My title My title
Brain Storming

Social Media Friend Request

Social Media Friend Request



©Milind Joshi, Nasik



आठएक दिवसांपूर्वी मला एक Friend Request आली. पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव होते पूजा पटेल. हे नाव इतके कॉमन आहे की फेसबुकवरच आपल्याला या नावाची किमान पन्नास साठ अकौंट दिसतील.

मी नेहमीप्रमाणे विनंती स्वीकारण्यापूर्वी अकौंटला भेट दिली. ते अकौंट १०/१२ दिवसांपूर्वी तयार करण्यात आले होते. १८/२० वर्षाच्या गुजराथी मुलीचे दोन फोटो दिसत होते.

दोन्ही वेगवेगळ्या पंजाबी ड्रेसमध्ये. प्रोफाईल लॉक नव्हते. व्यक्तिगत माहिती मध्ये फोननंबरही दिसत होता. तसेच गावाचे नावही होते, अहमदाबाद.

मेंदूने लगेच सांगितले, ‘मिलिंद, सावधान… गुजराथची मुलगी तुला का म्हणून मित्र विनंती पाठवेल?’ म्हणून मित्र विनंती पेंडिंग ठेवली.

जवळपास एक दीड तासाने मेसेंजर मध्ये एक मेसेज रिक्वेस्ट दिसली. उघडून बघितले तर तिचाच मेसेज होता. ‘Hi’. मग मात्र मी संवाद साधायचे ठरवले.

“रामराम”

“How R U?”

“मै तो अच्छा हू और आप?”

“fine. Where r u from?”

“मै नासिक, महाराष्ट्रमे रेहेता हू”

“your profession?”

“मै वेब डेव्हलपर हू, और आप?”

“I am medical student.”

“क्या बात है, ग्रेट…”

“can we chat on whatsapp?”

तिने म्हटले आणि परत माझ्या मेंदूने सांगितले… ‘सावधान…’ पण परत त्या मुलीचा फोटो डोळ्यासमोर आला आणि मी माझा Whatsapp नंबर पाठवला.

दोनच मिनिटात whatsapp वर नवीन मेसेज आल्याचे नोटिफिकेशन मिळाले.

“Hi, Pooja here.”

“रामराम”

“r u Free?”

“कहिये.”

“video chat?”

“सॉरी, अभी ऑफिस मे हू”

“sex chat?”

ज्या पद्धतीने संभाषण चालू होते त्यानुसार पुढे असेच काही असणार ही गोष्ट डोक्यात आलीच होती, आणि या दोन शब्दांनी त्यावर शिक्कामोर्तब केले.

“Sorry, I am not interested…” मी मेसेज केला आणि मग पलीकडून त्यावर काहीच उत्तर आले नाही. पण तो नंबर मी लगेच true caller वर चेक केला.

तिथेही नाव ‘पूजा पटेल’ आणि लोकेशन ‘अहमदाबाद’ असेच आले. तसेही मी ती मित्र विनंती स्वीकारली नव्हतीच म्हणून नंतर ही गोष्ट मी विसरूनही गेलो.

आज माझ्या एका मित्राचा फोन आला.

“भैय्या, एक प्रॉब्लेम हुवा है |” त्याने सांगितले.

“क्या हुवा?”

“कुछ दिन पेहेले मुझे एक लडकीने Friend Request भेजा था, मैने accept कर लिया | फिर उसने मेरा whatsapp नंबर मांगा.

मैने वो भी दे दिया. फिर उसने मुझे व्हिडिओ चाटके लिए पुछां, आठ दस दिन हम काफी अच्छी तरह बात कर रहे थे |

आज एक लडकेका whatsapp मेसेज आया. और उसके साथ मेरा एक व्हिडीओ भी था | जो काफी अश्लील था |

अब वो लडका बोल रहा है, कल सुबह तक मुझे हजार रुपये भेज दो, नही तो ये व्हिडिओ मै आपके दोस्त और रीश्तेदारोंको भेज दुंगा |”

त्याने एका दमात सगळे सांगून टाकले.

