My title My title
Brain StormingSomething Different

Window Shopping – In Marathi

Window Shopping



©Prem Jaiswal



‘ओहो, व्हॉट हैपन बेटा ?’
‘आय एम गेटिंग बॊअर्ड, मम्मा’
‘व्हाय डोन्ट यु गो फॉर Shopping? बेटा, थोडा मन बहल जायेगा!’



एखाद्या हिंदी मालिकेमध्ये जेंव्हा असे संवाद घडत असतात तेंव्हा आपल्यासारख्या मध्यमवर्गीय विचारधारा असलेल्या लोकांच्या मनात असा प्रश्न पडणे साहजिक आहे.

कि बोअर होनं आणि Shopping ला जानं याचा काय संबंध?



मुळात Shopping आता दोन प्रकारच झालं आहे. पहिला प्रकार हा निवळ Shopping. हा एक सरळ सरळ शुद्ध व्यवहाराचा भाग आहे.


ज्यामध्ये आपण एखाद दुकान किंवा मॉलमध्ये जाऊन, पाहिजे त्या वस्तू निरखून, पारखून, भावठाव आणि घासाघीस करून आपण विकत घेत असतो.


हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी त्या वस्तूची आपल्याला गरज आणि खरेदीसाठी खिशात पैसा, मग तो कोणत्याही स्वरूपात का असेना आवश्यक असतो.


दुसरा प्रकार म्हणजे Window Shopping. ही बिनपैशाची Shopping. यासाठी आपल्या खिशात खडकू नसला तरी हरकत नाही.

पण अमाप वेळ आणि वस्तू न्याहळण्याची प्रबळ इच्छा हवी. भावठाव करून टाईमपास करणे.

ट्रेंड-फॅशनची माहिती करून निखळ मनोरंजनासाठीसुद्धा Window Shoppers याचा उपयोग करत असतात.



भारतात मॉल संस्कृती वाढल्यापासून हा दुसरा प्रकार म्हणजे Window Shopping प्रचंड वाढला. चकाचक मॉल मध्ये बिनधोक शिरायचं. एका शोरुममधून दुसऱ्या.


मग तिसऱ्या अस करत करत वेळ घालवायचा. हल्ली मॉल हे बहुमजली, मग एस्केलेटरवरून खालवर फिरायच, मध्येच थोड्या वस्तूचे भाव, ऑफर माहित करून थोडे फूडकोर्टमध्ये खाऊन-पिऊन परत!


आता प्रत्येक शहरात मॉल संस्कृती रुजू झाल्यामुळे सगळीकडे हा प्रकार बघायला मिळतो. वरील संवादातील आईचा आपल्या बेट्यास Shopping पाठवण्याचा उद्देश हाच.

कि तिचा लाडला Shopping जाईल, मॉलमध्ये काही वस्तू खरेदी करून किंवा न जमल्यास विंडो शॉपिंग करून तो परत येईल. मॉलमध्ये त्याच मनोरंजन होऊन त्याच मन रमेल.


Window Shopping हि संकल्पना फार जुनी नाही. सतराव्या शतकापूर्वी जगात दोनच वर्ग होते, एक गडगंज धनसंपती असलेला अप्पर क्लास आणि दुसरा तळागाळातील गरीब लोवरक्लास.


सधन अप्परक्लास हा सरळ सरळ पाहिजे त्या वस्तू खरेदी करून उपभोग घ्यायचा.


तर गरीब लोवरक्लासच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाच पुऱ्या होत नसल्यामुळे चैनीच्या वस्तू खरेदीचा प्रश्नच उदभवत नव्हता.


एव्हढच नाही तर सतराव्या शतकापूर्वी शोरूम, मॉल हा प्रकार नव्हताच. रस्त्याच्या कडेला एक छोटस दुकान आणि त्याला समोरून पत्र्याच्या दोन झडपा असतं.


