My title My title
Brain Storming

Overconfidence is Always Harmful

Overconfidence is Always Harmful



©मिलिंद जोशी



असे म्हणतात की पट्टीच्या पोहोणाऱ्याला सगळ्यात जास्त भीती पाण्यापासून असते.

कारण जी व्यक्ती ज्या गोष्टीतील माहितगार असते, त्याबाबत सरावाने म्हणा किंवा अति आत्मविश्वासाने थोडी गाफील बनते आणि तो एक क्षण जन्माची अद्दल घडवून जातो.

दोनच दिवसांपूर्वी मी या गोष्टीचा अनुभव घेतला.

मी कायम सगळ्यांना सांगत असतो, नेटवरून कोणतेही गेम डाउनलोड करून घेऊ नका. कायम अपडेटेड Anti-Virus software वापरा.

कोणत्याही प्रलोभनाच्या लिंकवर क्लिक करू नका. त्यावर मी’ काही पोस्टही लिहिल्या आहेत, पण मी तर आता कोरडा पाषाण ठरलेलोच आहे. मग तसेच वागायला हवे ना मी?

परवा माझ्या एका मित्राचा फोन आला.

“मिलिंद, तुझ्याकडे कॉम्प्युटर गेम आहेत का कोणते?”

“नाही रे. हल्ली मी फारसे गेम खेळत नाही.”

“अरे पण आधी होते ना तुझ्याकडे.”

“होय, ते 98 किंवा XP वर चालणारे आहेत. आताच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालत नाहीत ते.”

यार, मला ते काही सांगू नको. दोन दिवसांपासून माझं पोरगं माझ्या डोक्यावर बसलंय. कॉम्प्युटर गेम घेवून द्या म्हणून. एखादा गेम डाऊनलोड करून दे ना मला.

मी केला असता पण व्हायरस आला तर म्हणून भीती वाटते. तू त्यातला जाणकार आहेस. त्याने गळ घातली.

“चल ठीके… आज रात्री एखादा गेम डाउनलोड करतो आणि उद्या तुला देतो.” मी सांगितले आणि फोन ठेवला.

रात्री एक गेम डाउनलोड केला. व्यवस्थित चालतो की नाही बघण्यासाठी इंस्टॉल करायला घेतला. माझ्या Anti-Virus software ने त्यात व्हायरस असल्याचे दाखवले.

मनात थोडी धाकधूक झाली. मनात विचार आला, आपण इतके व्हायरस बघितले आहेत. जास्तीत जास्त काय होईल.

Laptop क्लीन करायला एक दिवस जाईल ना? जाऊ द्या गेला तर. लगेच फाईल रन करायला परवानगी दिली आणि गेमचे इंस्टॉलेशन बंद पडले. म्हणून कॉम्प्युटर बंद केला आणि झोपून घेतले.

दुसऱ्या दिवशी कॉम्प्युटर चालू केला तर तो खूपच स्लो झाला होता. एका तासानंतर माझे २ GB नेट पूर्ण संपले होते.

शेवटी Laptop मध्ये चालू असलेल्या servises चेक केल्या आणि लक्षात आले, B933.exe नावाची फाईल रन होत होती.

ती डिलीट करण्याचा प्रयत्न केला पण ती काही केल्या बंद होईना. शेवटी laptop बंद करून तो सेफ मोडला चालू केला.

Auto-Start मधील त्या फाईलची सर्व्हिस Disable केली. मग ती फाईल कुठे आहे ते शोधले.

User मधील AppData नावाच्या फोल्डरमध्ये तीन डिरेक्टरी दिसल्या.

(AppData ही डिरेक्टरी Hide असते) त्या तीनही डिरेक्टरी मध्ये ही फाईल होती. ती डिलीट केली. मग Anti-Virus आणि Anti-Spy software रन केले.

एकही व्हायरस दिसला नाही. मनात सुखावलो. नंतर Client ने पाठवलेली वर्ड फाईल ओपन करण्याचा प्रयत्न केला तर ती काही केल्या ओपन होईना.

म्हणून मग त्याच्या रूट डिरेक्टरीमध्ये गेलो आणि चमकलोच. सगळ्या फाईलला .EFDC extension आले होते.

त्यासोबत प्रत्येक डिरेक्टरी मध्ये एक _readme.txt नावाची फाईल होती आणि त्यात संदेश होता. घाबरू नका.

तुमचा सगळा data सेफ आहे. तो फक्त encrypt केला गेला आहे. तो परत मिळविण्यासाठी एक decrypt software वापरावे लागेल.

त्याची किंमत आहे फक्त ९८०/- डॉलर. ( जवळपास ७२,०००/- रुपये )

नेटवर याबद्दल माहिती मिळवली. यालाच Ransomware Attack असे म्हणतात. हा दोन प्रकारे केला जातो. एक ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन.

Offline Attack असेल तर Data काही प्रमाणात मिळू शकतो. पण माझ्या laptop वरील फाईल ऑनलाईन पद्धतीने encrypt केल्या होत्या.

त्या परत मिळविण्यासाठी माझ्याकडे फक्त ransom देणे हा एकच पर्याय उपलब्ध होता. कारण प्रत्येकाचा personal ID वेगवेगळा असतो.

आणि त्याची key देखील वेगवेगळी असते. आणि पैसे दिल्यानंतरही ते decrypt program आपल्याला देतीलच ही खात्री नसते.

हा Attack माझ्या F आणि G drive वर आला होता. त्यावर असलेल्या सगळ्या फाईल encrypt झाल्या होत्या. त्या परत मिळणे अशक्य होते.

देवाची कृपा म्हणून हे माझ्या लवकर लक्षात आले आणि C drive वाचला. माझ्या clientची सगळी कामे तिथे असल्यामुळे ती वाचली.

पण सगळे फोटो, मी केलेले लिखाण, सगळी गाणी, client ने पाठविलेला सगळा data, EBooks, Study Material असा जवळपास २५० GB चा data कायमस्वरूपी गेला.

त्या शहाण्यांनी माझेच नेट वापरून मलाच चंदन लावले… हेहेहे…

एक मात्र खरे, माझा अतिशहाणपणा मला कायमस्वरूपी अद्दल घडवून गेला. काही फोटो मला मकरंदकडे मिळतील, माझे लेख फेसबुकवरून डाऊनलोड करून घेता येतील.

EBook आणि Study Material परत जमा करता येईल, Client कडून हवा असलेला data परत मागवता येईल, पण जे गेले ते गेलेच ना?

Ransomware एकदा आपल्या laptop मध्ये शिरल्यावर कोणताही Anti-Virus त्याला खचितच पकडू शकतो.

आणि ज्यावेळी पकडतो तो पर्यंत झालेले नुकसान कधीही भरून न येणारे असते. हे मी आता अनुभवाने सांगू शकतो.

खरे तर हे लिहिणार नव्हतो. काय कायम आपण किती बावळट आहोत हे दाखवायचे?

पण नंतर विचार केला, मला लागलेली ठेच पाहून एखादी व्यक्ती जरी शहाणी झाली तरी चांगलेच आहे ना?

बाकी लोकांना आपल्याबद्दल काय वाटते हा मात्र त्यांचा प्रश्न आहे.



आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स संपूर्ण मराठी मधुन फक्त ४९९ रुपयांत, २० दिवसांत.

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button