My title My title
HealthMental Health

नकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग…

नकारात्मक विचारांना हाताळण्याचे ७ मार्ग…

माणसाच्या विचारांमध्ये त्याचे स्वतःचे आयुष्य घडवण्याची किंवा बिघडवण्याची शक्ती असते. संशोधन असे सांगते की माणसाच्या मेंदूमध्ये एका दिवसात जवळजवळ ५० ते ७० हजार विचार येतात.

हावर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की माणसाच्या फक्त विचारांमध्ये आपली दृष्टी, फिटनेस आणि सामर्थ्य सुधारु शकतात.

हे जरी खरे असले तरी संशोधनामध्ये असेही आढळून आले आहे कि आपल्या सर्व विचारांमधले ८०% विचार हे नकारार्थी किंवा एकसारखे असतात आणि हे विचार प्रगतीमध्ये मोठा अडथळा ठरतात.

दूर्दैवाने आपल्या मनावर सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचार जास्त परिणाम करतात.

नकारात्मक विचार मेंदूच्या अशा भागावर परिणाम करतात जे डिप्रेशन आणि चिंतेला कारण ठरते याउलट सकारात्मक विचार आनंद आणि समाधानाचे कारण ठरतात.

पण सकारात्मक विचार जास्त काळ टिकत नसल्याने त्याचे परिणाम सुध्दा जास्त काळ टिकत नाहीत.

जर आपल्याला हे परिणाम जास्त काळ टिकावे असे वाटत असेल तर आपल्या मनात जास्त काळ सकारात्मक विचार राहणे महत्त्वाचे आहे.

या गोष्टीवर संशोधन आणि आभ्यास केल्यावर आपल्याला काही असे मार्ग सापडले आहेत.

ज्यामुळे आपण नकारात्मक विचारांची साखळी तोडून सकारात्मक जीवनाकडे वाटचाल करु शकतो.

या लेखामध्ये आपण हे मार्ग कोणते आहेत ते पाहणार आहोत.

१. मनात येणार्‍या विचारांबद्दल जागृक रहा.

आपण नकारात्मक विचार करत आहोत हे आढळून आल्यावर लगेच स्वतःला थांबवा. एक नकारात्मक विचार दूसर्‍या नकारात्मक विचारांना प्रेरणा देतो.

आपल्या काही लक्षात येण्यापूर्वीच आपण निराशा आणि दू:खामध्ये ढकलले जातो त्यामुळे जेव्हा आपल्या मनात पहिला नकारात्मक विचार येतो तेव्हाचा त्याला थांबवणे गरजेचे आहे.

दूसरी गोष्ट आपण करु शकतो ती म्हणजे नकारात्मक विचाराला दूसर्‍या सकारात्मक विचाराशी बदलू शकतो किंवा तोच विचार सकारात्मक दृष्टीने बघू शकतो.
उदा. नकारात्मक विचार :- हे माझ्याबरोबरच का घडले? हे चांगले नाही झाले.
सकारात्मक दृष्टीकोन :- हो, हे माझ्याबरोबर झाले, मी जे झाले ते बदलू शकत नाही पण हा शेवट नाही. अजून माझ्याबरोबर खुप चांगल्या गोष्टी घडणे बाकी आहे.२. स्वतःला कामात गुंतवा.

“असं म्हणल जात खाली मन भुतांच घर असत.” इथे भुतांचा अर्थ वाईट विचार असा होतो.

लक्षात घ्या जेव्हा आपण काहीही काम न करता बसलेले असतो.

तेव्हा आपल्या मनात जास्त वाईट विचार येतात पण जेव्हा कामात गुंतलेलेअसतो तेव्हा विचार करायला आपल्याकडे वेळच नसतो.

संशोधनानुसार आपण आपले मन आणि हात स्वच्छतेच्या, विणण्याच्या किंवा आपला जे छंद आहे अशा कामात गुंतवून ठेवले तर आपण नकारार्थी विचारांना दूर ठेवू शकतो.

