प्राथमिकता – Priority
प्राथमिकता– Priority
©सौ. वैष्णवी व कळसे
Priority म्हणजेच प्राथमिकता… आपल्या जीवनातली अत्यावश्यक गोष्ट म्हणजे आपली Priority… ज्या साठी सर्व काही करतोय तीच आपली प्रायोरिटी…
कुठलेही काम करायच्या आधी आपली Priority लक्षात घेतली पाहिजे… ज्यांच्यासाठी एवढं सगळं करायचं आहे त्यांनाच वेळ देऊ शकलो नाही तर काय उपयोग मोठे मोठे तिर मारल्याचा…?
काहीही नवीन गोष्ट try करायची असेल तर सर्वात आधी आपली priority बघितली पाहिजे कि त्यावर या नवीन प्रयोगाचा दुष्परिणाम होऊ नये… Specially जे काम करतोय ते सोडून दुसऱ्या कुठल्या कामाचं आकर्षण होणं अगदी साहजिक आहे…
त्यातल्यात्यात आपल्या दृष्टीने आपलं काम म्हणजे सर्वात तणावपूर्ण आहे हा प्रत्येकाचा समज…
प्रत्येक काम करणाऱ्याला वाटतं कि त्याला त्याच्या मेहनती च्या तुलनेत यश मिळत नाही… आणि दुसऱ्याला मात्र काहीच कामाचा ताण नाही, ते लोक मस्त enjoy करत फिरतात…
ते म्हणतात न “दुरून डोंगर साजरे…” आपल्या जागेवर राहून दुसऱ्यांच्या कामाला judge करने चुकीचेच…
कुणास ठाऊक आपल्यापेक्षा जास्त कष्ट असतील त्यांना, कदाचित आपल्यापेक्षाही जास्त pressure असेल त्यांना…
आपली एकमेव अडचण असते, आपण सतत आपल्यापेक्षा जो मोठया पदावर आहे त्याच्याकडे बघून comparison करतो, कि त्याला तर काहीच काम नाही आणि एवढ्या सुविधा त्यांना? सर्व त्यांच्या हाताशी..?
आपण एवढं करतो तरी पदरी पडतो तो अपमान,जास्तीचे काम, कष्ट… हातचं सोडून धावत्याच्या मागे पळण्यात काहीही अर्थ नसतो…
कधी आपल्या हाताखाली काम करतात त्यांचा विचार करतो का? त्यांना पगार किती? त्यांच्या कामाची वेळ कशी? त्यांच्या अडचणी काय काय?थोड्याश्या पगारात कसं घर चालवत असतील, एवढ्याश्या पैश्यासाठी किती तास मोजावी लागतात त्यांना…?
मजबुरी मुळे परिवार सुद्धा बाजूला ठेवावा लागतो, बिचारे घरातील सर्वांच्या कदाचित गरजा सुद्धा पूर्ण करू शकत नसतील…
तरीही कधी काम करताना सतत तो हसरा चेहरा, गमतीचा स्वभाव, मस्तीच मूड, चेष्ठा मस्करी करत राहतात… एक दिवस माझ्या office मध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला सहज म्हणून विचारालं त्याला “का रे तुझी परिस्थिती अशी, तरी तू कुठल्या टेन्शन मध्ये दिसत नाहीस?”, तू रोज सायकल ने येतो ऑफिस ला, तुला एखादी गाडी नाहीका असावी वाटत?
तिकडून त्याने हलकासा हसराचेहरा करत उत्तर दिलं, टेन्शन घेतल्याने परिस्थिती हवी तशी होते का हो साहेब? आणि राहिला प्रश्न गाडीचा तर, सायकल मुळे रोज माझा व्यायाम होतो, कुठली चरबी चढत नाही आणि मला कधी सुस्त देखील वाटतं नाही, रोज मस्त माझे आवडीचे गाणे म्हणत, पायडल मारत रमत गमत येतो…
माझ्यातच ताजेतवाणेपणा नसेल तर माझ्या कामात तरी कुठून येईल? त्यामुळे गाडीची मला गरजच वाटत नाही…
माझ्या दिवसाची सुरवातच मी हसत खेळत करतो आणि दिवसभरात जे काही होतं अपमान, मोठ्या साहेब लोकांची किरकिर,हे सर्व जेव्हा dustbin साफ करतो तेव्हा त्यात ओतून देतो..
आणि सकाळी ज्या मूड ने आलो त्याच मूड नें संध्याकाळीघरी जातो.. एवढं सर्व करतो कोणासाठी? फक्त माझ्या घरा साठी… घर माझी प्राथमिकता आहे…
जेव्हा ते मला ऑफिसला कुठल्याही टेन्शन शिवाय पाठवतात, तर जाताना त्या बदल्यात माझ्या कटकटी घेऊन जाऊ का? त्यांची तरी काय चूक असते जी आपली वाट बघत बसले असतात त्या फुटका काच असलेल्या घड्याळीत?
मी हसत गेलो कि घरचेही आनंदी होतात…
काम करायचं म्हटलं कि स्वतःशी एका गोष्टी ची गाठ बांधायला हवी ती म्हणजे हे सर्व आपल्या कामाचा एक भाग आहे जो कधी बाजूला होणार नाही, आणि जर बाजूला होणार नाही तर परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे म्हणजे मनस्ताप होत नाही…
जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्याबद्दल वाईट वाटून, आहे त्याचा पण आनंद गमवायचा का….?
शेवटी काय “वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसीको नही मिलता”….
हे ऐकून तर मला खरंच काय बोलावं सुचेना…
कोणीतरी जोरात कानाखाली मारल्या सारखं वाटत होतं…
मनात त्यावेळस एवढंच आलं कि आपण किती शुल्लक गोष्टीमुळे त्रास करून घेतो…
आपणही असं जगायला शिकलं पाहिजे… आपली प्रायोरिटी घेऊन चाललं पाहिजे…
नाहीतर ते ही राहणार नाही जे आज आपल्याकडे आहे…
कोणामुळे कोणाचं आयुष्य थांबलेलं नसतं आणि ना ही अडलेलं…
एखाद्या ठिकाणी थोडे दिवस जायचं कमी केलं तर त्या ठिकाणी आपल्या नावाचा सुद्धा विसर पडतो…
परिवारात पण असचं असतं भलेली विसरणार नाही, पण आपल्याशिवाय आनंदी राहणं हळूहळू शिकून जातात, जेवायला आपल्यासाठी थांबणारी माणसं जेवण करून मोकळी होतात…
आपल्याशिवाय सगळी कामं नीट पार पाडली जातात, हळूहळू आपली जवाबदारी नाहीशी होते…
एक वेळ अशी येते कि आपल्याला हवं ते यश मिळालं असेल, तिथे यशाचं शिखर तर असेल, पण त्या शिखराचा आनंद घ्यायला परिवार सोबत नसेल…
तेव्हा एवढं मोठं यश गाठून एकटं पडण्यात काय समाधान…
म्हणूनच काहीही करताना Priority कडे बघून काम केलं पाहिजे…
परिवार हीच आपली प्रायोरिटी हे समजलं पाहिजे… काही चुकलं असल्यास माफी असावी.
आवडल्यास नक्की Like आणि Share करा.