“ओह…”

“अब मुझे समज नही आ रहा, मै क्या करू?”

“देख यार, ऐसे मे सबसे अच्छा तो यही होगा के तू पुलिस की मदत ले |”

“दुसरा कोई रास्ता नही है क्या?”

“दुसरा रास्ता तो नही है लेकीन तू कुछ चीजे कर सकता है | सबसे पेहेले तो whatsapp A/c. बंद कर.

उसके बाद फोनमे जो नंबर सेव्ह है वो gmail पे ट्रान्सफर करके gmail का पासवर्ड कॉम्प्युटरसे बदल दे |

हो सकता है तेरा फोन Hack किया गया हो | अगर तेरे पास दो नंबर है तो जिस नंबरपे तेरा whatsapp है तो फोन बंद कर के रख.

और हां, सबसे पेहेले तो ‘आगे क्या होगा’ ये बात मनसे निकाल दे |

जो तेरे दोस्त है वो हमेशा तुझपर विश्वास करेंगे | जो भी हो, उनको पैसे मत दो |

आज वो हजार मांग रहे है, अगले हप्ते पाच हजार, बाद मे दस हजार ऐसे उनकी मांग बढती जायेगी |

लेकीन मै यही सुझाव दुंगा, पुलिस की मदत लेना सबसे अच्छा रास्ता है |” मी सांगितले.

“ठीक है भैया, उनको जो करना है कर ले, मै पैसे तो नही देने वाला |” त्याने सांगितले आणि फोन बंद झाला.

फोन ठेवला आणि मला पूजा पटेलची आठवण झाली. खरे तर मी माझा whatsapp नंबर देऊन चूकच केली होती.

कारण अनेकदा हे लोक दुसऱ्या एखाद्या नावाने किंवा व्यावसायिक म्हणून आपल्या नंबरवर आपल्या व्यवसायाशी संबंधित लिंक पाठवतात.

आपण अनवधानाने त्यावर क्लिक करतो आणि आपला फोन hack केला जातो.

लगेचच मी फोन हातात घेतला, whatsapp उघडले आणि आठ दिवसांपूर्वीचे मेसेज चेक करू लागलो. पूजा पटेलचा नंबर किंवा मेसेज कुठेच दिसला नाही.

मग truecaller ची हिस्ट्री चेक केली. त्यात तो नंबर होता. पण ना तिथे कोणते नाव दिसले, ना लोकेशन. मग मेसेंजर उघडले.

त्या दिवशीच्या मेसेजेसवर गेलो. तिथेही नाव नव्हते. Facebook User इतकेच दिसले. त्यावर क्लिक केल्यावर तिथे फक्त मी पाठवलेले मेसेज दिसत होते.

तिचा एकही मेसेज दिसला नाही. याचाच अर्थ फेसबुक अकौंट बंद केले गेले होते.

लगेचच मनात विचार आला, ‘यार, त्या दिवशी स्वतःवर नियंत्रण ठेवल्यामुळे आज आपण वाचलो आहोत. नाहीतर आज मित्राच्या जागी आपण असतो.’

आता काही लोकांना वाटेल, माझ्या व्यवसायामुळे मला या गोष्टीतली थोडीफार माहिती आहे, मी Hacking बद्दल काही लेखही लिहिले आहेत.

मग मी का घाबरायचे?

एक सांगू, हे क्षेत्रच असे आहे, एक चूक आणि आपण गोत्यात येतो. ३ महिन्यांपूर्वीच मी याचा अनुभव घेतला आहे. अर्थात तो Ransomware Attack होता.

पण त्यावेळी ही माझा निष्काळजीपणाच मला भोवला होता.

काही जणांना असेही वाटेल, आपण फक्त व्हिडिओ चाट केला तर काय प्रॉब्लेम आहे?

त्यांच्यासाठी सांगतो. अनेकदा आपण व्हिडिओ चाट करताना समोर दिसणारी मुलगी प्रत्यक्षात असतेच असे नाही.

