Something Different
Worlds Most Mysterious Script & Languages
Worlds Most Mysterious Script & Languages
गुढ रहस्यमयी लिपी & भाषा
©Anna®2022
प्राचीन सनातन हिंदु संस्कृती जेवढी गुढ, रहस्यमयी आहे तेवढीच त्यातील भाषा (Languages)/ लिपी (Script)सुद्धा गुढ रहस्यांनी भरलेली आहे.
हजारो वर्षापूर्वी निर्माण केलेली भव्य मंदिरे, त्यामधील कला, नक्षीकाम बघताना अक्षरश: अचंबित होते.
आजही कोणत्याही मोठ्या इंजिनियरला सुद्धा जमणार नाहीत अशी कला, नक्षीकाम केलेली भव्य मंदिरे, वास्तू भारतभूमीवर हजारो वर्षापूर्वीचा इतिहास सांगण्यासाठी अगदी आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. परंतु आधुनिकतेचा खोटा बुरखा घालणारे आपण सर्व लोकं त्याकडे दुर्लक्ष करत आहोत हि भारतीय लोकांची खूप मोठी शोकांतिका आहे.
असो…
प्राचीन वास्तूंसोबतच प्राचीन लिपी (Script)सुद्धा तितकीच विकसित होती ज्याचे आजच्या काळातसुद्धा अभ्यास आणि संशोधन होणे खूप गरजेचे आहे.
प्राचीन सनातन हिंदु संस्कृतीमध्ये अशा अनेक लिपी (Script) आहेत ज्या लुप्त झालेल्या आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
प्राचीन काळातील लिपी (Script)/ भाषा (Languages) ह्यांचा अभ्यास आणि संशोधन झाले तर इतिहासाच्या पानामध्ये दडून गेलेल्या अशा कितीतरी गोष्टी आणि रहस्ये हे अखंड मानव जातीच्या उत्कर्षासाठी फायदेशीर ठरू शकतात.
आज आपण अशाच काही लिपी (Script)च्या बाबतीत थोडक्यात माहीती घेणार आहोत.
प्राचीन सनातन हिंदु ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच परलोकातील दिव्य शक्तींशी संवाद साधना होता आणि परलोकातील दिव्य शक्तींपासून अशा गुढ रहस्यमयी लिपी (Script)/ भाषा (Languages) शिकून घेतल्या होत्या.
आजही अनेक असे पुरातन ग्रंथ आहेत ज्यामध्ये त्या काळातील गुढ रहस्यमयी भाषेमध्ये लिखाण केलेले आहे परंतु ती गुढ रहस्यमयी भाषा (Languages) कुणालाच अवगत नसल्यामुळे खूप मोठे रहस्य उलगडणे राहून गेलेले आहे.
प्राचीन ग्रंथामध्ये आढळणारी मुख्यत्वे लिपी (Script) ही आजच्या लिपी (Script)पेक्षा खूपच वेगळी लिपी (Script)/ भाषा (Languages) आहे.
आजही हिमालयामधील अनेक सिद्ध साधु ध्यानावस्थेमधून किंवा स्वप्नदृष्टांताव्दारे परलोक शक्तींशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा (Languages) अवगत करून गुढ अध्ययन करतात आणि ब्रम्हांडातील रहस्य जाणून घेतात.
आज मी अशाच गुढ रहस्यमयी लिपी (Script)बद्दल माहीती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्राचीन लिपी (Script)मध्ये प्रामुख्याने खालील भाषेचा समावेश होतो.
ब्राम्ही लिपी (Script)/ भाषा (Languages)
सिंधु लिपी (Script)/ भाषा (Languages)
मोडी लिपी (Script)/ भाषा (Languages)
गोंडी लिपी (Script)/ भाषा (Languages)
बर्भर लिपी (Script)/ भाषा (Languages)
खरोष्टी लिपी (Script)/ भाषा (Languages)
आरमाई लिपी (Script)/ भाषा (Languages)
मंदि लिपी (Script)/ भाषा (Languages)
अंध लिपी (Script)/ भाषा (Languages)
पांडू लिपी (Script)/ भाषा (Languages)
चित्र लिपी (Script)/ भाषा (Languages)
ह्यामधील बर्भर नावाची लिपी (Script)/ भाषा (Languages) प्रत्यक्ष आदिगुरू भगवान श्रीदत्तात्रेय महाराज स्वत: बोलतात.
जो व्यक्ती ध्यानावस्थेमध्ये आदीगुरू भगवान श्रीदत्तात्रेय महाराजांशी संवाद साधू शकतो असा साधक बर्भरी भाषा (Languages) उत्तम बोलू शकतो.
कारण श्रीदत्तात्रेय महाराजांच्या मुखातून सिद्ध साधकाशी बर्भरी भाषेतूनच संवाद होतो. ह्या भाषेशिवाय संस्कृत, डामर, शाबर भाषेतूनसुद्धा श्रीदत्तात्रेय महाराज, श्रीनवनाथ आपल्या सिद्ध साधकाशी संवाद साधतात.
वर सांगीतल्याप्रमाणे अनेक लिपी (Script) आणि भाषा (Languages) आजच्या सर्वसामान्य माणसाला अवगत नाहीत. परंतु प्राचीन काळामध्ये हजारो वर्षापूर्वी ह्या भाषा (Languages) अनेकांना अवगत होत्या.
त्याचप्रमाणे आजही अनेक सिद्धपुरूषांना वरील भाषेचे ज्ञान आहे.
