
Varunraj kalse
5 important rules for Negotiation!
- ,
- , Brain Storming, Post's
5 important rules for Negotiation!
Negotiation साठी 5 महत्त्वाचे नियम !
©सलिल चौधरी
Negotiations म्हणजे वाटाघाटी आपल्या सर्वानाच कराव्या लागतात. सहकाऱ्यांसोबत, ऑफिसमधील वरिष्ठांसोबत, ग्राहकासोबत, विक्रेत्यासोबत, अगदी आपल्या कुटुंबातील सदस्यांशी देखील वाटाघाटी कराव्या लागतातच.
प्रोफेसर मॅक लेविसन FBI साठी वाटाघाटी करण्याचे काम करतात. तसेच ते Negotiation या विषयाचे प्रोफेसर देखील आहेत. मॅक लेविसन यांनी Negotiation चे पाच वैश्विक नियम सांगितले आहेत. हे पाच नियम कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही व्यक्तीबरोबर आणि कोणत्याही वेळी काम करतातच ! चला तर मग पाहूया Negotiation चे नियम –
१. प्रत्येक व्यक्तीसाठी आपली प्रतिष्ठा जपणे महत्वाचे असते.
जर आपल्याला महत्त्व दिलं जात नाही किंवा अनादर होतोय असं लक्षात आलं तर लोक आपल्या भोवताली एक अदृश्य भिंत उभी करतात. आणि त्या भिंतीआडून युद्ध खेळतात.
वाटाघाटी नृत्यासारख्या असल्या पाहिजेत. स्वतः पुढे होऊन हात द्या, वाटाघाटींच्या चर्चेला एक rythm द्या. त्याला युद्धाचे स्वरूप येऊ देऊ नका.
२. लोकांना विचारलेले आवडते सांगितलेले आवडत नाही.
Negotiation मध्ये बऱ्याच वेळा आपली मागणी रेटून नेण्याकडे कल असतो.मनातून कितीही इच्छा झाली तरी हे टाळा. समोरील व्यक्तीला बऱ्याच वेळेला हा आपला अनादर वाटतो. त्याऐवजी बरेच प्रश्न विचारून समोरील व्यक्तीला चर्चेमध्ये समाविष्ट करा. वाटाघाटींना चर्चेचं स्वरूप आलं तर अर्ध युद्ध जिंकलंत !
३. लोकांना प्रत्येक गोष्टी मागचं कारण जाणून नघेण्यातरस असतो.
तुम्ही जे मुद्दे मांडत आहात ते “का” मांडत आहात त्याबद्दल बोला. नुसते कारण सांगून थांबू नका तर समोरून कुणी विचारायच्या आधीच समर्पक पुरावे/दाखले सादर करा. हे तंत्र वापरले तर प्रामाणिकपणामुळे विश्वास संपादन करणे शक्य होते.
पुरेशी Clarity नसेल आणि तुम्ही काही माहिती लपवताय असा संशय आला तर वाटाघाटी कधीच पुढे जाणार नाहीत.
४. लोकांना भीती घालू नका त्याऐवजी वेगवेगळे पर्याय द्या.
आता माझ्यासमोर दुसरा कोणताच मार्ग उरला नाही अशी भावना समोरील व्यक्तीच्या मनात येऊ देऊ नका. जर पर्याय देऊन त्यापैकी एक निवडायला सांगितले तर समोरील व्यक्तीला निर्णय घेणे आपल्या हातात आहे असे वाटते. त्यामुळे ते आपल्याला विरोध न करता, मदतच करतात.
५. लोकांना नेहमी आणखी एक संधी हवीहवीशी वाटते.
Negotiation अयशस्वी ठरले तरी चर्चेचे दरवाजे कायमचे कधीच बंद करू नका. समोरील व्यक्तीला पुन्हा चर्चा शक्य आहे हे स्पष्टपणे कळवा. बऱ्याचदा थोडा विचार केल्याने किंवा इतरांच्या सल्ल्याने आपलं मत बदलण्याची इच्छा काही लोकांना होते. अशावेळेला मला निर्णय बदलून पुन्हा घेण्याची मुभा आहे हे कळले तर लोक चर्चेमध्ये आणखीन open राहतात, विरोध कमी होतो.
हे पाच नियम जगातील कोणत्याही प्रकारच्या Negotiation मध्ये उपयुक्त ठरतील. पण याचा सराव करावा लागतो, प्रत्येक मुद्याचे चिंतन करावे लागते आणि मुख्य म्हणजे कोणत्याही वाटाघातीत “मी एकटाच जिंकेन” या विचारावर विजय मिळवणे अत्यावश्यक आहे.
5 important rules for Negotiation!
Negotiation साठी 5 महत्त्वाचे नियम !
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through internet research, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🆁🅴 करा
Varunraj kalse
Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information.
Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!
All Posts Share this Article
RELATED POSTS
View all
Success Has Many Fathers, But Failure is An Orphan – John F. Kennedy
August 3, 2021 | by Varunraj kalse
The Diderot Effect – डेनिस डिडरोट इफेक्ट…!
July 11, 2021 | by Varunraj kalse
50 Startup Business Ideas that can be started from Rs.1000 to Rs.50,000
June 30, 2022 | by Varunraj kalse