दोन झडपापैकी एक भाग वर उचलून, हुक लावून तो ऊन, पावसापासून आडोसा म्हंणून वापरल्या जायचा आणि खालच्या भागावर दुकानाच्या नावाचा बोर्ड असायचा.


आजही गाव-तालुक्याच्या ठिकाणी बसस्टँडजवळ अशी दुकाने हमखास दिसायला मिळतील. दुकान एव्हडया लहान असायच्या कि वस्तू घेणाऱ्या ग्राहकाला मुश्किलीने तिथे उभे राहता यायचे.


तसेच पुरेसा प्रकाश नसल्यामुळे आपण घेत असलेल्या मालाची गुणवत्ता कशी हे बघायची मुभा नसायची. कित्येक वस्तूचा दर्जा हा ती वस्तू विकत घेऊन वापरल्यानंतरच कळायचा.


सतराव्या किंवा अठराव्या शतकात जेंव्हा युरोप खंडात मध्यमवर्गाची संख्या वाढली तेंव्हा हे चित्र पालटले.


वाढत्या मध्यमवर्गीय संख्येमुळे लोकांचे जीवनमान उंचावून चैनीच्या वस्तूची मागणी वाढली. मग चैनीच्या वस्तू, कपडे घेणे का होत नाही.


पण हाताने स्पर्श करून, एकदा का होईना नेसून आनंद घ्यायचे प्रकार वाढले. अशा प्रकारे Shopping न करताही आनंद लुटण्याच्या Window Shopping चा जन्म झाला.


असा Window Shopping करणारा मध्यमवर्ग वाढल्यामुळे Window Shopper हा प्रकार पुढे आला.


हळूहळू चैनीच्या वस्तू खरेदी करणे मध्यमवर्गाच्या आवाक्यात येऊ लागल्या तशी खरेदीदाराच्या संख्येमध्ये वाढ झाली.


वस्तू खरेदी करणे हि एक व्यवहाराची बाब न रहाता एक मनोरंजन आणि वेळ घालवण्याचा भाग बनला.


मध्यमवर्गाची संख्या वाढल्यामुळे साधारण अठराव्या शतकापासून युरोप आणि प्रदेशात चकाकनारे शोरूम आणि त्याला लागूनच Window Shoppers साठी एक सुशोभित काचेची एक विंडो असे शोरूम उदयास आले.


या विंडोमध्ये ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी वस्तू ठेवणे सोपे झाले.

सध्याचा Fashion Trend काय, नवीन Fashion कोणती, चालू किंमत आणि त्यावर Discount किती हे दाखवण्यासाठी त्या विंडोचा उपयोग करण्यात आला.

मग शोरूममध्ये न जाता त्या विंडोमध्ये ठेवलेल्या वस्तूवरून आतील कपडे कसे असतील, दर्जा कसा असेल, किंमत-सूट किती आणि इतर बऱ्याच गोष्टीचा शॉपरला अंदाज यायचा.

विंडोच्या सुविधेमुळे Window Shopping च्या संख्येत खुप मोठी वाढ झाली.



पुढे रस्त्यावर वाढती गर्दी, गोंधळ, महिलांची सुरक्षितता आणि वाहनतळाची समस्या या एकंदरीत समस्यपासून मुक्ती मिळून लोकांना खरेदीचा मनसोक्त आनंद घेता यावा.


म्हणून वर्दळीच्या रस्त्यापासून दूर असे मॉल हि संकल्पना रुजू झाली. जगात पहिला मॉल पॅरिस या देशात सुरु झाला.


मनोरंजन, आनंद आणि सर्वच सुखचैनीच्या वस्तू यासह कॉफीशॉप, सलोन, गेमझोन आणि फूडकोर्ट हे ओघाने आलेच.


या पॅरिसमधील मॉलला खूप प्रसिद्धी मिळाली आणि त्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जगात सगळीकडे मॉल संस्कृती वाढली.


