वृद्धाश्रम : काळाची गरज की नाईलाज ?
July 5, 2021 | by Varunraj kalse

वृद्धाश्रम : काळाची गरज की नाईलाज ?
©तुषार नातू
‘वृद्धाश्रम ‘ हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात एकदम कणव दाटून येते सोबतच ‘ बिच्चारे ‘ असाही शब्द उमटतो मनात ..
आयुष्यभर संसारासाठी मरमर कष्ट केलेल्या घरातील व्यक्तिला ती व्यक्ती वृद्ध झाल्यावर असे ‘ वृद्धाश्रमात ‘ नेवून टाकणे म्हणजे क्रूरपणा आहे असेही वाटते..
घरातील वृद्धांची सेवा करण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुले कृतघ्न आहेत असा भाव मनात येतो..
खरोखर वृद्धाश्रम इतका वाईट असतो का?
तेथे जावे लागणे म्हणजे त्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडणे असते का…?
मूले इतकी कृतघ्न असतात का ? सर्वच वृद्ध दयनीय अवस्थेत असतात का…?
या प्रश्नांच्या विचार न करता ‘ वृद्धाश्रम ‘ म्हणजे जणू एखादी शिक्षाच असाच सर्वसामान्यांचा दृष्टीकोन तयार झालेला आहे ..या बाबत सर्वार्थाने विचार होणे गरजचे आहे असे वाटते…
आईवडील आता या वयात परदेशी कायमचे राहायला जाण्यास तयार नाहीत ..त्यांची नाळ इथे भारतातच आहे ..त्यांना सक्तीने परदेशात नेवू शकत नाही … अशावेळी काय करावे ?
मग कोणीतरी लक्ष ठेवावे ही इच्छा ..
मनाविरुद्ध झाले की रुसून बसणे..
अशा वेळी जर घरतील वृद्धांनी स्वतःहून उर्वरित जीवन परमेश्वराच्या चिंतनात व्यतीत करायचे ठरवून जर वृद्धाश्रमात जावून राहायचे ठरवले त्यात गैर काय ? काही काही घरामंधून मी घारतील वृद्धांची अतिशय वाईट परिस्थिती पहिली आहे…
१ ) घरात वृद्धाना सन्मानाने वागवले जात नाही… त्यांना झेपत नसली तरी घरातील लहान मुल सांभाळायची… घरातील किरकोळ कामे करण्याची… घर सांभाळण्याची… जवाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते… अनेकदा बोलणी खावी लागतात…
सून फटकळ असेल तर वेळोवेळी पाणउतारा असतोच… त्यांच्या जेवणाच्या आवडीनिवडी जपल्या जात नाहीत… जर वृद्धाना पेन्शन नसेल तर त्यांना प्रत्येक वेळी मुलांपुढे हात पसरावा लागतो…
त्याच्या जेवणाच्या वेळा सांभाळणे अशीही कामे घरातील वृद्धांकडे त्यांच्या क्षमता लक्षात न घेता सोपवली जातात… म्हणजे कधी कधी घरातील वृद्धांची अवस्था हक्काच्या नोकरासारखी असते…
जरी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे हा क्रूरपणा अथवा कृतघ्न पण वाटत असला तरी वरील मुद्द्यांवर विचार केला तर अनेकदा वृद्धाना जास्त सुरक्षित असे ठिकाण वृद्धाश्रम आहे असे वाटू शकते…
मी वृद्धाश्रमाचे समर्थन करत नाहीय तर फक्त दुसरी बाजू मांडतो आहे…
सरकार वृद्धाश्रमाना अनुदान देते मात्र या क्षेत्रात देखील पैसे कमावण्याच्या उद्देशाने अनेक लोक सामील झाले आहेत… त्यामुळे सरकारी अनुदान असलेले वृद्धाश्रम कधी कधी दयनीय अवस्थेत असतात…
जास्तीत जास्त समाजसेवी संस्थांनी अन शासनाने देखील वृद्धाश्रम हा केविलवाणा न वाटता जास्त सुखदायी मनोरंजनात्मक असावा असा दृष्टीकोन ठेवला तर उलट वृद्धांना उर्वरित आयुष्य आनंदाने जगता येईल… वृद्धाश्रम हा ‘ आनंदाश्रम ‘ होईल…
तरीही हे सांगेनच की घरतील वृद्धांची काळजी घ्या… आपणही कधीतरी म्हातारे होणार आहोत हे विसरू नका… तसेच वृद्धांनी आता घरात लक्ष घालणे कमी करा…
©तुषार नातू,
निर्धार व्यसनमुक्ती केंद्र,
डाॅ. जी. डी .पोळ फाऊंडेशन , येरळा आयुर्वेदिक हाॅस्पिटल,
४ था मजला, खारघर, सेक्टर ४ , नवी मुंबई ..
RELATED POSTS
View all