साउथ वेल्स या युनिवर्सिटी चे मानसशास्त्रज्ञ डॉ. जेन प्रिन्स यांच्या मते ” बिझी असणे म्हणजे आपल्याकडे बसून आयुष्याबद्दल विचार करायचा वेळ नसल्यासारखे आहे.

कामात गुंतलेले असल्यामुळे आपले लक्ष आपल्यापासून,आपले दू:ख आणि वाईट गोष्टींपासून दूर जाते.

म्हणजेच तुम्ही जितके स्वत:ला बिझी ठेवाल तितका कमी वेळ तुम्ही वाईट विचारांवर घालवू शकाल.३. नकारात्मक गोष्टींपासून दुर रहा.

नकारात्मक विचारांच्या कचाट्यात अडकणे खुप सोपे असते.

त्यामुळेच आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि अशा गोष्टी ज्यांमुळे नकारात्मक विचारांना चालना मिळेल अशा गोष्टींवर लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.

ते आपल्या पूर्व प्रियकराने दिलेली भेटवस्तू असू शकते किंवा मित्र किंवा असे नातेवाईक जे आपल्या मनात नकारात्मक विचार येण्यास कारण ठरतात.

२०१३ मध्ये नोट्रे डेम यांनी केलेल्या अभ्यासानुसार असे सिध्द झाले आहे कि नकारात्मक विचार करणे हे एक अशी सवय आहे जी आपण दूसर्‍यांकडून लगेच घेऊ शकतो.

त्यामुळे नकारात्मक लोकांकडे दूर्लक्ष करणे आणि नकारात्मक विचारांना कारण ठरणार्‍या गोष्टींपासून दूर राहणे आपल्याला समजूतदार आणि सकारात्मक बनवू शकते.४. आराम करा.

झोपेची कमतरता किंवा कमी झोप हे नकारात्मक विचारांना चालना देणारे एक मोठे कारण आहे.

झोपेची कमतरत आपल्या मूड वर परिणाम करते, जे चिंताग्रस्त, चिडखोर आणि रागिट स्वभावाला कारण ठरते.

मानसशास्त्रज्ञाच्या मते झोप आणि मूड यांच्यामध्ये एक महत्त्वाचे नाते आहे.

८ तासाची पुरेशी झोप आपल्याला नकारात्मक विचार दूर ठेवण्यास आणि आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.५. आवडती गाणी ऐका.

उत्साहपूर्ण गाणी ऐकणे नकारात्मक विचार दूर ठेवण्यास मदत करते. उत्साही आणि सकारात्मक गाणी ऐकताना नकारात्मक विचारांकडे लक्ष जाणे कठीण होते.

संशोधनानुसार आपली आवडती गाणी दिवसातून २५ मिनीटे ऐकल्याने आपला मूड खुप चांगला होऊ शकतो.

शिवाय याचे सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्या दिवसावर दिसून येतात.६. व्यायाम

पेन स्टेट युनिवर्सिटी ने केलेल्या एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे.

की जी लोकं रोज व्यायाम किंवा जास्त प्रमाणात शारिरीक हालचाली करतात ते दिवसात जास्त उत्साह आणि एक्साइटमेंट अनुभवतात.

ही माणस इतर माणसांच्या तुलनेस जास्त आनंद अनुभवतात.

जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा मेंदूमध्ये आनंद आणि सुखाशी निगडीत असलेले केमिकल डोपमिन जास्त प्रमाणात सोडले जातात.

हे नकारात्मक विचार मनात येण्यापासून थांबवण्यास मदत करते.७. मेडीटेशन

मेडीटेशन हा सुध्दा नकारात्मक विचार घालवून आपले मन सकारात्मक विचारांनी भरण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.

मेंदूच्या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की मेडीटेशन मेंदूच्या नकारात्मक विचारांच्या भागाला निष्क्रिय करण्यास मदत करते.

दिवसातून एकदा कमीत कमी १० मिनिटे केलेले मेडीटेशन आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी मदत करु शकते.आवडल्यास Like आणि Share करा.

©लेखक Unknown

सोर्स : whatsapp मेसेज.

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!
Check Also
Close
Back to top button