामुळे पाश्चात्यांनाही ते सोपे वाटेल आणि ते Reiki ला महत्त्व देणार नाही. असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी Reiki शिकू इच्छिणार्‍यांसाठी फी जवळजवळ १० हजार डाॅलर येवढी ठेवली.

पाश्चात्यांना पैशाचे महत्त्व कळते. Reiki फी भरपूर ठेवल्यावर आपोआप त्याचेही महत्त्व त्यांना वाटेल आणि ते Reiki ला आदर देतील, असा विचार श्रीमती ताकातांनी केला.

त्यांनी Reiki मास्टर या पदवीसाठ दहा हजार डाॅलर फी निश्चित केली. त्यांना ती Reikiच्या महत्त्वाशी सुसंगत वाटली.

त्यांनी Reiki च्या प्रथम परीक्षेसाठी १७५ आणि दुसर्‍या परीक्षेसाठी ५०० डाॅलर फी ठेवली.

अजूनही काही Reiki निपूण महागडी फी घेतात, तर काहींनी आपली फी कमी केली आहे. सर्वांना Reikiचे प्रशिक्षण घेता यावे हा त्यामागील उद्देश आहे.

१९७० ते ८० च्या दशकात श्रीमती ताकांतांनी बावीसजणांना Reiki मास्टर ही पदवी बहाल केली. ११ डिसेंबर १९८० मध्ये त्यांचे स्थित्यंतर झाले.

या मुळ २२ जाणांरी इतर अनेकांना Reikiचे प्रशिक्षण दिले. श्रीमती ताकातांच्या स्थित्यंतरानंतर Reikiचा वेगाने प्रसाद झाला.

आज उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि जगाच्या अनेक भागांमध्ये Reikiचा प्रसार झाला आहे.

आज जवळजवळ २००० Reiki निपूण अर्थात Reiki मास्टर आहेत आणि जवळजवळ २०,००० लोक जगात त्याचे प्रशिक्षण घेत आहेत.

 

युसयूई शिकी रोयोहो

शारीरिक आजार आणि कमींना निसर्गतःच भरुन काढण्याची युसयूईची पद्धत-

‘Reiki’ हा मूळ जपानी शब्द आहे. तो अनेक कमींना भरुन काढणे आणि आत्मिक गोष्टींचे निरुपण करतो. Reiki या शब्दातून वरील दोन्ही बाबी प्रतित होतात.

डाॅ. युसयूईंनी अनेक कमींना भरुन काढण्याची जी पद्धत शोधून काढली तिला युसयूई शिकी रोयोहो किंवा कमींना निसर्गतःच भरुन काढण्याची पद्धत म्हटले जाते.

डाॅ. हायाशी किंवा डाॅ. युसयूई यांनी कुठलीही Reiki बाबतची माहिती लिहून ठेवल्याचे आता पावेतो आढळलेले नाही.

युसयूईंच्या Reiki पध्दतीची तोंडी माहिती श्रीमती ताकातांच्या शिष्यांकडून मिळते.

माझे प्रथम Reiki शिक्षक बेथल फेग होते. त्यांनी श्रीमती ताकातांकडूनच Reikiचे शिक्षण घेतले होते.

श्रीमती ताकातांकडून Reiki शिकलेल्या काही इतर जणांशीही माझा संबंध आला. यूसयूईच्या पद्धतीमधील काही अत्यंत प्रभावी मुद्यांबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली.

मी ज्या श्रीमती ताकातांच्या ज्या शिष्यांशी चर्चा केली त्यात प्रामुख्याने हेलन हेबर्ली, हॅरी कुबोई, आणि फिलीस फ्युरुमोटो हे Reiki निष्णात होते.

विविध कमींना भरुन काढण्याच्या युसयूई पद्धतीत कालमानानुसार विकास होत गेला. सध्या ही पद्धत अत्यंत साधी सोपी परंतु अत्यंत परिणामकारक अशी आहे.

डाॅ. युसयूई यांना अंतर्ज्ञानाने प्राप्त झालेल्या पध्दतीत कालमानानुसार नव्या कल्पनांरुप बदल झाले आहे युसयूईंच्या Reiki पद्धतीत कशी सुधारणा होत गेली ते खाली दिले आहे.

कोरीयामा पर्वतावर आलेल्या अद् भुत अनुभवानंतर Reikiची संपूर्ण क्षमता डाॅ. युसयूई यांच्यात आली. तसेच ते इतरांवर Reiki पद्धतीने उपचार करु लागले.

ते इतरांनाही Reiki शिकविण्यास समर्थ होते. त्यानंतर त्यांनी Reiki ध्येय बनविले. Reikiच्या उपचारासाठी त्यांनी ते ठरवून दिले.

डाॅ. हायाशी यांनी त्यात हातांच्या अधिक अचूक, योग्य अवस्थांचा समावेश केला. तसेच त्याच्या तीन पायर्‍या निश्चित करुन त्यात समरसता आणली.

श्रीमती ताकातांनी त्यात फिची पद्धत आणली. श्रीमती ताकातांच्या शिष्यांनी प्रत्येक पायरी झाल्यावर थोडा काळ थांबण्याचा त्यात समावेश केला.

Reiki त सर्वात निष्णात समजले जाणारे सध्याचे फिलिस फ्युरुमोटो यांनी यूसयूईंच्या पद्धतीत अजूनही सुधारणा होऊ शकतात असे म्हटले आहे.

श्रीमती ताकातांच्या स्थित्यंतरानंतर काही शिक्षकांनी Reiki शिकविण्याच्या पद्धतीत बदल केला.

त्यातील अनेक बदल अधिक फायद्याचे, सखोल मार्गदर्शन आणि विचार करुन केलेले आहेत. त्या बदलांद्वारे कमींना भरुन काढण्याची क्रिया वेगानेच होते.

त्यातील काही बदल निर्बंधनात्मकच आहेत. त्यामुळे विद्वार्थ्यांना आपली प्रगती करणे थोडे अवघड जाते.

काहीजण तिसर्‍या पायरीची छोट्या विभागांमध्ये विभागणी करुन प्रत्येक विभागाला नवीन पायरीची उपाधी देऊन अधिक पैसे कमवित आहेत.

अशा लोकांकडे शिकणार्‍यांना आपण शुध्द युसयूईंच्या पद्धतीचे Reiki शिकत आहोत, असे वाटते. पुढे ते शिक्षक झाल्यावर मोठ्या अभिमानाने तसेच शिकवायला सुरुवात करतात.

परंतु मूळ युसयूईची पद्धत तशी नसते. अशा प्रकारे Reiki विविध प्रकारे विकसित झाले आहे. विकसित झालेल्या विविध तर्‍हांचे मूळ Reiki च आहे.



टीप: उद्यापासुन केवळ Knowledge म्हणुन आम्ही पुर्ण रेकी सिरीज देत आहोत. पण कृपया तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच याचा अभ्यास करावा.



©दयानंद गुरूजी
संपर्क-8652170720



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button