Itworkss

Tata Neu : डिजिटल पेमेंट क्षेत्रात स्पर्धा वाढणार; टाटाने सुरु केले नवीन अॅप

April 11, 2022 | by Varunraj kalse

या डिजिटल पेमेंटच्या UPI जगतात आता लवकरच सर्वांसाठी स्पर्धा तीव्र शक्यता वर्तवली जात आहे. कारण मीठापासून ते स्टील उत्पादकापर्यंतचा आवाका असलेला अवाढव्य असा टाटा उद्योग समूह आता डिजिटल पेमेंटच्या UPI जगात पाऊल ठेवतोय. टाटाने युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय (UPI) पेमेंट अ‍ॅप Tata Neu लॉन्च केलं आहे.

टाटा समूह देशात स्वतःची युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI वर आधारित डिजिटल पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी मार्च महिन्यात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे NPCI अर्ज केला होता. टाटा समूहाने थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करण्यासाठी एनपीसीआयकडे अर्ज केला होता.

हे अ‍ॅप वापरकर्त्यांना गुगलप्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये सर्व डिजिटल सेवा जशा की Bigbasket, 1MG, Croma, Tata Cliq आणि Tata Group च्या फ्लाइट बुकिंग सेवा एकाच अॅपमध्ये उपलब्ध करुन देत आहे. अत्याधुनिक डिजिटल माध्यमात सगळ्या डिजिटल सेवांची गरज या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

RELATED POSTS

View all

view all