मुबलक काचेच्या उपलब्धतेमुळे फक्त विंडो नाही तर अख्या शोरूममध्ये काच, लख्ख प्रकाशयोजना आणि आरशाचा वापर वाढला.


त्याचा मोठा फायदा म्हणजे मॉलमध्ये उजेड, प्रकाश आणि चकाकी वाढली. बघता बघता पॅरिस, लंडनसहीत सर्व युरोपात झकपाक चकाकणारे मॉल सुरु झाले.


मुबलक पैसेवाला अप्परक्लास हा शॉपिंग करणारा. तो वाटेल तेंव्हा, आहे त्या किमतीत पाहिजे त्या वस्तू खरेदी करायचा.


तरीसुद्धा सुरुवातीच्या काळात फक्त पुरुषच शॉपिंगचा आनंद घ्यायचे. महिलांनी एकटे फिरणे किंवा शॉपिंगला जाणे गैर मानल्या जायचे.


हळूहळू चैनीच्या वस्तू मध्यमवर्गाच्या खरेदीच्या आवाक्यात येऊ लागल्या.

वस्तूची विक्री वाढवण्यासाठी मध्यमवर्गांनीही चैनीच्या वस्तू बघाव्यात, हाताळाव्यात म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी पुढे वेगवेगळ्या युक्तया, जाहिरात हे प्रकार वाढले.


मग त्यासाठी मोठमोठे ग्लासपॅनलच्या विंडो तयार करून त्यात मेनेक्यू ठेवण्याचे प्रकार सुरू झाले.


पुढे खास विंडो डेकोरेटर हा नवीन उद्योग सुरु झाला. आज मॉलमध्ये फिरताना विविध शोरूमच्या विंडो ह्या एका विशिष्ट ‘थीम’ने सजलेल्या आपल्याला दिसतात.


जसेकी स्वातंत्रादिनी तिरंगी रंग अशी थीम, संक्रातीत पतंग वगैरे. त्यासाठी विंडो डेकोरेटरची नियमित सेवा घेतली जाते.


यामुळे एक चांगले झाले आता अप्पर आणि मिडलक्लाससह सर्वच लोकांना बिनदिक्कत शॉपिंग करत करत मनोरंजनासाठी विंडो शॉपिंग करण्याचीही मुभा मिळाली.


त्यांना टाईमपाससाठी एक जागा मिळाली. ग्राहकाला खरेदीचा अपार आंनद लुटता यावा म्हणून आज प्रत्येक मॉलमध्ये खरेदी आणि मनोरंजनाच एक व्यवस्थित मिश्रण आपल्यासमोर वाढलेलं असत.


विंडो शॉपिंग फक्त मॉल, शोरूम, शहरातील दुकान आणि रस्त्यावरच होते असे नाही.

झपाट्याने वाढून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेटवर आज हजारो शॉपिंग वेबसाईट उपलब्ध आहेत.


या E-Shopping मध्येसुद्धा ‘E-Window Shoppers‘ कितीतरी वेळ घंटो न गिनती विंडो शॉपिंग करत असतात.


त्यासाठी बाहेर जायचा खर्च नाही किंवा खिश्यात पैसे ठेवायची गरज नाही, हवा असतो फक्त नेटडाटा.


इंटरनेटवर अशा हजारो शॉपिंग वेबसाईट आहेत ज्याचा ब्राउझर दिवसभर वेगवेगळ्या वस्तू बघून आंनद घेऊ शकतात.


फायदा असा की या E-shopping च्या साईटवर विंडो शॉपिंग करून ग्राहकाना नवनवीन फॅशन ट्रेंड, स्टाईल आणि किमतीचा अंदाज येऊन ते एक जागरूक ग्राहक बनतात.


मग खरोखर शॉपिंग करताना घासाघीस करण्यासाठी या ऑन-लाईन टाईमपासचा त्यांना निश्चित फायदा होतो.


