त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स – Tip’s to Handle Annoying People 100% Result
त्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स 100% result
Tip’s to Handle Annoying People 100% Result
ज्यामुळे आयुष्यातले ताण कमी करू शकतो
तसा तर हा विषय न संपणाराच आहे सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी
अशा माणसांशी कसं वागावं हेच कळत नाही बरेचदा…
खरंतर एक गोष्ट आपल्या मनात clear केली पाहिजे आपण ती म्हणजे, avoid करणं आणि ignore करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत…. या दोन शब्दामध्ये आपण बरेचदा गोंधळतो, confused होतो…. एखाद्या व्यक्ती ला किंवा एखाद्या situation ला समोर न जाणे म्हणजे avoid करने….
आणि
एखादी परिस्थिती बघून पण न बघितल्या सारखी करणं किंवा लगेच रिऍक्ट न करणं म्हणजे इग्नोर करणं…
ही जी त्रासदायक माणसं असतात यांना हॅन्डल करणं, साध्या सरळ माणसाला थोडंसं कठीणच जातं…
कारण साधा माणूस बिचारा सहज म्हणून बोलून जातो, त्याला जास्त जमत नाही ठरवून बोलायला…
आणि तीच गोष्ट त्याला महागात पडते…
अशा लोकांची वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो….
त्यांच्या वागण्यातल्या काही common गोष्टी ज्या मी स्वतः अनुभवल्या त्या अशा की
- ही माणसं आपल्याशी गोडच बोलतात.. आणि गोड बोलूनच आपल्याला आणखी कसा त्रास होईल याची पुरेपूर काळजी घेतात…
- आपल्याबद्दल कोण काय बोलत होतं हे यांना सांगत यायला फार मजा वाटते कदाचित त्यांचा असा गैरसमज असेल की आपण त्यांना आपला शुभ चिंतक मानू….
- मग कोणी आपल्याबद्दल positive बोललं असेल तरीही त्याला नेगेटिव्ह करून सांगणे, आपल्या मनात लोकांविषयी राग भरणे, इथे समाधान नाही तर आपल्याच माणसांनविषयी राग भरणे…
- आपल्या मनाचे खच्ची करण करणे…
- ते आपल्याला काहीही बोलू शकतात पण एक शब्द चुकीचा आपल्याकडून निघू दे मग आपलं काही खरं नाही… अशा प्रकारची थोडी फार वागण्याची पद्धत….
अशा वेळेस आपण काय करू शकतो ते बघूया
- सर्वप्रथम यांना टाळु नका, टाळून किती टाळणार? कधी ना कधी समोर जावेच लागेल, त्यापेक्षा त्यांना face करायला शिकावे.
- ही माणसं जे काही सांगणार आहे ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की 100% हा आपल्याला तणाव येईल असच बोलणार किंवा सांगणार आहे…
- त्यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतः ला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवाव की वाटलंच होतं मला हा असच काही बोलेल..
- तो स्वतः काहीही सांगू देत किंवा विचारू देत, आपण मात्र यांच्याशी “one word communication”ठेवायचं.. जसं की हो, बरोबर आहे, अच्छा, चालेल, बर, ठीक आहे अशाप्रकारे… याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल? थकल्या वर बसेल शांत
- तो जे काही सांगतोय तिथे curiosity दाखवू नये, आपण ऐकण्यात जास्त interest नाही दाखवला तर ते ऑटोमॅटिक कमी होतं…
- स्वतःहून कुठलीही गोष्ट त्याच्याशी share करू नये, आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल…
- आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्या जवळ सांगू नये, करण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं यांना….
- एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल ही काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायचा टॉपिक कमी होतो….
- यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नये, त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय…
- हे त्यांना कुठे माहिती की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाही…
- ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्या सारखं दाखवावं, मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीच टेन्शन आलं असेल तरीही…
- कुठल्या अडचणीत असलो तरीही त्यांच्या समोर सर्व ok दाखवावं..
- त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत मग तर बस “लोहा गरम है, हथोडा मार दे”होतं
- या लोकांशी आपला आनंद,यश सुद्धा share करू नये, असं तोंडावर तर अभिनंदन करतील.
- कसं या आनंदाला विरजण लावायचं याची तयारी करतील….
- ही माणसं image conscious असतात, बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी image घेऊन फिरतात…
- तेव्हा चार लोकांमध्ये तर मुद्दामून चांगलंच म्हणावं जरीही आवडत नसेल, म्हणजे त्याला आपल्याबद्दल वाईट बोलत जायला ठिकाण कमी उरतात…
- सर्वात महत्वाचे म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नये.. म्हणजे उगीचच त्याला tolerate करायची गरज नाही….
- ही लोकं ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की any how आपल्याला मनातून अस्थिर करायच आहे, त्यावेळस त्याच्या गोष्टी ऐकण्या पेक्षाही महत्वाचे काम आहेत ते दाखवले पाहिजे….
- ही माणसं समोर आल्यावर डोक्याचं आणि मानाचं दार लावून एक dustbin ओपन करून ठेवावा.
- जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात, मनात न जाता या डस्टबिन मध्ये जाईल… हा माझा एक दृष्टीकोन आहे…
काही चुकलं असल्यास माफी असावी
मॅडम आपला 16 कलमी कार्यक्रम अतिशय सुंदर यामुळे माणसाचे जीवनातील ताण तणाव नक्कीच कमी होतील आपण या वरती एक लेक्चर तयार करा खूप खूप शुभेच्छा