आपण बोलत असताना आपले प्रत्येक हावभाव रेकॉर्ड केले जातात, त्यानंतर त्यांच्याकडील व्हिडीओमध्ये आपला चेहरा मॉर्फ केला जातो.

प्रथमदर्शनी बघताना असा एडीट केलेला व्हिडिओ ओळखणे खूप अवघड असते. ज्यावेळी असा व्हिडिओ आपल्या समोर येतो त्यावेळी आपल्यालाच प्रश्न पडतो, ‘हे कधी झालं?’

आपण ज्यावेळी whatsapp वर बोलत असतो त्यावेळी एखादी अशी लिंक आपल्याला पाठवली जाते ज्यावर आपण क्लिक करतो आणि आपला फोन hack केला जातो.

एक गोष्ट लक्षात घ्या, आपला फोन सध्या आपला सगळ्यात मोठा विक पॉईंट आहे. उदा. अनेक जण त्यावरूनच बँकेचे व्यवहार करतात.

ते करताना अनेकदा आपल्याला लॉगिन करायची गरज पडत नाही. कारण आपण फिंगरप्रिंट स्कॅनरवर बोट ठेवतो आणि त्याच्या द्वारे आपली transaction पूर्ण होते.

किंवा आपण फिंगरप्रिंट स्कॅनरवर बोट ठेवतो आणि आपला फोन उघडला जातो. याचाच अर्थ आपल्या बोटाचे ठसे मोबाईलमध्ये सेव्ह असतात.


💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.

💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!

आमच्या  प्रिय वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…

वेबसाईट डेव्हलपमेंट कोर्स मराठी मधुन फक्त ९९९ रुपयांत, २० दिवसांत.

10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)

तुम्हाला कोडींग किंवा प्रोग्रामिंग येत असण्याची बिलकुल गरज नाही.

सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. https://itworkss.in/e-learning/


आणि अशा वेळी फोन Hack झाला तर तेही Hacker कडे जातात. आपोआपच त्याला सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. तुम्हाला माहितीही नसते आणि व्यवहार होऊन जातात.

हा लेख कुणाला घाबरवण्यासाठी नाहीये, तर असे होत आहे हे सांगून सावध करण्यासाठी आहे. अशा गोष्टी टाळायच्या असतील तर काही गोष्टी आपण करू शकतो.

१. कुणाही अनोळखी व्यक्तीची मित्र विनंती स्वीकारू नका. ती व्यक्ती कितीही सुंदर दिसत असली तरीही.

२. कुणाही अनोळखी व्यक्तीला आपला whatsapp नंबर देऊ नका. समजा दिला तरी त्यावर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

३. कुणीही व्यक्ती व्हिडिओ चाट करू असे म्हणत असेल तर जोपर्यंत आपली पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत अशा गोष्टी टाळा.

४. आजकाल फक्त चारित्र्यवान असून भागत नाही, कायम सावध असणेही तेवढेच गरजेचे आहे.

५. अशा व्यक्ती मैत्री करताना आधी ज्याच्याशी मैत्री करायची त्याची पूर्ण माहिती मिळवत असतात.

यालाच Social Engineering असे म्हटले जाते. Hacking क्षेत्रातील सगळ्यात घातक आणि वापरले जाणारे हत्यार हेच असते.

६. समोरच्या व्यक्तीने पैशाची मागणी केली ( अगदी कोणत्याही कारणाने ) तरीही त्याला भुलू नका.

कारण तुमच्याकडे पैसे मागितल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे याचा अभ्यास करून तुमच्या विरुद्ध धोरण ( Strategy ) ठरवले जाते.

७. समजा काही कारणाने आपण एखाद्या जाळ्यात अडकलोच तर पोलिसांची मदत घ्या, पण चुकुनही पैसे देण्याच्या फंदात पडू नका.

कारण असे दिसून आले आहे की असे व्हिडिओ परत करण्यासाठी मोठी रक्कम तुमच्याकडून घेऊन तो व्हिडिओ दुसऱ्या टोळीला दिला जातो.