Window Shopping हि कल्पना मुळात जरी मध्यमवर्गीयांमुळे सुरु झाली तरी मागील काही वर्षात यात खूप आमूलाग्र बदल झालेले आहेत.


हल्ली उद्योजकांनी विक्री वाढून नफा वाढवा यासाठी ‘सर्वांसाठी सर्वकाही’ असे धोरण अवलंबिले आहे.

त्यामुळे ज्या वस्तू अप्परक्लासला मिळतात तशाच वस्तू, कमी दर्जाच्या का होईना मिडलक्लास तसेच लोवरक्लासला त्यांनी उपलब्ध करून देत आहेत.


मग ते तयार कपडे जसेकी थ्री पीस ब्लेजर, टाय, शु आणि कोट सारखे तयार कपडे असो की इतर जीवनउपयोगी चैनीच्या वस्तू.


असे घडल्यामुळे अर्थातच शॉपरची संख्या वाढली. पण त्यामुळे Window Shoppersच्या संख्येत काहीही फरक पडला नाही, हा प्रकार वाढतच गेला.


कारण मॉलमध्ये शॉपिंगसह मनोरंजन हा एक मोठा भाग जोडलेला असतो. त्यामुळे नेहमी खरेदी करायचीच, असा नियम तरी कुठे आहे.


एका चकाचक, एसी वातावरणात पैसे न मोजता फेरफटका मारणे कुणाला बरे नाही आवडणार…?

शिरताक्षणी सेक्युरिटीचा आदबशीर नमस्कार, बाहेर हिरवंगच्च हिरवळ, मॉलमध्ये शिरताच प्रसन्न एसी थंड वातावरण.

मनमोहक सजावट, चकाचक फ्लोरिंग, गालिचे, खालीवर जायला एस्केलेटर, आस्थेने विचारपुस करणारे सेल्समन, सेल्सवूमन आणि त्यांचं विनम्र वागणं. आणि एव्हडी सर्व सुख तेही एक रुपया न मोजता!



आधीतर मला हाच प्रश्न पडायचा कि या मॉलची नावे इंग्लिशमध्येच का? कोरम, प्रोझोन, सेंट्रल, विवेयाना, ओरबीट असंच का आणि बालाजी, रमनलाल, जगनलाल अस मोकळंचाकळ मराठी-हिंदीत का नाही…?

नंतर लक्षात आलं की मॉल हा प्रकारचं मुळात पाश्चिमात्य. मॉलमधील उपलब्ध ब्रँड सर्व पाश्चिमात्य आणि बाहेर रमनलाल, जगनलाल अशी एकोणिसाव्या शतकातील मॉल बरं नाही वाटणार.


एरव्ही तरी अशी जुनी नावे विशी-तिशीच्या मोठ्या ‘यंग जनरेशन’ खरेदीदारास आवडत नाहीत. मी मंगलदास मॉलमध्ये जाऊन आलो यापेक्षा आय हॅंड बिन टु ओरबीट मॉल, हे कधीही ‘कुल’ वाटतं ना, कदाचित त्यामुळेच.


मॉलमध्ये दर तिसरा Customer हा बिनकामाने इकडे तिकडे फिरनारा Window Shopper असतो. एका शोरूममधून दुसऱ्या मग तिसऱ्या असा तो बिनदिकत फिरत असतो.


असे रिकामे-बिनकामे कोण हे रोज बघून बघून त्या शोरूमच्या सेल्समनालाही माहित झालेलं असत.

त्यामुळे अशा गिऱ्हाकाने कितीही अभिनय केला तरी त्या सेल्समनच मानसिकशास्त्र खूप पक्क झालेलं असत.

