My title My title
Post's

Security Alert : ‘या’ अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा ‘हे’ काम

Security Alert

‘या’ अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा,

सुरक्षित राहण्यासाठी करा ‘हे’ काम
Digital Ritesh

भारतातच्या लोकसंख्येचा खूप मोठा भाग Android smartphone वापरतो. आपला हाच smartphone, online भाषेत vulnerable झालाय असं जर मी म्हणालो तर तुम्हाला भीती वाटणं सहाजिक आहे.. तूर्तास गोष्ट च अशी आहे.. पूर्ण माहिती साठी लेख पूर्ण आणि व्यवस्थित वाचा..

Android Security Alert : Android युजर्स धोक्यात आहेत. यासंदर्भात आयटी मंत्रालयाच्या (IT Ministry) अंतर्गत असलेल्या Indian Computer Emergency Response Team (CERT) ने Android ऑपरेटिंग सिस्टम युजर्ससाठी धोक्याचा इशारा (Security Alert) दिला आहे.

हा धोक्याचा इशारा मुख्यतः Android 10, Android 11, Android 12 आणि Android 12L या युजर्ससाठी आहे.  आयटी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक असुरक्षित घटकांची नोंद झाली आहे. या आढळलेल्या त्रुटींचा फायदा घेऊन Hackers तुमचा  smartphone पूर्णपणे Hack करू शकतात आणि तुमची संवेदनशील आणि महत्वाची  माहिती किंवा सेवा चोरू शकतात.

आयटी तज्ज्ञांनी सांगितले आहे की, Android मध्ये (Android OS) फ्रेमवर्क कंपोनंट, मीडिया फ्रेमवर्क कंपोनंट, सिस्टम कंपोनंट, कर्नल LTS, MediaTek कंपोनंट, Qualcomm कंपोनंट आणि Qualcomm क्लोज सोर्स कंपोनंटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. Hackers या त्रुटींचा फायदा घेऊ शकतात. याद्वारे तुमची संवेदनशील आणि महत्वाची  माहिती उघड करू शकतात.’

सुरक्षित राहण्यासाठी ‘हे’ काम लवकर करा

तुमचा अँड्राईड फोनमधील तुमची माहिती सुरक्षित राहण्यासाठी CERT-in तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध असलेल्या अँड्राईडचं (Android OS0) नवीन व्हर्जन इंस्टॉल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तुम्ही सेटिंग्ज App वर जाऊन तुमच्या स्मार्टफोनसाठी नवीनतम अँड्राईड व्हर्जन तपासू शकता.

काय आहे DoS अटॅक?
DoS (Denial of Service) हल्ला हा एक सायबर हल्ला आहे. अँड्रॉईडमधील छोट्या मोठ्या त्रुटीचा फायदा घेऊन (loopholes चा फायदा घेऊन) हॅकर्स तुमचा फोन Hack करु शकतात. हॅकर्सने जर तुमचा स्मार्टफोन DoS हल्ल्यात हॅक केला तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन hang झाल्याने वापरता ही येणार नाही. यावेळी हॅकर्स तुमची संवेदनशील माहिती चोरून तुमचे नुकसान करु शकतात.

या साठी तुमचा smartphone आणि त्यांत असलेले apps वेळोवेळी अपडेट करण आणि असणं खूप जास्त महत्वाच असत…

आजच्या साठी इतकंच… लवकरच भेटू नवीन विषयासह…

Best Antivirus for Mobile and PC

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button