My title My title
HealthMental Health

Why communication is important

संवाद का महत्वाचा आहे…?

Why communication is important..?



भुषण कौशल्या लक्ष्मण मडके



आताच्या या धावपळीच्या आणि अतिवेगवान जगातून communication नावाचा शब्दच जणू हरवून गेलाय.


माणसामाणसातील communication आता खूपच दुरापास्त गोष्ट झालीय.


तुम्हीच आठवून पाहा बर मागील काही दिवसात तुम्ही कोणाशी मनमोकळे बोलला आहात का? (मोबाईल वरील गप्पा सोडून)


कोणाजवळ हसून खेळून मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत का?


कोणाच्या गळ्यात पडून मनातले दुःख मोकळे केले आहे का?


काही अपवाद सोडले तर बऱ्याच जणांचे उत्तर नकारार्थी येईल. याचे कारण काय तर विलुप्त होत जाणारा communication आणि एकमेकांना समजून न घेण्याची वृत्ती.


प्रत्येकाला वाटत की मीच मोठा, मला कोणाची काय गरज आहे. दोन पैसे फेकले की काय पाहिजे ते माझ्या समोर येईल मग मी कशाला कोणाच्या जवळ जाऊ.


अरे बाबा या पैशांनी तुला सर्वकाही भेटेल पण मानसिक समाधान तुला भेटेल का?


आता जरा आपण काही उदाहरणे पाहू.


👍 खेड्यांमध्ये पूर्वी संध्याकाळचे ७ वाजले की लोक जेवण करून चावडी समोर नाहीतर कोणाच्या तरी कट्ट्यावर जमत आणि पान, सुपारी,तंबाखू सोबत गप्पा रंगत.


त्यातून प्रत्येकाच्या अडचणी सगळ्यांना समजून येत.


कोणाच्या मुलीला सासरी त्रास असेल, कोणाचा शेताचा, बांधाचा प्रश्न असेल, कोणाचे पैशावाचून अडत असेल इत्यादी आणि सगळ्यांच्या या अशा अनेक अडचणी चर्चेतून अलगद सुटून जात.


त्यामुळे पूर्वी #आत्महत्येचे प्रमाण खूपच कमी होते.



👎 आता लोक मोबाईलच्या एव्हढे आहारी गेले आहेत की बाहेरचे सोडा घरातील लोकही एकमेकांशी धड तासभर चर्चा करू शकत नाहीत.


त्यामुळे अडचणी समजून घेण्याचा प्रश्नच नाही येत. आणि यामुळेच सध्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत.


👍 शहरामध्ये चाळींचे प्रमाण भरपूर असायचे. तिथेही अगदी खेड्यासारखेच वातावरण त्यामुळे आपसूकच तिथल्या लोकांत एकमेकांच्या प्रश्नांना समजून घेण्याची वृत्ती असायची.


त्यामुळे मदतीची भावना वाढीस लागायची. कोणतेही काम झटकन व्हायचे.


👎 स्वतःचा स्वतंत्र बंगला (शेजार नसलेला) असल्याने एकोप्याची भावना संपत चालली. त्यामुळे एकलकोंडेपणा वाढीस लागून आत्महत्या वाढत आहेत.


👍 एकत्र कुटुंब पद्धतीमुळे नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना घरातील इतर महिलांचा आधार वाटायचा. communication असल्यामुळे त्यांच्या भावनांचा कोंडमारा कमी व्हायला मदत व्हायची.


👎एकत्र कुटुंब पद्धती नसल्याने नवीन आलेल्या स्त्रीला तिच्या स्त्रीसुलभ भावना व्यक्त करायला कोण जवळ नसते अशा वेळी तिला काही वेळेस नैराश्य येते.


👍 एकत्र कुटुंब पद्धतीमुळे communication असायचा व त्यामुळे घरावर आलेले कोणतेही संकट (आर्थिक असो वा इतर कोणते) अलगद दूर व्हायचे.


👎सगळ्यात महत्वाचे कारण हेच आहे की स्वतःवरती आलेले संकट दूर करण्यास जवळचे असे कोणी नसते त्यामुळे संकटाला घाबरून व्यक्ती स्वतः तर जाते पण काही वेळेस आख्खे कुटुंब संपविले जाते.


मला वाटतं या सर्वावर एक चांगला communication हा उपाय चांगला ठरू शकतो.


मी कोणी मानसोपचार तज्ज्ञ नाही की कोणी डॉक्टर नाही वरील सर्व मते ही माझ्या स्वतःच्या निरिक्षणातून मी मांडलेली आहेत.


यावर आपल्याला काय वाटत ते जरूर कळवा.



भुषण कौशल्या लक्ष्मण मडके

#खामगावकर
#व्हॉटसअप८२०८२१४१७९



आमच्या  प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…



आपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर  WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.

तेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.



लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button