अशा ग्राहकाकडून त्या सेल्समनला एकच अपेक्षा असते कि उद्या जर मोठा ऑफर-डिस्काऊन्टचा सेल लागला तर हीच  Window Shopping वाली मंडळी उद्या भरपूर सेल देऊन जाईल व आपली विक्री होऊन नफा वाढेल, पैसा वसूल होईल.



तयार कपड्याचंच उदाहरण घेतलं तर प्रत्येक ब्रँड हा एका विशिष्ट वर्गासाठी तयार झालेला असतो.

सर्व ब्रँड हे सर्वे करून, त्या विशिष्ट क्लासची आवड-नावड, दर्जा बघूनच त्याची निर्मिती केलेली असते.

त्यासाठी सर्वेसाठी त्या कंपनीकडे वेगळा विभागच असतो. लोवर क्लाससाठी वेगळा ब्रॅण्ड, लोवर-मिडल क्लाससाठी वेगळा ब्रँड, मिडलक्लाससाठी वेगळा आणि अप्परक्लाससाठी वेगळा.

त्या क्लासनुसार त्या कपड्याच्या जाहिरातीसुद्धा तशाच तयार केलेल्या असतात. त्यामुळे ग्राहकच एकंदरीत व्यक्तिमत्व बघून हा Customer कोणत्या क्लासचा आहे.

आपला खरा ग्राहक आहे किंवा नाही हे सेल्समनला लगेच कळतं असत. किंबहुना त्यांना याची सवय झालेली असते. मग तेही त्याप्रमाणेच वागतात.



उदाहरण द्यायचे झाल्यास ‘ऍर्रो’ ह्या अप्परक्लासच्या शोरूममध्ये एखादा लोवर-मिडल क्लासचा ग्राहक विंडो शॉपिंगसाठी शिरला तर त्या शोरूमचे सेल्समन जागचे हालत नाहीत.


एका जागेवर मठ बसलेले दिसतात. ग्राहकालाही थोडे आश्चर्य वाटते. तो सेल्समन आपल्या जागेवरून उठावा म्हणून हा विंडो शॉपर मुद्दाम उसना आवसान आणून जास्तच इंटरेस्ट दाखवतो.


मग त्या शोरूमचा एक सेल्समन दुसऱ्या सेल्समनला इशारा करून ‘ तू दिखादे और कटा’ म्हणून पाठवतो.

मग त्या सेल्समनला खूश करण्यासाठी हा ग्राहकही एक-दोन महागडे टॅग बघून एखादी घडी विसकटून हा पॅटर्न त्या कलरमध्ये नाही का…? तो कलर ह्या पॅटर्नमध्ये नाही का? असे सवाल करतो.


खुपचं वेळ असेल तर एखाद्या चांगल्या कपड्याची ट्रायल मारून ‘सेल्फी’ काढून घेतो. एव्हाना त्याच्या Facebook / InstaGram डीपीची सोय आता झालेली असते.


आता घ्यायचं तर नाही, मग ‘नया स्टॉक कब आयेगा? ये टेक्चरमें वो कलर आते नही क्या? ‘

असे उपदेशाचे डोज पाजत ही स्वारी सटकण्याची तयारी करते. जणू ‘नया स्टॉक’ आला तर हे महाशय घेणारच!

मग यदाकदाचित एखाद्याला खरंच एखादी वस्तू आवडलीच तर ‘आज भलेही नाही पण आहेरासाठी एक दिवस सासरकडच्या मंडळीला इथंच आणून गाडतो’, अस मनात बडबडत हा ग्राहक परत फिरतो.




आता दुसऱ्या शोरूमची बारी. येथील ब्रँड मिडल-क्लाससाठी आहेत आणि अप्परक्लासचा एक छोटं कुटुंब विंडो शॉपिंगसाठी शिरतं.


लगेच सारखे युनिफॉर्म घातलेले सेल्समन जणू काही ‘वरातीतील मंडळींचा’ स्वागत करावं तशी पुढे पुढे येतात. आपुलकीने विचार करतात तसा हा ग्राहक फुगतो.