वरील लिपी (Script)प्रमाणेच ब्रम्हांडातील परलोक शक्ती सिद्ध साधकाशी संवाद साधण्यासाठी अतिशय गुढ लिपी (Script)/ भाषेचा वापर करत होते व आजही करत असतात. त्या लिपी (Script)/ भाषा (Languages) खालीलप्रमाणे-
अणू लिपी (Script)/ भाषा (Languages)
रेणू लिपी (Script)/ भाषा (Languages)
श्रेषरणू लिपी (Script)/ भाषा (Languages)
चिदाणू लिपी (Script)/ भाषा (Languages)
महाणू लिपी (Script)/ भाषा (Languages)
श्री लिपी (Script)/ भाषा (Languages)
वर लिहलेल्या लिपी (Script)ची नावे वाचून अनेकांना आश्चर्य वाटणे साहजीकच आहे परंतु जे गुढ ध्यानावस्था प्राप्त केलेले साधक असतील किंवा ज्या साधकांना स्वप्नदृष्टांत सिद्धी प्राप्त असेल त्या वाचक व्यक्तींना ह्या लिपी (Script)बद्दल माहीती असणार आहे.
तुमच्या माहीतीसाठी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदायाचे महामेरू संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत जनाबाई अशा;
वारकरी संप्रदायातील अनेक संतांना तसेच अन्य संप्रदायातील सिद्ध महापुरूषांना अणू, रेणू, श्रेषरणू, चिदाणू, महाणू आणि श्री लिपी (Script)/ भाषेचे ज्ञान परलोक शक्तींकडून मिळालेले होते.
अणू, रेणू, श्रेषरणू, चिदाणू आणि महाणू लिपी (Script)/ भाषेला “सुक्ष्म अक्षर म्हणजेच ब्रम्हाक्षर” असे म्हटले जाते. हि लिपी (Script)/ भाषा (Languages) परलोकातील दिव्य शक्तींपासून मानवाला मिळालेले वरदान आहे.
असे अनेक ग्रंथ आहेत की, ग्रंथामधील पानांवर अक्षरेच दिसत नाहीत परंतु काही धातू पदार्थांचा वापर केला किंवा पेटत्या दिव्यावरून पान फिरवले की, त्या ग्रंथामधील कोर्या दिसणार्या पानांवरील अक्षरे उमटू लागतात.
अशा ग्रंथांची निर्मिती प्राचीन काळापासून केली जात होती. पूर्वी गुप्त माहीती लपविण्यासाठी ह्या सुक्ष्म अक्षरांचा किंवा ब्रम्हाक्षरांचा वापर केला जात होता. आजही संशोधक अशा लिपी (Script)चे संशोधन करत आहेत.
त्याचपद्धतीने श्री लिपी (Script)/ भाषा (Languages) हि उच्चकोटीच्या देवतांची लिपी (Script)/भाषा (Languages) म्हणून ओळखली जाते.
श्री लिपी (Script)/भाषा (Languages) आजही अनेक सिद्ध पुरूष जाणतात. आजही अशा गुढ रहस्यमयी भाषेतून परलोकातील दिव्य शक्तींशी संवाद सिद्ध पुरूष ध्यानावस्थेतून किंवा स्वप्नदृष्टांतातून साधत असतात.
श्री लिपी (Script) एखाद्या गुढ चिन्हांसारखी वाटते परंतु हि चिन्हे नसून हि लिपी (Script)/ भाषा (Languages) आहे. ज्याला देवांची लिपी (Script) असे म्हटले जाते.
श्री लिपी (Script)मधील अक्षरांना जर संस्कृतमध्ये अनुवादीत केले तर ह्या अक्षरांपासून दिव्य मंत्र तयार होतो.
ह्या मंत्राचे एका विशिष्ट लयीमध्ये आणि शुद्ध अंत:करणाने एकांतस्थानी पठण केल्यास मंत्राच्या प्रभावामुळे ब्रम्हांडातील एक दिव्य ऊर्जा स्वत:कडे आकर्षित करता येते.
आजसुद्धा पुरातन मंदिरे, स्तंभ, प्राचीन गुहेमध्ये अशी लिपी (Script) कोरलेली दिसून येते. श्री लिपी (Script)चे ज्ञान सिद्ध साधकांशिवाय कुणालाच नाही.
कारण ज्यांना समाधी अवस्था प्राप्त आहे असेच सिद्ध साधक ही भाषा (Languages) वाचू शकतात आणि त्यातून निर्माण होणार्या अर्थाचा उपयोग ब्रम्हाडांतील गुढ रहस्य जाणून घेण्यासाठी करू शकतात.
ह्यामध्ये गुढ मंत्रसुद्धा आहेत जे परलोक शक्तींकडून साधकाला दिले जातात.
प्राचीन सनातन ऋषीमुनी खूप मोठे संशोधक होते ज्यांनी हजारो वर्षांपूर्वीच परग्रहावरील शक्तींशी संवाद केलेला होता. आजही असे सिद्ध पुरूष अशा लिपी (Script)चे ज्ञान परलोक शक्तींकडून शिकून दिव्य शक्तींशी संवाद करतात.
परंतु आजच्या जगात ह्या गोष्टी थोतांड वाटतात त्यामुळे अनेक सिद्ध पुरूष अशा गोष्टींचा उलगडा न करण्यामागेच धन्यता मानतात.
Disclaimer: This article is just for providing knowledge and updates to readers, this content is made through ©Anna®2022, this article has no intention to the heart or promotes any brand/company/startup, this article is only made for knowledge, education, entertainment purposes, and there is no promotion at all. “This blog and I do not claim any right over any of the graphics, or images used in this article.
All rights reserved to the respective copyright owners.” Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
तुकाराम बीजः सदेह वैकुंठगमन करणारे संतश्रेष्ठ…(Opens in a new browser tab)
Relation Between 7 Chakras of Human Body & Sleep(Opens in a new browser tab)
The Mysteries of the ancient symbolism(Opens in a new browser tab)
You must log in to post a comment.