
Volvo – व्होल्व्हो
©टीम नेटभेट
Volvo – व्होल्व्हो कंपनीची प्रेरणादायी गोष्ट सुरू होते 1950 सालापासून..
त्यावेळी ऑटोमोटीव्ह इंडस्ट्री शिखरावर तर होतीच पण या इंडस्ट्रीत बदलाचे वारे वाहू लागले होते.
रस्त्यावर वाहनांची गर्दी दिवसागणिक वाढू लागली होती कारण उत्पादन वाढले होते आणि त्यामुळेच वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाणही चिक्कार वाढले होते.
दिवसागणिक वृत्तपत्रांतून छापून येणाऱ्या निरनिराळ्या ठिकाणच्या अपघातांच्या अनेक बातम्या वाचताना अंगावर काटा येत असे..
आणि म्हणूनच आपल्या कंपनीला अधिकाधिक सुरक्षित अशी कार बनवता यावी या कामी विविध नामांकीत ऑटोमोटीव्ह कंपन्या दिवसरात्र एक करून संशोधन करीत होत्या.
कारण जर अशी सुरक्षित कार त्यांना बनवता आली तर तीच एकमेव उत्तम संधी त्यांना बाजारपेठेवर स्वतःचे वर्चस्व करण्यासाठी सहज उपलब्ध होईल ही जाणीव त्यांना होती.
अनेक कंपन्या आपल्या इंजिनिअर्स सोबत याविषयी दिवसरात्र संशोधन करत होत्या पण कोणालाच यश येत नव्हते.
अशातच, Volvo – व्होल्व्होचे अभियंते नील्स बोहलीन यांना थ्री पॉईंट सीटबेल्टची कल्पना सुचली.
त्यांनी ते तयार केले आणि या नव्या महत्त्वपूर्ण संशोधनाने क्रांतीच झाली.
या एका नव्या फीचर मुळे क्षणात Volvo – व्होल्व्होकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले.
‘सर्वाधिक सुरक्षित कार’ म्हणून Volvo – व्होल्व्होचा मान वाढला. अगदी काहीच दिवसात Volvo – व्होल्व्हो कार बाजारपेठेत नंबर वनची कार म्हणून प्रसिद्ध झाली.
व्होल्व्होने मात्र या सीटबेल्टचे पेटंट विनामूल्य देऊन टाकले. किंबहुना, त्यांनी हे पेटंट त्यांच्या स्पर्धकांना भेट म्हणून दिले.
मोठ्या प्रमाणावर या सीट बेल्टला अन्य कंपन्यांनीही त्यांच्या कार्समध्ये वापरण्याची एकप्रकारे मूकसंमतीच देऊन टाकली.
खरंतर असं न करता कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा नफा केवळ या एका संशोधनापायी कमावता येऊ शकला असता.
एकही कार न तयार करताही हे सहज शक्य झाले असते पण तरीही कंपनीने तसे केले नाही.
त्यामुळेच त्यापुढील काळात थ्री पॉईंट सीट बेल्टमुळे अक्षरशः तब्बल काही दशलक्ष लोकांचे प्राण वाचणे शक्य झाले.
‘3 Point Seat Belt ‘ हे या शतकातील सर्वात महत्त्वाचे सुरक्षा संशोधन असल्याचे सिद्ध झाले.
हल्ली बाजारात जी निरनिराळी उत्पादनं येतात, त्यापैकी अनेक उत्पादनांमागे त्या कंपनीचा केवळ नफा मिळवण्याचाच उद्देश असतो.
नफा मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करण्यास या कंपन्या तयार होतात.. परंतु, हेच करणे अयोग्य आहे.
Volvo – व्होल्व्हो कंपनीने ज्याप्रकारे संबंध मानवजातीचा विचार करत आपल्या हातातील बेसुमार नफा कमावण्याची संधीही सहज व उदात्त विचाराने सोडून दिली.
म्हणूनच या स्पर्धेच्या युगात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
केवळ नफ्यापाठी न धावता नीतीमत्तेचीही कास उद्योजकांनी धरावी हेच या उदाहरणातून आपण शिकले पाहिजे.
लेख आवडला तर
जास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा
©टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com
Source :Whatsapp
RELATED POSTS
View all