अशा ग्राहकाकडून त्यांना खूप अपेक्षा असतात. मग एका कोपऱ्यात उभा त्यांचा मॅनेजर वरिष्ठ सेल्समनला खुणावून सांगतो की ‘तू हँडल कर’. लवकरच थंड पाणी येते.


‘क्यों सर बहोत दिनके बाद’ असा सेल्समनकडून मस्का मारल्या जातो. आपल्याला सेल्समन ओळखतो अस समजून ग्राहकाच मूठभर मांस वाढत.


तसा खरेदीसाठी प्रेशर बिल्ड-उप होतो. आता हा ग्राहक इकडे तिकडे फिरत, मध्येच मोबाईलवर बोटं फिरवीत, काही कपड्याचे टॅग न बघता मटेरियल दोन बोटात चुरगळत कट मारण्याची युक्ती शोधतो.


मग सोबत बायको-मुले असतील तर एकदोन इंग्रजी वाक्य झाडून आपल्याला कपड्यातील जास्तच कळत या अविर्भाजात ‘मी तुमच्याकडून फलांन-फलान वस्त्र घेऊन गेलो.

पण काही दिवसात ते फिक पडलं आणि मी त्याला फक्त चार-पाचदाच वापरून फेकून दिलं” अस सेल्समनला सांगून परतीची तयारी करतो.

आपल्या पतीला काही घ्यायचं नाही आणि ‘५०% ऑफ’ शिवाय ते काही घेणारबी नाही.

हे त्याच्या पत्नीलाही माहित असत, मग तीही थोडं ‘पसंदच पडत नाही ना, नाहीतर घेतलं असत’ असा अभिनय करून, तोंड वाकड करत बाहेर पडतात.

मुलं लहान असली तर हे असले प्रकार बघून आपल्या ममी-पप्पानी उगीच त्या सेल्समन काकाला त्रास दिला म्हणून मनातल्या मनात रागावतात.



हल्ली प्रत्येक मॉलमध्ये मनोरंजनासाठी मल्टीप्लेक्स आहेत. सकाळ आणि दुपारची वेळ म्हणचे या मॉलसाठी रिलॅक्स टाइम असतो.

थिएटर जरी चालू असलं तरी सेल्समनसाठी हा वेळ म्हणजे ‘बॅकऑफिस किंवा अरेंजमेंट टाइम’ असतो. मग अशातच काही प्रेमीयुगुल किंवा नवीन जोडपं विंडो शॉपिंगसाठी येतात.

चकाचक प्रसन्न वातावरणासह त्यांना ‘प्रायवसी ‘सहीत इतर मनोरंजन उपलब्ध असते. मग ते एखाद्या शोरूममध्ये एंट्री मारतात.

इकडे-तिकडे फिरून थोडे कपडे विचकटतात. दोघापैकी ज्याची इंग्लिश चांगली तो जरा जास्तच जोरात बोलून आपण किती ग्रेट हे जोडीदाराला दाखवत इम्प्रेस करत असतो.

इंग्लिश बोलणारा सेल्समन भेटल्यामुळे त्याला हा मौका मिळालेला असतो. मग हे जोडपं टॅग बघून, डिस्काउंट बघत फिरत असतात.

एखाद दुसऱ्या नवीन फॅशनची ट्रायल घेतात. ‘५०% ऑफ’ चा बोर्ड बघण्यासाठी त्यांची नजर भिरभिरत असते. पण तसा डिस्प्ले कुठे दिसत नाही.

तो पर्यंत सिनेमाची वेळ झालेली असते. मग ‘ऑफर कब आयेगी, वगैरे’ विचारपूस करून आपण ऑफर आली की नक्की येऊ अस वचन देऊन सटकण्याची तयारी सुरु होते.

