Skip to content
Skip to content
  • Home
  • Blog
  • Brain Storming
  • Career Opportunities
  • Contributers
  • Education
  • Health
  • Mental Health
  • Post’s
  • Public
  • Something Different
  • Technology
  • About
  • About Us
    • SiteMap
  • All Articles
  • Contact
  • Contact Us
  • Elearning
  • Home
  • Online Code Compiler
  • Our Team
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Reality of Competitive exams
  • Services
  • SiteMap
  • Terms & Conditions
  • Test Page
  • WordPress Practice without buying Domain & Hosting
भाड्याची सायकल

भाड्याची सायकल…

/ Something Different / By Varunraj kalse

भाड्याची सायकल…!

 

१९९५ चा काळ होता तो…


त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो…


बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कॅरेज नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 😀
भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं.
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 📝
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते…


👉🏻 भाड्याचे नियम कडक असायचे.
● जसे पंक्चर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी…
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 🤠
पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा ⏱ म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची… 💫


तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं… 🤩
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप श्रीमंत असायचे…


एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली , 🚲
पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं
यातचं अर्धी एनर्जी वाया जायची
आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक…
खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील…
तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो… 👍🏻


पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं…
असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो.
नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 😀
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,
नंतर सिंगल, डबल, हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो… 😇


खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 😊
पण आता ते दिवस नाही…
तो आनंद नाही….


आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकलची किंमत अन् मजा यांची सर
आता असलेल्या चार चाकी वा दुचाकी ला पण येणार नाही… 🏍


गेले ते दिवस…
राहिल्या त्या भाड्याची सायकल च्या आठवणी…… 
असा काळ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उपभोगला असेल .🙏🏻




आवडलं तर Like आणि Share करा

©लेखक अनामिक

सोर्स: WhatsApp मेसेज

फोटो क्रेडिट: google images

← Previous Post
Next Post →

Related Posts

एलईडी ब्लब- खरचं वीजेचं बिल कमी करतो का

एलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का ?

3 Comments / Something Different / By Varunraj kalse

#रोमँटिक_पणाची_ऐसी_की_तैशी….

Leave a Comment / Mental Health, Something Different / By Varunraj kalse
Log in
April 2026
MTWTFSS
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930 
« Mar    

Blog Digital Marketing DRDO education Google Harshada Harshada Ghate itworkss itworkss.in itworksseducation.com itworkss india itworkssindia.com life marathi Mrs. Vaishnavi V. Kalse Nandini Nitesh Rajapurkar Nandini Rajapurkar Niwruti Gajbhare psychology Social Media Team it-workss Technology vaishnavi kalse vaishnavi varunraj kalse varun kalse Varunraj kalse www.it-workss.in www.itworkss.in www.itworkssindia.com आवडल्यास like आणि share करा. काशिनाथ देवधर टीम नेटभेट तुकाराम गाथा प्रथम वाडकर प्रेम जैस्वाल मराठीतुनच शिकुन - प्रगती करू भर भरून रवी निंबाळकर लेख आवडला तर जास्तीत जास्त Share करा वैष्णवी कळसे संत तुकाराम संत तुकाराम महाराज सलिल सुधाकर चौधरी सौ. वैष्णवी कळसे सौ.वैष्णवी व कळसे स्वातंत्राचा अमृत महोत्सव

Copyright © 2026 | Powered by [itworkssindia]