Itworkss

Whatsapp Telegram Notification Settings

April 5, 2022 | by Varunraj kalse

सध्या अनेक जण वेगवेगळ्या Social Media प्लॅटफोर्मचा वापर करतात. सोशल मीडियावर आपण वेगवेगळ्या पोस्ट देखील शेअर करतो.

सध्या Whatsapp , Facebook Messanger आणि Telegram या सोशल मीडिया प्लॅटफोर्मचा वापर लोकांसोबत संपर्क साधण्यासाठी देखील अनेक जण करतात.

अनेक वेळा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये लोक तुम्हाला Add  करतात. या ग्रुपमधील मेंबर्स  अनेक फॉरवर्ड मेसेज सेंड करत असतात. हे मेसेज आल्यानं तुमच्या मोबाईलची मेमरी जास्त होऊ शकते. 

मोबाईलमध्ये येणाऱ्या Whatsapp आणि Telegram च्या मेसेजचे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी सोप्या सेटिंगचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे सतत येणारे नोटिफिकेशन बंद होतील. 

Whatsapp Chat बंद करण्याची सोपी पद्धत @
Whatsapp सुरू करून त्यामधील चॅट्स ओपन करा. 

एखाद्या ग्रुपमधील येणाऱ्या मेसेजचे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी त्या ग्रुपच्या चॅटवर लाँग प्रेस करा. 
त्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील त्या ऑप्शनमधील म्यूट हे आयकॉन सिलेक्ट करा. 

म्यूट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर एक नोटिफिकेशन येईल. त्यामध्ये तुम्ही या चॅटमधील मेसेजचे नोटिफिकेशन किती वेळ म्यूट करायचे आहे ते सिलेक्ट करू शकता. 

Telegram वरील Chat म्यूट करण्याची सोपी पद्धत @
Telegram ओपन करा.
ज्या ग्रुपचे मेसेज म्यूट करायचे आहे त्या ग्रुपच्या चॅटवर लाँग प्रेस करा. 

त्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसेल. यावर हे चॅट किती  वेळासाठी म्यूट करायचे आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर “Disable” हा Option सिलेक्ट करा. 

RELATED POSTS

View all

view all