सिनेमाची वेळ, बघण्याची घाई आणि एकंदरीत हावभाव बघून हे आपले नसुन ‘थिएटरचे Customer‘ असल्याचं सेल्समनला कळलेलं असत.

अशातच एखादा खोडकर सेल्समन असेल तर तो ‘सर आपके शोका टाईम हो गया?’ असं म्हणून ग्राहकांना आपली जागा दाखवून देतो!

पण हल्ली Customer हा राजाच, त्यामुळे असले प्रकार घडत नाहीत. कारण त्यामुळे Customer कायमचा निघून जाण्याची शक्यता असते म्हणुन सेल्समन सबुरीने घेतात.


आज पुणे मुंबई सारख्या शहरात कितीतरी ठिकाणी मॉल आहेत. हे मॉल म्हणचे एक विरंगुळा आणि करमणुकीचे केंद्र बनले आहेत.

मग कॉलेजची उडान मुलंमुली यात मागे कसे राहतील. मग चालू क्लास बुडवून, खोटनाट बोलून ह्या विध्यार्थ्याचं घोळक घंटोगणित मॉलमध्ये थोडंफार खाऊन पिऊन विंडो शॉपिंग करत असत.

बिनदिक्कत एका ब्रॅण्डमधून दुसऱ्या ब्रॅण्डमध्ये. मग एस्केलेटरने वर, वर जाणाऱ्या एस्केलेटरने खाली, खाली जाणाऱ्या एस्केलेटरने वर असे प्रकार बघायला मिळतात.

सेल्फी काढत, उडानगिरी करत आणि ओळखीच्या लोकांपासून नजर चुकवीत ही मंडळी बिंदास फिरत असते.

त्यांच्या पॉकेटमनीची धाव फक्त फूडकोर्ट किंवा गेमझोनपर्यंतच आहे हे सर्व ब्रॅण्डच्या सेल्समनला माहित असत.

यांना ओळखण्यासाठी वेगळ्या मानसशास्त्राची गरज असते. हे विध्यार्थी अगदी मोठया ब्रॅण्डमध्ये शिरतच नाही.

जरी कुठे विचारपूस करण्यासाठी ते गेले तर थोडंफार माहिती देऊन सेल्समन त्यांची बोळवन करतात.



शेवटी आणि परंतु खूप महत्वाचे. Window Shopping चा खरा आनंद घ्यावा तो महिलानीचं…! एकतर त्याच्याकडे स्टाईल, डिजाईन, कलर, पॅटर्न आणि मटेरियल याला ‘Infinity‘ हि लिमिट कमी पडते.

मग भैया इस कलरमे ये पॅटर्न नहीं है क्या? इस स्टाईलमे ये पॅटर्न, इस पॅटर्नमें ये कलर आणि इस डिझाईनमें यह कलर, और उस मटेरियलमें ये डिझाईन नही है क्या ? झालं!


मग वस्तू पसंद पडण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी होऊन जाते.

अशात त्यांच्या सोबत छोटी मुलं असली तर मम्मीची विंडो शॉपिंग होईपर्यंत मुलांचे लपंडावचे कितीतरी डाव झालेले असतात, त्यांना भूक लागलेली असते.

यदाकदाचित पॅटर्न, डिझाईन, मटेरियल, स्टाईल, कलर, साईज या सर्व बाबीचं ‘इंटरसेकशन’ होऊन काही आवडलेच तर डिस्काउंटवर गाडी अडते.

दुसरीकडे सोबतची मुलं ‘मम्मा, हमे भूक लगी है’ म्हणत मम्मीना बाहेर ओढत असतात.

एकतर Customer आणि वरून महिला म्हणून त्यांच्याशी रागावून न जाता, संयम ठेवत, विनम्र वागून आणि सौजन्याने सर्व दाखवण्याची कसरत सेल्समनला करणे भाग असते.

