
एक सवय-न ऐकून घेण्याची
© सौ.वैष्णवी वरुणराज कळसे
प्रत्येकाला काही ना काही सवयी अंग वळणी पडल्या असतातच, कोणाला भरपूर बोलायची सवय, कोणाला ऐकून घ्यायची सवय, कोणाला गप्पा मारायची सवय, कोणाला सोबत जो कोणी असेल त्याला हसवायची सवय, कोणाला सर्वांमध्ये असून पण चर्चे चा भाग न बनण्याची सवय, तर कोणाला सतत चर्चा आणखी रंगवण्याची सवय…
या सर्व सवयी मध्ये एक सवय सर्वात हानिकारक… ती म्हणजे कोणाचे बोलने मध्येच मोडण्याची सवय….
कोणी आपल्याशी बोलत असताना त्याला मध्येच interrupt करायची सवय…. समोरच्याचे बोलने व्हायच्या आधीच विषय बदलावायची सवय…
भलेही आपलं intention तसं नसेलही, पण त्यामुळे समोरच्याला त्याचा अपमान केल्यासारखं वाटतं…
समोरचा काय बोलतोय हे ऐकून न घेता मध्येच आपलं मत मांडणं चुकीचच…
जो विषय सुरु असेल त्याबद्दल बोलायचं असल्यावर, “sorry to interruption, पण मला असा म्हणायचं होतं” असं बोलू शकतो किंवा “हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला वाटतं…” असं देखील बोलता येत…
जेणेकरून समोरच्याला आपण disrespect करतोय असं वाटणार नाही…..
अशी पद्धत वापरल्याने आपल्याबद्दल गैरसमज देखील होणार नाही…
कधी कधी आपल्या न ऐकून घ्यायच्या सवयी मुळे आपण घमंडी किंवा उद्धट आहोत असा गैरसमज होतो.
व तिथून पुढे तो आपल्याशी कुठल्याही विषयावर बोलायचं, किंवा काही discuss करायचं टाळतो…..
नेहमी उद्देश महत्वाचा नसतो, कधी कधी वागणूक सुद्धा खूप महत्वाची असते…
घर असो वा कामाचे ठिकाण…. एका healthy conversation साठी हे अत्यंत महत्वाचे आहे…
आपण बोलत असताना आपलं बोलणं पूर्ण होऊ दिलं नाही तर आपल्याला सुद्धा आवडणार नाही…
नक्कीच वाटेल की माझं ऐकून न घेता त्यावर राय बनवली तसंच समोरच्यालाही वाटतं….
एका healthy discussion साठी immediately react करण्या पेक्षा आधी पूर्ण ऐकून, समजून बोलणं कधीही चांगलं…..
अशाने आपल्या बोलण्यालाही महत्व असतं आणि आपल्या suggestion ला सुद्धा….जी वागणूक आपल्याकडून समोरच्याला दिल्या जाते, तीच फिरून आपल्याला मिळते…..
काही चुकलं असेल तर माफी असावी.
© सौ.वैष्णवी वरुणराज कळसे.
RELATED POSTS
View all