त्या टोळीतील लोक कधी पोलीस आहोत, कधी Cyber Crime डिपार्टमेंटचे अधिकारी आहोत असे सांगून, तुमच्यावर केस होऊ शकते असे सांगतात आणि ते होऊ नये म्हणूनही तुमच्याकडे खंडणी मागतात.

थोडक्यात प्रलोभनांना भुलले नाहीत तर बऱ्याच संकटातून वाचू शकतात.



— सायबर धोक्यांपासून सावध करणारा नाशिककर, मिलिंद जोशी…





महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बंधू भगिनींना डिजिटल व्यावसायिक बनवण्यावर आमचा भर आहे…!
https://itworkss.in/e-learning/
👌👌👌👌

💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.

💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.

✅ कोडींग किंवा प्रोग्रामिंगची एक ओळही न लिहिता / टाईप करता अत्यंत सुबक आणि सुंदर वेबसाईट कशा बनवायच्या ते शिकायच आहे?

✅ २५० रूपयांपेक्षा कमी किमतीत वेबसाईट बनवून ती ३००० ते ३०,००० पर्यंत कशी विकता येईल हे शिकायचं आहे?

💡 थोडफार कॉम्पुटरच ज्ञान असलेल्या प्रत्येकाला आपल्या घरीच / ऑफिसमध्ये / कॉलेज मध्ये बसून करता येईल असा.

💡 सर्वात जास्त मागणी असलेला व्यवसाय म्हणजे वेब डेव्हलपमेंट किंवा वेब डिझायनिंग सुद्धा म्हणू शकता.

❓ तुम्हाला स्वत:च्या बिझनेस साठी वेबसाईट बनवायची असेल?

❓ आपली एखादी बिझनेस आयडिया पारखून बघायची असेल?

❓ वेबसाईट बनवून विकायच्या असतील?

💡 तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.

✅ गृहिणी.
✅ कॉलेजमधील विद्यार्थी.
✅ तरुणांना डिजिटल व्यवसायिक बनण्यासाठी हा एक सर्वातचांगला पर्याय आहे.

हा कोर्स आम्ही आपल्यासाठी फक्त ९९९ रुपयांत उपलब्ध करून देत आहोत…

आणि विशेष म्हणजे आपल्या मराठी भाषेतून उपलब्ध करून देत आहोत.

10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)

💡 Facebook किंवा instagram वर रील्स बनवताना आपण ज्या क्रियेटीव्हीटीने आपण व्हिडीओ बनवतो.

💡 त्याच क्रियेटीव्हीटीने आपण वेबसाईट बनवण्याचा व्यवसाय देखील करून पैसे कमवु शकतो.

✅ सराव करण्यासाठी गरज आहे ती फक्त कॉम्पुटर / लॅपटॉप आणि इंटरनेटची या गोष्टी तुम्हाला चांगल्याप्रकारे वापरता येत असतील तर तुम्ही एकदम झकास वेबसाईट बनवू शकता…

✅ तुमच्या घरी / ऑफिसमध्ये / कॉलेजमध्ये कुठे हि सराव करू शकता.

👉 तर मित्रांनो itworkss च्या या बहुमूल्य अशा कोर्स मध्ये नक्कीच सहभागी व्हा फक्त ₹ ९९९ आणि २० दिवसांत शिका.

आणि आपला स्वतः च्या व्यवसाय चालू करा.

10 जानेवारी २०२२ पासुन बॅचेस सुरू होतील…! (👉 मर्यादित जागा)
https://itworkss.in/e-learning/

मराठीतुनच शिकुन, प्रगती करू भर भरून…!
टीम इट-वर्क्स
www.itworkss.in

Varunraj kalse

Howdy, I’m Varunraj Kalse. I’m a teacher living in Osmanabad. I am a fan of Digital Marketing, Cyber Security, Technology, entrepreneurship, and web development. I’m also interested in innovation and education. You can read my blog at https://itworkss.in/ for more information. Follow me on Instagram @digitalvarunraj for tech tips and tricks!

Leave a Reply

Back to top button