छोट्या मुलांचा त्रास वेगळाच. शेवटी, ‘नया स्टोक कब आयेगा, सेल कब लगेगा ? घरमे दो-दो शादिया है, बहोत खरेदी बाकी है, भैया, मै मेरा फोन नंबर देकर जाती हूँ!’

अशी हमी देऊन त्या बाहेर पडतात. त्यांची विंडो शॉपिंग आणि मुलांचं हुदडन होऊन मोर्चा फूडकोर्ट कळे वळतो. सेल्समनलाही मुक्ती मिळते.



क्लास कोणताही असो हा मानवी स्वभाव आहे कि ग्राहकाला कोणतीही वस्तू कमी किमतीतच हवी असते.

सर्वांना पैसा प्यारा असतो आणि तो काटकसरीने खर्च करणे यात काही गैर नाही. त्यामुळे सर्वांना ५०% किंवा त्यापेक्षा मोठी ‘Offer‘ चा इंतजार असतो.

मग एकदा का ‘सेल’ लागला कि गावखेड्यात लोक जसे एका वर्षासाठी पुरेल एव्हडा धान्यस्टॉक भरून ठेवतात तशी ही मंडळी भरपूर कपडे खरेदी करून स्टॉक करून ठेवतात.

त्यामुळे सेल दरम्यान Window Shopping कमी होते, शॉपिंगला उतू येतो.



बऱ्याचदा सेल्समनकडून ग्राहकाच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज चुकण्याची भिती असते.

तेंव्हा सकारात्मक विचार करून सरसगट सर्वच ग्राहकांना चांगलीच वागणूक आणि माहिती द्यायची असा सल्ला मॅनेजर सेल्समनला देतात.




कधी कधी हा अंदाज चुकून प्रकरण अंगलटही येतं. इतिहासात याचं एक चांगलं उदाहरण आहे, आणि ते सर्वश्रुत आहे.

सन १९२० मध्ये राजस्थानच्या अलवरप्रांताचे राजा महाराज जयसिंग लंडनला फिरत फिरत रोल्सरॉयस कारच्या शोरूममध्ये जातात.

त्यांचा साधा हिंदुस्तानी पेहराव, धोती बघून तेथील सेल्समन त्यांना व्यवस्थित बोलतं नाहीत आणि चांगली वागणूकही देत नाहीत.

याचा त्यांना प्रचंड राग येतो. ते लगेच हॉटेलवर जाऊन पेहेराव बदलून पुन्हा त्याच शोरूममध्ये जातात, काही रोल्सरॉयस कार बुक करतात.

त्या गाड्या भारतात आणून त्याला झाडू बांधून त्याचा उपयोग राजाच्या नगरातील कचरा टाकण्यासाठी केला होतो.

ह्या बातमीला जगभरात प्रसिद्धी मिळून त्या रोल्सरॉयल कार ब्रॅण्डची पत घसरते. शेवटी त्या कंपनीची लोक टेलिग्राफने जयसिंग महाराजही माफी मागतात, प्रकरण निवळते.




वस्तू कोणतीही असो शोरूमवाल्याना विंडो शॉपर हे हवेच असतात. मुळातच ते गृहीत धरलेले असतात. कारण त्यातूनच उदयाचे खरे शॉपरस तयार होणार असतात.

समाजात आर्थिक बदल होत असतात. आजचे गरीब उद्या श्रीमंत होतात. कालांतराने प्रत्येकाची ब्रॅण्डची निवड,आवड बदलत जाते.

पगार, आय आणि त्यायोगे खरेदीची शक्ती वाढतच असते. त्यामुळे सेल्समन, त्यांचे मालक भविष्याचा विचार करून ही पेरणी होऊ देतात, आणि दीर्घ काळात त्याचं त्यांना चांगलं फळही मिळतच.

तर अशा या बिन पैशाच्या विंडो शॉपिंगला आपण येथेच ‘विंडो-शॉपर स्टॉप देऊ.




लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा




©Prem Jaiswal

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button